RTE 2022 प्रवेशासाठी आता नव्या सुधारणा!!

RTE Admission 2022

RTE Admission 2022

RTE Admission 2022 : The Director of Education (Primary) has announced new reforms for the new academic year 2022-23 with a view to making the scheme more people-oriented and school access easier. Accordingly, the passbook of any nationalized bank will now be accepted for proof of residency. Further details are as follows:-

‘आरटीई’ प्रवेशासाठी आता निवासी पुरावा म्हणून राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार आहे. ‘आरटीई’साठी नव्या सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण व समान संधी प्राप्त व्हावी आणि शिक्षणाच्या आड गरिबी येऊ नये या उदात्त हेतूने (शिक्षणाचा अधिकार) आर.टी.ई. कायद्याअंतर्गत शासनाने दुर्बल व वंचित घटकासाठी प्राथमिक प्रवेशांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. शासनाच्या या कल्याणकारी योजनेचा लाभाअंतर्गत दरवर्षी गरिबांची मुले-मुली खासगी शाळांमध्ये एक चतुर्थांश जागांवर प्रवेश घेतात.

नवे काय?

योजना अधिक लोकाभिमुख व शाळांचे प्रवेश अधिक सुकर व्हावेत या उद्देशाने शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता नव्या सुधारणा जाहीर केल्या. यानुसार आता निवासी पुराव्याकरिता कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार आहे.

RTE Admission 2022

Important :

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीत आर.टी.ई. २५ टक्के प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून पालकांना ऑनलाइन अर्ज १ फेब्रुवारीपासून भरता येतील.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड, वाहनचालक परवाना, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स पावती, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणताही एक पुरावा देता येणार आहे. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य किंवा अपूर्ण असेल तरच नोंदणीकृत भाडेकरार किंवा राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक असेल. नोंदणीकृत भाडेकरार द्यावयाचा असल्यास हा करार ऑनलाइन अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा. गॅस बुक, इतर स्थानिक बँकेचे तसेच पतसंस्थेचे पासबुक निवासी पुराव्याकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के जागा आरटीईसाठी राखीव ठेवल्या जातात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.


RTE Admission 2022

RTE Admission 2022 : The Department of Education on Thursday announced the probable timetable for the year 2022-23 of the 25 per cent admissions granted under the Right to Education Act (RTE). According to the schedule, the RTE admission process will be held from December 28 to May 9. Further details are as follows:-

RTE Admission 2022 – ‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (RTE) देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २८ डिसेंबर ते नऊ मे दरम्यान ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. 

2022 वर्षाच्या RTE प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

त्या २८ डिसेंबरपासून राज्यातील ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी सुरू होणार आहे. १७ जानेवारी पर्यंत तपासणी सुरू राहणार असून, त्यानंतर ‘आरटीई’ प्रवेशांसाठी राज्यात उपलब्ध शाळा आणि प्रवेशांच्या जागा जाहीर करण्यात येतील. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान, पालकांना ‘आरटीई’ प्रवेशांसाठी अर्ज करता येणार आहेत. आठ किंवा नऊ मार्चला ‘आरटीई’ प्रवेशांची सोडत निघणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल, असे संभाव्य वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

RTE Admission 2022

RTE Admission 2022

The Department of Education on Thursday announced the probable timetable for the year 2022-23 of the 25 percent admissions granted under the Right to Education Act (RTE). According to the schedule, the RTE admission process will be held from December 28 to May 9. Parents enrolled in the RTE draw can go to schools between March 10 and March 31 and confirm their admission by submitting original documents. Admission rounds for students on the waiting list will start on April 1.

यंदाचे संभाव्य वेळापत्रक पाहता मे महिन्यातच ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पाहता शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकाच्याच कालावधीत ती पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेही यंदाही ‘आरटीई’ प्रवेशांची सोडत एकदाच जाहीर केली जाणार असून, शाळांमधील प्रवेशांच्या रिक्त जागांच्या संख्येइतकीच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


RTE Admission Vacant Posts

RTE Admission 2021 Details : Under the Right to Education Act (RTE), 71,716 students were admitted in the state, while 24,968 seats remained vacant. Thane, Pune and Mumbai have the highest number of vacancies in the state. Further details are as follows:-

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशात राज्यात ७१ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर २४ हजार ९६८ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यभरात सर्वाधिक रिक्त जागा या ठाणे, पुणे आणि मुंबईतील आहेत.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया संपल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केले. नियमित प्रवेशासाठी ३१ जुलै हि अंतिम मुदत होती. त्यानंतर ८ ऑगस्टपासून प्रतीक्षा निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु करण्यात आले. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १८ डिसेंबरपर्यंत प्रवेश देण्यात आले होते.


