पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 20 टक्के जागा वाढणार

Postgraduate Courses

Postgraduate Courses : 20% increase in postgraduate courses – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा परीक्षा व प्रवेश शुल्कात वाढ होणार नाही. सोबतच संलग्नित महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २० टक्के जागा वाढविण्यात येतील, असा निर्णय विद्वत्त परिषदेतर्फे घेण्यात आला. मंगळवारी विद्वत्त परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत महाविद्यालय व व्यवस्थापन परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यंदा पदवी परीक्षांचे निकाल चांगले लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासक्रमांत आवश्यक जागा नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे महाविद्यालयांत २० टक्के अतिरिक्त जागा वाढविणे आवश्यक आहे, तरच सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल, असा प्रस्ताव होता. यावर सखोल चर्चा झाल्यावर त्याला मंजुरी देण्यात आली.

केवळ संलग्नित महाविद्यालयांतीलच जागा वाढतील. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांसाठी हा निर्णय लागू होणार नाही. जर विभागांमध्ये जागा वाढविल्या गेल्या तर तशा सुविधादेखील उपलब्ध करून द्याव्या लागतील. कमी कालावधीत ते शक्य नसल्याचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी स्पष्ट केले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड