उद्या पासून लॉकडाऊन – नेमके काय होईल?

Maharashtra Lock Down

Maharashtra Lock Down

> औषधे, भाजीपाला, किराणा दुकाने सुरू राहतील. धान्याची आवक, बँका सुरू राहतील.

> महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.

> रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस बंद पूर्णपणे बंद.

> जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरू राहील.

> शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.

> आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून मुंबई महाराष्ट्रात येणारी विमाने बंद.

> ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे व ज्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.

> ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल.

> सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरू राहील पण भाविकांसाठी प्रवेश बंद असेल.

आपणा सर्वांसाठीच कठीण काळ सुरू झाला आहे. त्यामुळेच पुढची पावले टाकावी लागत आहेत. जी जिद्द आपण आजवर दाखवली आहे. ती यापुढेही दाखवण्याची गरज आहे. ही आपली परीक्षा आहे आणि आपल्याला ती पास करायची आहे. करोनाला हरवायचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. सरकार या संकटात गंभीर आहे. सर्व यंत्रणा झटून काम करत आहे. चाचणी केंद्रे वाढवण्यात येत आहेत. या सर्वांत आम्हाला तुमचे सहकार्य हवे आहे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापासून ते आपल्या गावातील सरपंचापर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या संकटाचा संयमाने सामना करायला हवा. यात माणुसकीही बाळगायला हवी. जे कंत्राटी आणि तात्पुरते कामगार आहेत त्यांना किमान वेतन दिले गेले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

लोकांचं आरोग्याच्या दृष्टीनं हे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. यासाठी साठेबाजी, काळाबाजार करु नये. तसेच धार्मिक ठिकाणी भाविकांनी गर्दी करु नये. यासाठी ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश सर्वांनी पाळायला हवा. 

मुंबईतील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत बंद

करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने गर्दी रोखण्यासाठी अखेर रेल्वेने मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारही मार्गांवरील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला.
जनता कर्फ्यू असल्याने आज मुंबईतील लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. केवळ ६० टक्केच लोकल आज धावत आहेत. ही सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंतच असेल. रात्री १२ नंतर लोकलसेवा पूर्णपणे बंद करण्यात येईल. ३१ मार्चपर्यंत ही सेवा स्थगित राहील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबईप्रमाणे कोलकातामधील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप