महापालिकेतील रखडलेली कनिष्ठ अभियंता भरती लवकरच! | PMC Admit Card Download 2025
PMC Admit Card 2025
महापालिकेतील १०० कनिष्ठ अभियंत्यांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे. मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय झाल्याने ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. या भरती प्रक्रियेसाठी आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महापालिकेने लोकसभा निवडणुकीपूर्वी १०० कनिष्ठ अभियंता भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार जाहिरात देऊन या पदांसाठी अर्जही मागवण्यात आले. मात्र, त्यावेळी मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातूनही अर्ज दाखल करण्याबाबत कुठलाच निर्णय झालेला नव्हता. त्यानंतर राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून नोकरभरतीत सामावून घेण्याचा अध्यादेश काढल्याने महापालिकेने अभियंता भरतीची प्रक्रिया थांबवली होती.
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महापालिकेकडून थांबवण्यात आलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आयपीबीएस या संस्थेच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबवण्यासाठीच्या परीक्षेचे नियोजन करण्याबाबत महापालिकेने चर्चा केली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीही (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा आदेश आहे. या पार्श्वभूमीवर अभियंता भरतीची नव्याने जाहिरात काढण्याची तयारी करण्यात येत आहे. यापूर्वी दाखल केलेल्या अर्जांबाबत, तसेच परीक्षा शुल्काबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पार पाडून १५ जानेवारीपर्यंत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे प्रयत्न असल्याचे पृथ्वीराज यांनी स्पष्ट केले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 113 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी 28,700 अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून ऑनलाइन परीक्षा न झाल्यामुळे भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाचा समावेश, तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता यामुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे, आणि परीक्षा 2025 मध्येच होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेने 2022 आणि 2023 मध्ये 748 पदांची भरती केली होती, ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशामक जवान, आणि आरोग्य विभागातील काही महत्त्वाची पदे यांचा समावेश होता. महानगरपालिकेच्या क्षेत्रवाढीमुळे कामाचा मोठा भार वाढला असून, रिक्त पदे भरणे आवश्यक झाले आहे. पहिल्या टप्प्यात 135 जागा भरल्यानंतर 113 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या भरतीसाठी मार्च महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. त्याचवेळी राज्य सरकारने मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या आरक्षणाचा समावेश करावा की नाही, याबाबत महापालिकेने नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले. त्यावर राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातून मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या मागासवर्ग विभागाकडून गेल्या तीन-चार महिन्यांपासून 113 जागांसाठी मराठा आरक्षणाचा समावेश करण्यासाठी बिंदुनामावली तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून एक महिना लागणार आहे. त्यानंतर तयार झालेला प्रस्ताव राज्य सरकारच्या मागासवर्गीय समितीकडे पाठविला जाईल. समिती हा प्रस्ताव तपासून आवश्यक सुधारणा करेल. तसेच खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना मराठा आरक्षणाचा पर्याय निवडण्याची संधी दिली जाईल, त्यानंतरच परीक्षा होणार आहे.
आचारसंहितेचा अडथळा
113 जागांच्या भरतीला लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता अडथळा ठरली. त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळेही निर्णय प्रक्रिया थांबली. या व्यत्ययामुळे ‘आयबीपीएस’ संस्थेसोबतचा करारही संपला असून, तो अद्याप नूतनीकरण करण्यात आलेला नाही.
महापालिकेच्या निवडणुकीचा दबाव
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आयबीपीएस संस्थेसोबतचा करार नूतनीकरण करणे, बिंदुनामावली अंतिम करणे, आणि उमेदवारांना आरक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देणे या गोष्टी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, ही भरती प्रक्रिया महापालिकेच्या निवडणुकीत अडकून आणखी लांबणीवर पडू शकते.
महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 113 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये 10 टक्के मराठा आरक्षणाचा समावेश करण्यास सरकारकडून निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांच्या आधारे सध्या बिंदुनामावली तयार करण्याचे काम सुरू असून, ‘आयबीपीएस’ संस्थेसोबतच्या कराराचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया 2025 मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली.
“मी कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज केला आहे, पण परीक्षा कधी होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. महापालिका प्रशासनाने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी,” असे एका उमेदवाराने सांगितले.
