Gram Sevak Bharti 2026
Gram Sevak Bharti 2024: ग्राम सेवक भरती संदर्भात एक महत्वाचा अपडेट घेऊन आम्ही आलो आहे. मित्रांनो, गावपातळीवरील प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांची अकोला जिल्ह्यात मोठी कमतरता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ५३४ ग्रामपंचायतींसाठी केवळ ३३८ ग्रामसेवक उपलब्ध असल्याने तब्बल १९६ पदे रिक्त आहेत. पदांच्या टक्केवारीचा विचार करता ६३.३० टक्के पदे भरण्यात आली असून ३६.३० टक्के पदे रिक्त आहेत. परिणामी अनेक ग्रामसेवकांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून, ग्रामीण भागातील नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसेवक असणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कारभार अतिरिक्त जबाबदारीवर चालविला जात आहे. आधीच ग्रामपंचायत स्तरावर कर वसुली, जन्म-मृत्यू दाखले, विविध प्रमाणपत्रे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, विकासकामांच्या प्रशासकीय मंजुरी, ग्रामसभा, निधी प्रस्ताव आणि इतर कार्यालयीन कामांचा मोठा ताण असतो. त्यात अतिरिक्त ग्रामपंचायतींची जबाबदारी आल्याने नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न साठी येथे क्लिक करा आणि ग्राम सेवक भरतीचे मागील वर्षीचे पेपर्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या-मोठ्या कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रमाणपत्रे, योजना आणि विकासकामांशी संबंधित कागदपत्रांसाठी विलंब सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावपातळीवरील विकासकामेही खोळंबत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ५३४ पैकी ६८ ग्रामपंचायतींची लोकसंख्या पाच हजारांपेक्षा जास्त आहे. अशा मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींसाठी पूर्णवेळ ग्रामसेवकाची आवश्यकता असताना, काही ठिकाणी ग्रामसेवकांकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने ग्रामस्थांची कामे उशिरा होत आहेत. या विलंबामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजी निर्माण होत असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे म्हणणे आहे. ग्रामसेवकांची रिक्तपदे तातडीने भरावीत, यासाठी ग्रामपंचायत अधिकारी युनियनने ग्रामविकास मंत्री आणि संबंधित सचिवांकडेही मागणी केली आहे. रिक्तपदांमुळे विद्यमान ग्रामसेवकांवर वाढलेला ताण कमी करणे आणि ग्रामस्थांची गैरसोय टाळणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. हा ‘खरे तर ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कणा असतो. अगदी जन्म-मृत्यूच्या दाखल्यापासून तर शेतकऱ्यांची संबंधित सगळी कामे सरकारी पातळीवर ग्रामसेवकच करीत असतो. नेमके आमच्या गावात ग्रामसेवक नसल्याने आम्हाला १२ किलोमीटरवर असणाऱ्या दुसऱ्या खेडेगावात जाऊन ग्रामसेवकाकडे कामे न्यावी लागतात. त्यांनाही दोन तीन गावांचा व्याप असल्याने साहजिकच कामांमध्ये दिरंगाईसुद्धा होते. मात्र जर ग्रामसेवक गावातच असले तर शेतकऱ्यांचे हेलपाटे वाचू शकतात,’ असे गोरव्हा येथील शेतकरी निवृत्ती पवार यांनी सांगितले.
ग्रामसेवक पदासाठी पात्रता : Gramsevak Eligibility Criteria For Gram Sevak Bharti 2026
- तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे आणि बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि जर बारावी मध्ये 60% गुण नसतील,
- तर कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी धारण केलीली असावी, पदवी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर अर्ज करू शकता,
- जसे की बीए, बीकॉम, बीएससी किंवा इतर कोणतीहि 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
- वरील पात्रतेत तुम्ही बसत असाल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी पात्र आहात.पदवी धारण केलेल्या उमेदवारास कोणत्याही टक्केवारीची अट नाही.
- किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण
- किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) (Engineering Diploma)
- किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (BSW)
- किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम (Agri Diploma)
- किंवा कृषि विषयाची पदवी (Agri Degree)
- किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती.
- संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. (MSCIT Or Related)
ग्रामसेवक भरतीसाठी वयाची गट | Gramsevak Bharti Age Limit 2026
ग्रामसेवक पदाला किती पगार असतो | Gramsevak Salary In Marathi 2026
परीक्षेची तयारी आणि स्वरूप (Gram Sevak Exam Details 2026)
- ग्रामसेवक भरतीसाठी मागील माहितीनुसार 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.
- मराठी या विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
- इंग्रजी विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
- अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
- सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
- कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण
- याप्रमाणे शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील असे एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.
- हे 200 गुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दीडतास कालावधी दिला जातो या दीडतासामध्ये तुम्हाला 200 गुणांचे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत.
- या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे कुठलाही प्रश्न जर चुकला तर त्याचे गुण कापले जाणार नाहीत म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता.
- प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य तो एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो.
राज्यातही अडचण मोठी
राज्यभरातही ग्रामसेवकांची कमतरता असल्याचा दावा ग्रामपंचायत अधिकारी युनियनने केला आहे. महाराष्ट्रात एकूण २७,७८२ ग्रामपंचायती असून, उपलब्ध ग्रामसेवकांची संख्या सुमारे २२ हजार आहे. त्यामुळे राज्यातही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून शासनाने तातडीने भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in वर याचा अधिक तपशील देण्यात आला आहे. त्याचा संकेताक २०२२१११५११२३०३६७२० असा आहे.
Previous Updates – यादीत ज्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी सरळसेवा परीक्षेचा अर्ज भरताना ज्या कागदपत्रांच्या आधारे सादर केला आहे. त्या सर्व मूळ कागदपत्र व त्या कागदपत्रांच्या दोन छायांकित प्रतीसह ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात उपस्थित राहावे लागणार आहे. ५२ जागांसाठी निवड व प्रतीक्षा यादीतील १९८ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषोअंतर्गत विविध संवर्गासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली लोकसभा निवडणुकीमुळे नियुक्ती आदेश देण्यासाठी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा अशी वेळ येऊ नये, यासाठी सामान्य प्रशासन विभाग कामाला लागले आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश मिळेल.
ग्रामसेवक रिक्त जागा व जाहिरात : Gramsevak Total Vacancies
| जिल्हा / District | रिक्त जागा |
|---|---|
| अमरावती / Amravati | 67 |
| सिंधुदुर्ग / Sindhudurg | 45 |
| अहमदनगर / Ahmednagar | 52 |
| उस्मानाबाद / (धाराशिव) / Osmanabad | 33 |
| वाशीम / Washim | 16 |
| नंदुरबार / Nandurbar | 1 |
| रत्नागिरी / Ratnagiri | 185 |
| जळगाव / Jalgaon | 74 |
| सांगली / Sangli | 52 |
| हिंगोली / Hingoli | 10 |
| नांदेड / Nanded | 83 |
| नाशिक / Nashik | 50 |
| गोंदिया / Gondia | 9 |
| बुलढाणा / Buldhana | 36 |
| धुळे / Dhule | 05 |
| पुणे / Pune | 37 |
| अकोला / Akola | 26 |
| ठाणे / Thane | 18 |
| नागपूर / Nagpur | 26 |
| रायगड / Raigad | 75 |
| पालघर / Palghar | 5 |
| परभणी / Parbhani | 33 |
| कोल्हापूर / Kolhapur | 57 |
| छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद / Aurangabad) | 15 |
| वर्धा / Wardha | 43 |
| लातूर / Latur | 04 |
| सोलापूर / Solapur | 74 |
| सातारा / Satara | 101 |
| चंद्रपूर / Chandrapur | 64 |
| बीड / Beed | 74 |
| जालना / Jalna | 50 |
| भंडारा / Bhandara | 33 |
| गडचिरोली / Gadchiroli | 44 |
| यवतमाळ / Yavatmal | 161 |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















