PMC Admit Card 2026
The recruitment process for the post of Junior Engineer (Civil) at the Pune Municipal Corporation—which had been stalled for nearly two years—has finally been set in motion, and a new schedule for the examination has now been finalized. Admit Cards or Hall tickets for this examinations is now available for downloading . The examination is scheduled to be held across seven centers in the state on April 22, 23, and 29. A staggering 42,000 candidates have applied for this recruitment drive. A significant shortage of Junior Engineers has emerged across various departments of the Municipal Corporation—specifically in the Construction, Roads, Sewage, Water Supply, and Projects departments. This recruitment drive has garnered an overwhelming response from across the state. While 42,000 applications have been received for 169 vacancies, approximately 8,500 of these applications are from candidates residing within Pune city. Given that the remaining applications have been submitted by candidates from various other parts of the state, the decision was made to conduct the examination across seven different centers. Download Pune Mahanagarpalika JE Hall Ticket From below link
महापालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील 169 पदांसाठी होणारी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. 22, 23 आणि 29 एप्रिल रोजी राज्यातील सात ठिकाणी ही परीक्षा होणार असली, तरी परीक्षा केंद्रांच्या वाटपावरून उमेदवारांमध्ये तीव नाराजी पसरली आहे. याआधी दोन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आधीच अस्वस्थ असलेल्या उमेदवारांमध्ये आता प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांना नागपूर आणि नांदेडसारख्या दूरच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. तसेच, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबई येथेही केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, दूरवरच्या केंद्रांमुळे प्रवासाचे नियोजन करणे कठीण ठरत असून, रेल्वे व बसचे आरक्षण मिळवणेही आव्हानात्मक झाले आहे.
परिणामी, अनेकांना दोन दिवस आधीच प्रवास करावा लागत असून, त्यांचा खर्च लक्षणीय वाढत आहे. नागपूर व नांदेडमध्ये सध्या तीव उष्णतेची लाट असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही उमेदवारांनी चिंता व्यक्त केली आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असताना ती ऑनलाइन किंवा स्थानिक पातळीवर घेता आली असती, असे मतही विद्यार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे. दूरवर केंद्र देणे म्हणजे उमेदवारांना नाहक त्रास देण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया काहींनी नोंदवली आहे. आधीच दोनदा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर या निर्णयामुळे उमेदवारांमधील असंतोष आणखी वाढला आहे. प्रशासनाच्या मते पुण्यातील परीक्षा केंद्रांची क्षमता सुमारे 8 हजार उमेदवारांपर्यंत मर्यादित आहे, तर एकूण अर्जदारांची संख्या 23 हजारांच्या आसपास आहे. ‘जर क्षमता कमी असेल तर सोलापूर, नाशिकसारख्या जवळच्या शहरांमध्ये केंद्रे देण्याचा पर्याय का वापरला नाही?’ असा सवाल उमेदवारांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या वाटपाचा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. पुण्यात असलेल्या सेंटरची क्षमता ही केवळ आठ हजार विद्यार्थ्यांची आहे. मात्र, तब्बल 23 हजार मुलांनी पुणे सेंटर निवडले होते. टाटाची सेंटर राज्यात केवळ सात ठिकाणी आहे, याची कल्पना देखील मुलांना देण्यात आली होती. शक्यतोवर आम्ही मुलांना जवळची सेंटर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येकाला ते देणे शक्य नसल्याने काही मोजक्या विद्यार्थ्यांना लांबची सेंटर द्यावी लागली. असे सांगण्यात आले आहे.
तब्बल पावणेदोन वर्षापासून रखडलेली पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली असून, परीक्षेला पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील सात केंद्रांवर २२, २३ आणि २९ एप्रिल रोजी ही परीक्षा पार पडणार आहे. या भरतीसाठी तब्बल ४२ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये – बांधकाम, पथ, मलनिस्सारण, पाणीपुरवठा आणि प्रकल्प विभागात – कनिष्ठ अभियंत्यांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. या भरतीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. १६९ जागांसाठी ४२ हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी सुमारे साडेआठ हजार अर्ज पुणे शहरातील उमेदवारांचे आहेत. उर्वरित अर्ज राज्यातील विविध भागांतून आल्यामुळे सात केंद्रांवर परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिक्षेकरीता आता विभागीय वेबसाईट वर प्रवेशपत्र लिंक जाहीर करण्यात आली आहे उमेदवार लिंक द्वारे प्रवेशपत्र download करू शकता….