पुणे महापालिकेत आस्थापनेवर कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांमधून अभियांत्रिकी संवर्गात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज परीक्षा घेण्याची तयारी केली होती. मात्र याविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ही परिक्षा पुढे ढकलण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने आज होणारी परिक्षा पुढे ढकलली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता , उप अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना २५ टक्का ऐवजी १५ टक्के पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर ७५ टक्काच्या ऐवजी ८५ टक्के सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज परीक्षा घेण्याची तयारी केली होती. मात्र याविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ही परिक्षा पुढे ढकलण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने आज होणारी परिक्षा पुढे ढकलली आहे. या परिक्षेची पुढील तारीख न्यायालयाच्या निर्णया नंतर ठरवली जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलामध्ये अग्निशामक विमोचक (फायरमन) पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. यातील पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी २६ आॅक्टोबर ते २९ आॅक्टोबर या कालावधीत पाषाण येथील पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस कार्यालयाच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. महापालिकेने अग्निशामक विमोचक पदाच्या २०० जागांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आॅनलाइन परिक्षेनंतर त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ही चाचणी घेतली जाईल. पात्र उमेदवारांनी चाचणीसाठी सकाळी ०६.०० वाजता पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, यथे उपस्थित राहाणे आवश्यक आहे.
मैदानी चाचणीनंतर या उमेदवारांची पोहणे व अग्निशमन साहित्याची ओळख यांची चाचणी परीक्षा सहकारनगरमधील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण भवनात होणार आहे. पात्र उमेदवारांची यादी, वेळापत्रक व उमेदवारांसाठी सूचना याची सविस्तर माहितीखाली दिलेली आहे.
PMC Admit Card 2023 Download
PMC Admit Card 2023: PMC Admit Card Download 2023 Updates – PMC Admit Cards are available for downgliding. The candidates can download or Print their admit cards from following given link. Pune Municipal Corporation completed the recruitment process of 448 posts in 2022. After that, the recruitment process for 320 posts has been started in 2023. This includes 8 seats in Class I, 23 in Class II and 289 in Class III. The application deadline for this post is April 30 midnight. The online exam will be held in the end of May or first week of June for this direct service recruitment. After that, the final selection list will be announced after verifying the documents of the candidates appearing in the merit list. Here you can download PMC Hall Ticket as soon as it is available on Offcial PMC Handle. It is Updated On This Page.
पुणे महापालिकेने भरती २०२३ प्रवेशपत्र आज उपलब्ध झाले असून उमेदवार खालील लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ३२० जागांसाठी १० हजार १७१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदांसाठी २२ जून आणि ५ जुलै या रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. उमेदवारांना परीक्षेच्या प्रवेशपत्र उपलब्ध केलेआहेत. परीक्षा केंद्राची माहिती आयबीपीएस या परीक्षा घेणार्या संस्थेकडून घेण्यात येईल. त्यानुसार 11 पेपर असतील. यामध्ये अग्निशमन जवानांसाठी शारीरिक चाचणी परीक्षा हेणार आहे. यासाठी 22 जून रोजी क्ष किरण तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक (प्राणी संग्रहालय), कनिष्ठ अभियंता (विद्युत), अग्निशमन विमोचन या पदांसाठी परीक्षा होईल. तर 2 जून रोजी आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदांसाठी परीक्षा होईल. या परीक्षा तीन सत्रात होतील. या परीक्षा प्रक्रियेवर निरीक्षण करण्यासाठी परीक्षा केंद्रावर महापालिकेकडून 70 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अधीक्षक, उपाधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे. याबाबत बुधवारी या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेने गेल्यावर्षी ४४८ रिक्त जागांची भरती केली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्यात ३२० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सहा मार्च ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज मागवले होते. या पदभरतीमध्ये आरोग्य विभाग, अग्निशामक विभागातील रिक्त पदे भरण्यावर भर देण्यात आला आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवार महाभरती ला भेट देत राहा तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा व टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
How to Download Call letters / Admit Cards ?
- Click on Following Given Link
- Enter Registration No / Roll No and Password / DOB(dd-mm-yy) at the required places to download the Call Letter.
Download Call Letters / Admit Cards
२२ जून रोजी क्ष किरण तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, उप संचालक (प्राणी संग्रहालय), कनिष्ठ अभियंता (विद्युत), अग्निशामक विमोचन या पदांसाठी परीक्षा होईल. दोन जून रोजी आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदांसाठी परीक्षा होईल. या ऑनलाइन परीक्षा तीन सत्रात होतील. परीक्षेच्या किमान सात दिवस आधी एसएमएस किंवा इ-मेलद्वारे युजर आयडी व पासवर्ड पाठवला जाईल. त्याद्वारे उमेदवार परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले.