RTE Admission Waiting List

RTE Admission 2021 Details : Under the Right to Free and Compulsory Education Act, the admission list of 156 children for the year 2021-22 has been announced for 25 per cent reserved seats under RTE in permanent unsubsidized, unsubsidized and self-financed schools. Further details are as follows:-

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमांतर्गत कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी २०२१-२२ या वर्षासाठी १५६ बालकांची प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे. शाळा, पालक व सामाजिक संस्थांनी प्रवेश प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी केले आहे.


RTE Admission 2021

RTE Admission 2021 Details : The process continues even after four months of reversal of the RTE admission process. Admission of 68 thousand 952 students was completed. It was decided to admit the children on the waiting list after giving them ample opportunity to fill the remaining vacancies. Further details are as follows:-

आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच आहे. ६८ हजार ९५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. उर्वरित रिक्त जागांवर प्रवेशासाठी मुदतवाढ देऊन पुरेशा संधी दिल्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी पहिली फेरी राबविल्यानंतर, आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. य़ेत्या २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

पुण्यात दहा हजार प्रवेश 

पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांमध्ये प्रवेशासाठी १४ हजार ७७३ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ५५ हजार ८१३ पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ हजार ५६७ मुलांना प्रवेश जाहीर झाले. त्यापैकी १० हजार ८६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही तीन हजार ९०९ जागा रिक्त असल्याची माहिती ‘आरटीई’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.


RTE Admission Process Extended

RTE Admission 2021 Details : RTE admissions have been extended again. Admission can now be confirmed till July 31, 2021. This period ended on July 23, 2021. The admission process was done online. Further details are as follows:-

आरटीई प्रवेशांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ जुलै २०२१ पर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार आहे. ही मुदत २३ जुलै २०२१ रोजी संपत होती. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली होती.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यानुसार, २५ टक्के जागांवरील प्रवेश निश्चितीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली होती. अजूनही ज्या पालकांनी शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेला नाही, किंवा ज्या पालकांना अजूनही या प्रवेशांची लॉटरी लागल्याचे कळले नाही, त्यांना एसएमएस करून शाळेत प्रवेश घेण्याबाबत कळवावे, असे निर्देश गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


RTE Admission Extension

RTE Admission 2021 Details : 4,208 students selected through lottery under RTE admission process have been given second extension for admission process. Therefore, the admission of the students who got the opportunity to get admission in the state level lottery process will be confirmed till July 23.

आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय लॉटरी प्रक्रियेत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे २३ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरटीई अंतर्गत नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ९) सायंकाळपर्यंत २ हजार ७२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अजूनही १ हजार ४८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळून त्यांनी प्रवेश घेतलेले नाही. या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाढीव मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात आरटीई प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत २ हजार ७२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यापूर्वी पहिल्यांदा ३० जूनपर्यंतची प्रवेशाची मुदत संपल्यानंतर पहिल्यांदा ९ जुलैपर्यंत व त्यानंतर आता दुसऱ्यांदा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यस्तरावरून सोडत जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याला विलंब झाला आहे. त्यामुळे निश्चित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू न शकणाऱ्या पालकांना मुदतवाढ मिळाली असून, वाढीव मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


RTE Admission 2021 Details

RTE Admission 2021 : The RTE admission process, which has been delayed due to corona, will begin in the coming weeks. Therefore, more than 82,000 students in the state, including Pune, will be able to start online education by getting admission to the school. Admission will be given at the school level like last year.

RTE प्रवेश प्रक्रिया आठवड्याभरात सुरु होणार!

