New Education Policy : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून, या बदलांना अनुसरून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ अर्थात ‘बालभारती’ने नव्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे. चारही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम आता वेगाने सुरू झाले आहे..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२३ आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ यांच्या आधारे राज्यातील इयत्ता तिसरी ते दहावीचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू असून, त्यानुसार विविध इयत्तांसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू केली जात आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिली, तर २०२६-२७ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. आता २०२७-२८ पासून पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती नवा अभ्यासक्रम आणि नवी पाठ्यपुस्तके येणार आहेत. दरम्यान, यंदा इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या मसुद्याला सुकाणू समितीची मान्यता मिळण्यास झालेल्या विलंबाचा परिणाम पाठ्यपुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेवर झाला होता.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची तयारी सुरू झाली आहे. सध्या या इयत्तांच्या अभ्यासक्रमाच्या मसुद्यावर काम सुरू असून, पाचवी, सातवी आणि नववीची पाठ्यपुस्तके जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर अकरावीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांचे मसुदे अंतिम झाल्यानंतर छपाईची प्रक्रिया हाती घेतली जाईल. पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना नवी पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी ‘बालभारती’कडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याची माहिती संचालक अनुराधा ओक यांनी दिली.
नव्या पाठ्यपुस्तकांची परिणामकारकता तपासण्याचे नियोजन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत पाच इयत्तांमध्ये नवा अभ्यासक्रम आणि नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली आहेत. या नव्या पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर नेमका किती परिणाम झाला, हे तपासण्यासाठी आता त्यांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी त्रयस्थ संस्थेची मदत घेतली जाणार असून, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी थेट संवाद साधून पाठ्यपुस्तकांबाबतचे अनुभव व अभिप्राय जाणून घेतले जातील. या मूल्यांकनासंदर्भात बालभारतीच्या संचालक मंडळात चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती संचालक अनुराधा ओक यांनी दिली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