महापालिकेकडे आलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक स्पर्धा औषध निर्मातापदासाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. औषध निर्माता पदाच्या १५ जागांसाठी ३ हजार ३२ अर्ज आले आहेत. अग्निशामक विमोचन पदाच्या २०० जागांसाठी ३ हजार ५५५ अर्ज केले आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) १० जागांसाठी १ हजार ६७७, वाहन निरीक्षकाच्या तीन जागांसाठी २१६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
PMC Exam Date 2023
पुणे महापालिकेने ३२० जागांची भरती प्रक्रिया सुरू केलेली असताना यामध्ये १० हजार १७१ जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये सर्वात तीव्र स्पर्धा मिश्रक/औषध निर्माता या पदाच्या एका जागेसाठी २०२ जण स्पर्धेत आहेत तर कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदाच्या एका जागेसाठी १६७ जणांचे अर्ज आलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही शैक्षणिक क्षेत्रातील रोजगाराची स्थिती समोर आली आहे.
महत्वाच्या लिंक :
PMC GK For 2023 Exam
Pune Mahanagarpalika Previous Year Question Paper PDF
PMC Bharti List Of Documents Required
रिक्त पदांचा कामकाजावर परिणाम
पुणे महापालिकेत २०१२ पासून पदभरती झालेली नसल्याने अनेक पद रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. वर्ग तीनचे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले जात आहेत. पण हे कर्मचारी पुरेसे नाहीत, तसेच कनिष्ठ पदांवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत, त्यामुळे जुने कर्मचारी पदोन्नतीने वरच्या पदावर गेल्यानंतर त्या जागा रिक्तच राहत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामात गोंधळ निर्माण होत आहे. पुणे महापालिकेने २०२२ मध्ये राबविलेल्या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यांत्रिकी आणि वाहतूक नियोजन, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, लिपिक, सहाय्यक विधी सल्लागार या पदांची भरती केली. दुसऱ्या टप्प्यात ११ पदांची होणार आहे.
Pune Mahanagarpalika Exam Date 2023
महापालिकेने ११ पदांसाठी ३२० जागांची भरती सुरू केली आहे. त्याची अर्ज भरण्याची मुदत ३० एप्रिल रोजी संपली. या उमेदवारांची आॅनलाइन परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. याची माहिती उमेदवारांना सात दिवस आधी कळवली जाईल.
– सचिन इथापे,
उपायुक्त, सेवक वर्ग विभाग
पदाचे नाव, उपलब्ध जागा आणि अर्ज संख्या
क्ष किरण तज्ज्ञ- ८ – १२
वैद्यकीय अधिकारी- २० – ४५०
प्राणी संग्रहालय उपसंचालक- १ – ९
पशू वैद्यकीय अधिकारी- २ – ४७
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक- २० – ७३८
आरोग्य निरीक्षक- ४० – २०९
कनिष्ठ अभियंता (विद्युत)- १० – १६७७
वाहन निरिक्षक- ३- २१६
मिश्रक/औषध निर्माता- १५ -३०३२
पशुधन पर्यवेक्षक- १ – २२६
अग्निशामक विमोचक- २००- ३५५५
PMC Admit Card 2022 – Clerk Typist
PMC Admit Card 2022: Pune Municipal Corporation was declared the Clerk Typist Recruitment 2022. There are a total of 200 vacancies available to fill. The exam admits card will be available soon. visit https://pmc.gov.in/mr/recruitments & https://pmc.gov.in/en/recruitments for more details about the admit card. Further details are as follows:-
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-२ व वर्ग-३ संवर्गामधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्र. १/३९८ दि.२०/०७/२०२२ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरात क्र. १/३९८ मध्ये नमूद पदांपैकी पुढील पदांसाठी परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
मित्रांनो, जर आपण या भरतीसाठी अर्ज दाखल केला असेल तर आपण त्वरित अभ्यासाला लागणे खूप आवश्यक आहे, कारण आता लवकरच आपले परीक्षेचे प्रवेशपत्र सुद्धा उपलब्ध झालेत. तसेच आपण सर्वप्रथम भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा काळजीपूर्वक बघावे, म्हणजे आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा आणि टाइम मॅनेजमेन्ट करणे सोपे होईल. तसेच्या ज्या विषयात आपण वीक आहात त्याचा जास्त सराव सुद्धा करता येईल. अजून एक महत्वाचे म्हणजे टेस्ट सिरीज, PMC २०२२ लेखी परीक्षेला समोर ठेवून यासाठी या लिंक वरून आपण रोज नवीन सराव पेपर्स मोफत सोडवू शकता. या मोफत टेस्ट सिरीजचा फायदा घेऊन रोज प्रकाशित होणारे नवीन पेपर्स सोडवत रहावे, यातील यातील प्रश्न आपल्याला टाइम मनेजमेंट आणि आपला झालेला अभ्यास जाणून घेण्यास मदत करतील.
महत्वाच्या लिंक :
प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल ?
कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचे वर क्लिक करा. लॉगिन पृष्ठावर जा, नंतर कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी आवश्यक ठिकाणी नोंदणी क्रमांक / रोल नंबर आणि पासवर्ड / DOB(dd-mm-yy) हि माहिती काळजीपूर्वक टाका.
उपरोक्त परीक्षेकरिता संबधित उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. उमेदवारांना परीक्षेच्या किमान ७ दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी SMS/ Email द्वारे युजरआयडी व पासवर्ड पाठविण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://pmc.gov.in/mr/recruitments & https://pmc.gov.in/en/recruitments लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र Download करून घ्यावे. त्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्र. १८००२२२३६६, १८००१ ० ३४५६६ किंवा हेल्पलाईन लिंक http://cgrs.ibps.in वर संपर्क साधावा. परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे परीक्षा प्रवेशपत्र व सूचनांनुसार फोटो असलेले ओळखपत्र नसल्यास उमेदवागम परीक्षेकरिता प्रवेश नाकारला जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. परीक्षा केंद्र व वेळ प्रवेशपत्रावर नमूद केलेप्रमाणेच असेल याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात – https://bit.ly/3rn6agO
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3BJqJdf
PMC Admit Card 2022
PMC Admit Card 2022: Pune Municipal Corporation (PMC) has declared a admit card. The exam will be held From the 26th of September 2022 to the 4th of October 2022. Click on the below link to download the hall tickets.
PMC JE Hall Tickets 2022
पुणे महानगपालिकेच्या आस्थापनेवरील परीक्षेकरिता प्रवेश पत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा खालील तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेश पत्र डाऊनलोड करणेकरिता तसेच अधिक माहितीकरिता खालील भरती बाबतच्या माहितीच्या लिंकवर क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PMC Hall Ticket 2022 Check Pune Municipal Exam Schedule
-
महत्वाच्या लिंक :
Name of Organization | The Pune Municipal Corporation (PMC) |
Name of posts |
|
Level of Examination | State |
Total no. of posts | 304 Vacancies |
Exam date | Mentioned Above as per given on Admit Cards |
Article Category | Admit Card |
उपरोक्त परीक्षेकरिता संबधित उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र धारण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना परीक्षेच्या किमान ७ दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी SMS/ Email द्वारे युजर आयडी व पासवर्ड पाठविण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://pmc.gov.in/mr/recruitments व https://pmc.gov.in/en/recruitments लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र Download करून घ्यावे. त्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्र. १८००२२२३६६, १८००१०३४५६६ किंवा हेल्पलाईन लिंक http://cgrs.ibps.in वर संपर्क साधावा. परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे परीक्षा प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेकरिता प्रवेश नाकारला जाईल आणि त्याची सर्वस्वी जवाबदारी उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी.परीक्षा केंद्र व वेळ प्रवेशपत्रावर नमूद असलेप्रमाणे असेल. उर्वरित पदांसाठी परीक्षेचा तपशील यथावकाश घोषित करणेत येईल.
सविस्तर माहिती – https://bit.ly/3dmxng4
प्रवेश पत्र डाऊनलोड करा – https://bit.ly/3BJqJdf
परीक्षेबाबत माहिती पुस्तिका – https://bit.ly/3BlpSxX
How to download the PMC Exam 2022 Hall Ticket?
As given above, we have already added all the important links in the article. The recruitment authority uploaded the admit card on the website you will be able to download it by using the right credentials. Follow the given mentioned instructions in order to download the admit card-
- Visit the official website of PMC Bharti 2022 at pmc.gov.in
- On the homepage, click on the “Recruitment Advertisement” tab.
- Now you will be redirected to a new webpage.
- Then, click on the tab titled “Hall Ticket”.
- Fill in the required information of candidates such as Application Number, Password, etc.
- Now check the information you entered and click on the “Submit” button.
- Now the PMC Bharti Hall Ticket for Clerk, JE will get downloaded on your device.
- To carry it to the examination center, take out a print of it on an A4 size paper.
PMC Admit Card 2022 – PMC Exam Date 2022, PMC Admit Card 2022, Hall Ticket Update – मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या मेगाभरती (PMC Recruitment 2022) संदर्भात नवीन महत्त्वाची अपडेट आजच हाती आली आहे. या नवीन प्राप्त बातमी नुसार, पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation 2022) मेगाभरतीसाठीची परीक्षा ऑक्टोबर २०२२ महिन्यात होणार आहे. ही परीक्षा दोन ते तीन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 448 जागांसाठी भरतीप्रक्रिया (PMC Bharti 2022 Exam Date) सुरु करण्यात आली आहे. अर्जही मागवण्यात आले आहेत. हजारो इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखलही झाले आहेत. 448 जागांसाठी तब्बल 87 हजारपेक्षाही जास्त जणांनी अर्ज केले आहेत.
पुणे महापालिकेत मेगाभरती होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. ऑनलाईन, ऑफलाईन अशा पद्धतीने इच्छुकांना अर्ज सादर करता येणार होते. दरम्यान, 448 जागांसाठी एकूण 87 हजार 471 उमेदवारांनी आतापर्यंत शुल्कासहित अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया पार पडेल.
या परीक्षेची तयारी कशी कराल ?
कोण कोणत्या पदांसाठी भरती?
पुणे पालिकेत असिस्टंट लीगल ऑफिसर, क्लार्क टायपिस्टर, ज्युनिअर इंजिनिअर, असिस्टंट एनकॉर्चमेन्ट इन्स्पेक्ट ही पदं रिक्त आहेत. यातील क्लर्क टायपिस्टसाठी 200 तर असिस्टंट एनकॉर्चमेन्ट इंस्पेक्टसाठी 100 पदांची भरती करण्यात येणार आहे. तर ज्युनिअर इंजिनिअरच्या सिव्हिल, मॅकेनिकल, ट्रॅफिक प्लानिंग या पदांसाठीही भरती केली जाणार आहे. त्यातील सिव्हिल इंजिनिअरसाठी 135 जागा असून मॅकेनिकलच्या 5 तर ट्रॅफिक प्लॅनिंगच्या 4 पदांवर भरती केली जाईल.
या मेगाभरतीसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, टायपिंग टेस्ट, कागदपत्रांची पडताळणी, अशी टप्प्याटप्प्याने निवडप्रक्रिया पार पडले. वय वर्ष 18 ते 38 वयोगटातील इच्छुक उमेदवारांना पुणे पालिकेत नोकरीची संधी चालून आली आहे. कोरोनामुळे लांबलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पुणे पालिकेत नोकरी मिळावी, यासाठी अर्ज केल्याचं पाहायला मिळालंय.
PMC Admit Card 2022 Download
PMC Admit Card 2022 Download Link From official website link will be available soon. As per the latest news report, PMC Bharti 2022 exam will be scheduled in the month of October. PMC Bharti Exam Dates and PMC Admit Card 2022 will be announced in the month of September. 448 posts are going to be recruited under PMC Recruitment 2022.
So, Now Candidates can check their PMC (Pune Municipal Corporation) Examination 2022–23 Exam Date in the admit card or Hall Tickets 2022 From this page. The PMC Hall Ticket 2022 will have Candidate Name, Roll Number, Father Name, Date and Time on which their examination will be held. Candidates should take a print of Hall tickets. The PMC Exam Center Address and Shift timing will be mentioned clearly on the admit card. Candidate can check PMC Call Letter 2022 for offline and Online examination, from the above table. We will keep adding Latest Updates & Exam Details on this page.
PMC Admit Card 2022-23 Download @ pmc.gov.in
Organization | Pune Municipal Corporation |
---|---|
Short Name | PMC |
Posts Name | Clerk, Junior Engineer, Assistant Inspector |
Selection Process | Written Exam, Interview |
Exam Mode | Offline/Online Exam |
Official Site | https://pmc.gov.in/ |
PMC Hall Ticket 2022, How to Check Exam Center
Steps to Download Hall Ticket 2022
Candidates who don’t know exact steps to download Pune Municipal Corporation hall ticket, for them a step-wise procedure for downloading the PMC Admit Card 2022 is furnished below.
- Log-on to official website of PMC, i.e. https://pmc.gov.in/
- When PMC homepage open completely, click on Admit Card link
- Click on the job title for which admit card you want to download
- Fill all required filled, Ex. Registration ID, DOB, etc.
- Download the PMC Admit Card PDF.
Table of Contents
[…] पुणे महानगरपालिका ऑनलाइन परीक्षा जून… […]
Sir mala job midel ka