महत्वाच्या लिंक :
Download Pune Mahanagarpalika JE Hall Ticket 2026
हि भरती रखडल्याने अनेक विकासकामे रखडली असून, प्रशासनावर ताण वाढला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता कनिष्ठ अभियंत्यांची भरती तातडीने करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यापूर्वी १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर १६९ जागांसाठी नव्याने अर्ज मागविण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या संथ कारभारामुळे ही प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित राहिली. त्यातच महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भरती रद्द करण्यात आली. पुढे परीक्षार्थीच्या आक्षेपांमुळेही परीक्षा स्थगित करण्याची वेळ आली होती. या सर्व घडामोडींमुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. आता मात्र प्रशासनाने हालचालींना वेग देत परीक्षा घेण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड आणि नाशिक या सात शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. २२ आणि २३ एप्रिल रोजी दोन सत्रांमध्ये, तर २९ एप्रिल रोजी तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. ‘आयबीपीएस’च्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली.
गैरप्रकार केंद्रांवर कोणताही गैरप्रकार होऊ नये रोखण्यासाठी कडक बंदोबस्त
परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना आखल्या आहेत. प्रत्येक खोलीत १०० परीक्षार्थीमागे दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परीक्षा यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. दीर्घकाळ रखडलेली ही भरती अखेर मार्गी लागल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला असला, तरी परीक्षा सुरळीत आणि वादमुक्त पार पडते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग–३ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली हाती. या भरतीअंतर्गत एकूण १६९ पदे असून संबंधित पदासाठीची परीक्षा २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार होती. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेद्वारे भरण्यासाठी जाहिरात क्र. १/१५७९ प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची दिनांक २५/०१/२०२६ रोजी आयोजित केलेली परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सदर भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुव्यवस्था व उमेदवारांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींचा आढावा घेण्यात येत आहे. सदर परीक्षेची नवीन तारीख, वेळ व परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच निश्चित करून अधिकृत संकेतस्थळ तसेच प्रसारमाध्यमाद्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, अपप्रचार किंवा अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे. तसेच प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. उमेदवारांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, भरती प्रक्रिया अधिक सक्षम, सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने राबविण्याची ग्वाही दिली आहे.
सदर परीक्षेबाबत पुढील कार्यवाही किंवा नव्याने निश्चित होणारा परीक्षेचा दिनांक संदर्भातील माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in/mr/b/recruitment https://www.pmc.gov.in/en/b/recruitment प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या परीक्षेस उपयुक्त GK प्रश्न या लिंक वर उपलब्ध आहेत.

Admit Card Download Link
Pune Mahanagar Palika JE Papers 2022 PDF with Solution
PMC Admit Card Download
PMC Admit Card 2025Download Link From official website link will be available soon. As per the latest news report, PMC Bharti 2025exam will be scheduled in the month of Decmber. PMC Bharti Exam Dates and PMC Admit Card 2025 will be announced in the month of Dec 2-25. So, Now Candidates can check their PMC (Pune Municipal Corporation) Examination 2025 Exam Date in the admit card or Hall Tickets 2025 From this page. The PMC Hall Ticket 2025 will have Candidate Name, Roll Number, Father Name, Date and Time on which their examination will be held. Candidates should take a print of Hall tickets. The PMC Exam Center Address and Shift timing will be mentioned clearly on the admit card. Candidate can check PMC Call Letter 2025 for offline and Online examination, from the above table. We will keep adding Latest Updates & Exam Details on this page.
PMC Admit Card Download @ pmc.gov.in
| Organization | Pune Municipal Corporation |
|---|---|
| Short Name | PMC |
| Posts Name | Clerk, Junior Engineer, Assistant Inspector |
| Selection Process | Written Exam, Interview |
| Exam Mode | Offline/Online Exam |
| Official Site | https://pmc.gov.in/ |
PMC Hall Ticket , How to Check Exam Center
Steps to Download Hall Ticket
Candidates who don’t know exact steps to download Pune Municipal Corporation hall ticket, for them a step-wise procedure for downloading the PMC Admit Card 2025 is furnished below.
- Log-on to official website of PMC, i.e. https://pmc.gov.in/
- When PMC homepage open completely, click on Admit Card link
- Click on the job title for which admit card you want to download
- Fill all required filled, Ex. Registration ID, DOB, etc.
- Download the PMC Admit Card PDF.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















