कोरोनामुळे रोजगार गेलेल्यांना सरकारतर्फे अर्थसाह्य मिळणार? यूबीआय योजनेचा विचार

UBI Yojana For CORONA Effect

UBI Yojana For CORONA Effect – कोरोनामुळे अनेकांना घरीच राहावं लागत आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. कोरोनाचा रोजगारावर परिणाम होणाऱ्यांना युनिवर्सल बेसिक इन्कमद्वारे (UBI) मदत करण्याचा सरकार विचार करीत आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. पंतप्रधान शेतकरी योजनेच्या पद्धतीने कोणत्याही अटीविना आर्थिक मदत संबंधितांना केली जाईल.

कोरोनाचा सर्वाधिक विपरित परिणाम झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, टूर अँड ट्रॅव्हल अशा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना तसेच स्वयंरोजगारावर अवलंबून असाणा-यांना ठराविक रक्कम देण्याची ही योजना असू शकेल, असे संबंधित सरकारी अधिका-याने सांगितले आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाºयांना, पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे रोजगार करणाºयांनाही या योजनेचा फायदा मिळू शकेल. तसेच आर्थिक मंदीतून बाहेर पडणे शक्य होईल.

ही रक्कम देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट सरकार घालणार नाही. रोजगार गेल्याने हातात पैसा नसल्यामुळे संबंधितांना जगता यावे, यासाठी ही रक्कम असेल, असे वृत्तात म्हटले आहे. अमेरिका व हाँगकाँगसह काही देशांनी अशी रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशची घोषणा
युनिवर्सल बेसिक इनकम योजनेद्वारे सरकार काही लाख लोकांना अशी मदत करू शकेल. ज्यांना कामावर जाण्याची आणि घरी बसण्याचीच सक्ती करण्यात आली आहे, त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकेल. उत्तर प्रदेश सरकारने असंघटित क्षेत्रातील आणि ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे, अशांना ठराविक रक्कम देण्याची घोषणा केली आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Vikas Tanaji Bodare says

    महाराष्ट्र iti तासिका निदेशक आहे त्यांना 17 दिवसाचे काय मिळतील का

  2. Karuna d telgote says

    मी एक महिला आहे मला नोकरीची गरज आहे मी अकोट तालुक्यामध्ये राहत आहे मला लहान दोन मुली आहेत मी बारावी फेल आहे मला माझ्या शहरांमध्ये नोकरी मिळणार काय माझं वय 32 आहे मला गव्हर्मेंट जॉब मिळणार का

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप