नवीन मुंबई महानगर पालिका पूर्ण परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड लिंक सुरु..- NMMC Exam Admit Card, Hall Ticket Download
NMMC Exam Admit Card Download, Print
नवीन मुंबई महानगरपालिकेच्या ६६८ पदांसाठी ८४ हजार ७७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. (NMMC Exam Admit Card Download, Print) या परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत. प्रवेशपत्र लिंक सुरु झाली आहे. खालील लिंक वरून उमेदवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. तसेच हि परीक्षा निर्विघ्न, सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून प्रत्येक केंद्रांवर पोलिस बंदोबस्त देण्याची विनंती केली. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान काही समाजकंटक उमेदवारांना खोटी आश्वासने देऊन आर्थिक फसवणूक करण्याचा धोका संभवतो. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार लेखी परीक्षा पारदर्शक, शांततेत पार पडावी, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त उपलब्ध केला जाईल. तसेच, या परीक्षेचे सिल्याबस आणि नवीन एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या परीक्षेचे सिल्याबस आणि नवीन एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हानिहाय केंद्रांची यादी, परीक्षा दिनांक, वेळ व आवश्यक मनुष्यबळाबाबत लवकरच कळविण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले आहे. महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेत ३० संवर्गातील ६६८ पदांचा समावेश आहे. यामध्ये लिपिक टंकलेखक (१३५), स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (१३१), लेखा लिपिक (५८), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (५१), एएनएम (३८), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३५), वॉर्डबॉय (२९), कक्ष सेविका/आया (२८), शस्त्रक्रियागृह सहायक (१५), आरोग्य सहायक महिला (१२), औषध निर्माता (१२), वैद्यकीय समाजसेवक (१५) आदी पदांचा समावेश आहे.
भरती प्रक्रियेबाबत दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून उमेदवारांनी सावध राहावे, तसेच भरतीसंदर्भातील अधिकृत आणि अचूक माहितीसाठी नवी मुंबई पालिकेच्या अधिकृत वेबसाइट तसेच फेसबुक, द्विटर आणि इन्स्टाग्राम पेजला भेट देण्याचे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.