पुणे महानगरपालिकेत १०८६ रिक्त पदांना मान्यता
अत्यावश्यक सेवेसाठी सरकारचा आदेश
करोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी रिक्त असलेल्या पदांपैकी एक हजार ८६ पदे भरण्याची परवानगी दिली आहे. वित्त विभागात गेल्या अडीच वर्षांपासून अडकलेला हा प्रस्ताव पवार यांनी अवघ्या दोन दिवसांत मार्गी लावल्याने महापालिकेत लवकरच मेगाभरती अपेक्षित आहे.
महापालिकेचा कामाचा निपटारा योग्य वेळेत होण्यासाठी आरोग्य, अग्निशमन आणि घनकचरा विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांची भरती करण्याचा प्रस्ताव ८ नोव्हेंबर २०१७ला राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. पालिकेने वर्ग एक ते चार यामध्ये १८९३ पदे रिक्त असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे १२४८ पदे भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. राज्य सरकारने त्यापैकी एक हजार ८६ पदे भरण्यास परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारने मंजुरी दिल्याचा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
‘करोना’च्या पार्श्वभूमीवर पालिकेला डॉक्टरांची उणीव भासत असल्याने अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रस्ताव मंजूर करण्याची गरज पवार यांच्या निर्दशनास आणून दिली. पवार यांनी प्रस्तावाची तत्काळ माहिती घेऊन वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पालिकेचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. त्यानुसार एक हजार ८६ पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मान्य करण्यात आलेली पदे
- गट अ : १२३
- गट ब : ९२
- गट क : ४०३
- गट ड : ४६८
‘ही काळजी घ्या’
महापालिकेने रिक्त पदे भरताना आस्थापना खर्च हा ३५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वित्त विभागाच्या धोरणानुसार, ‘गट क’ आणि ‘गट ड’मधील सर्व पदे नियमित भरण्याऐवजी सहजरित्या जी कामे यंत्रणेकडून शक्य असल्यास ती करून घ्यावीत, अशी विशेष सूचनाही सरकारने या पदांची मान्यता देताना केली आहे.
How to apply this ,what is website to collect information regarding this posts