कोरोनामुळे रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया येत्या आठवड्याभरात सुरु होणार आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील 82 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु करता येणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शाळास्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शाळास्तरावर कागदपत्रांची पाहणी करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती, या वर्षी सुधा त्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे प्राथमिक सिक्ष्ण संचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.


RTE Four thousand 479 seats available

RTE Admission 2021 : In the Nashik district under RTE Four thousand 479 seats available – शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव प्रवर्गातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. याअंतर्गत शाळांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होती. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता नाशिक जिल्ह्यात ४४१ शाळांनी नोंदणी केली असून, त्‍यानुसार चार हजार ४७९ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध असणार आहेत.

आरटीईअंतर्गत राज्‍यात सात हजार २७१ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांतील ७९ हजार ६३४ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. दरम्‍यान, लवकरच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्‍याने पालकांनी कागदपत्रांची पूर्तता करून ठेवण्याच्‍या सूचना शिक्षण विभागाने दिल्‍या आहेत. तत्‍पूर्वी शाळांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची होती. शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्‍याने शिक्षण विभागाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिलेली होती. ही वाढीव मुदत बुधवारी (ता. १०) संपली. सायंकाळी उशिरापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ४४१ शाळांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. त्‍यासाठी चार हजार ४७९ जागा उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत.
गेल्‍या वर्षीपेक्षा जागा कमीच 

गेल्‍या वर्षी राज्‍यभरात नऊ हजार ३३१ शाळांनी नोंदणी करताना एक लाख १५ हजार ४७७ जागा उपलब्‍ध केल्या होत्या. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्‍ध झालेल्‍या माहितीनुसार यंदा राज्‍यातून सात हजार २७१ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांतील ७९ हजार ६३४ जागा उपलब्‍ध केल्‍या आहेत. हे प्रमाण गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत कमी आहे. नाशिक जिल्ह्या‍चा विचार केल्‍यास गेल्‍या वर्षी सुमारे ४४७ शाळांमधील पाच हजार ३०७ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध केल्‍या होत्‍या. यंदा जिल्ह्यातील उपलब्‍ध जागांच्‍या संख्येतही घट झालेली आहे.

सोर्स : लोकमत


RTE Admission 2021 : Aurangabad RTE Admission Schedule Announce – आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी पात्रताधारक शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पात्रता असूनही नोंदणी न करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

आरटीईअंतर्गत दरवर्षी दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश दिला जातो. यंदा प्रवेशासाठी नऊ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरता येतील. वेळापत्रकानुसार नऊ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पालकांना अर्ज करायचे आहे. पाच मार्चला जागांची लॉटरी निघेल. अर्ज निवडलेल्या पालकांनी नऊ ते २६ मार्च २०२१ दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर होईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यांत प्रवेश घेता येईल.

यंदा एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी असेल. प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यावरही शाळेत जागा रिक्त असल्यास, अर्ज शिल्लक असल्यास पुन्हा सोडत काढून प्रवेश देण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

…तर संस्थावर कारवाई

आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक संस्था, एनजीओ खोटी माहिती भरून पालकांची दिशाभूल करतात. या संस्था, एनजीओ मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी खोटा पत्ता, शाळेजवळ घर असल्याचे भासवतात. अशा तक्रारी आल्यास संबंधित संस्था, एनजीओविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

संभाव्य वेळापत्रक – RTE Admission 2021

 • – ८ फेब्रुवारी : शाळांची नोंदणी
 • – ९ ते २६ फेब्रुवारी : प्रवेश अर्ज भरणे
 • – ५ ते ६ मार्च : ऑनलाइन सोडत
 • – ९ ते २६ मार्च : प्रवेश निश्चिती
 • – २७ मार्च ते ६ एप्रिल : प्रतीक्षा यादी- पहिला टप्पा
 • – १२ ते १९ एप्रिल : प्रतीक्षा यादी- दुसरा टप्पा
 • – २६ एप्रिल ते ३ मे : प्रतीक्षा यादी- तिसरा टप्पा
 • – १० ते १५ मे : प्रतीक्षा यादी- चौथा टप्पा

सोर्स : सकाळ


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Ravi waghalkar says

  Mala fakt admission chi Parikh kdwa

 2. Archana says

  Age limit

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड