MBBS-BDS प्रवेशाची पहिली यादी जाहीर! MBBS ५३८, BDS ४९३; प्रवेशासाठी ही अंतिम तारीख !! | NEET UG Result 2026

NEET Exam Result 2026 

NEET Exam ResultNEET UG 2026 च्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी तसेच कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या फेरीत एमबीबीएसचा कट ऑफ ५३८ गुण, तर बीडीएसचा कट ऑफ ४९३ गुण इतका राहिला आहे. या प्रवेश फेरीत तब्बल १०,५०९ विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे आणि डीडीसह आपला प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला आता वेग आला असून, एमबीबीएस आणि बीडीएसच्या पहिल्या प्रवेश फेरीची यादी जाहीर झाली आहे. सीईटी सेलमार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य कोट्यातील एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या फेरीत दोन्ही अभ्यासक्रमांच्या एकूण १० हजार ६४६ जागांपैकी तब्बल १० हजार ५०९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये एमबीबीएसच्या ८ हजार १२९ जागांपैकी ८ हजार ६५ विद्यार्थ्यांना, तर बीडीएसच्या २ हजार ५१७ जागांपैकी २ हजार ४४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, एमबीबीएसमध्ये दिव्यांग व अनाथ संवर्गातील ६४ जागा, तर बीडीएसमध्ये याच संवर्गातील ७३ जागा रिक्त राहिल्या आहेत.

…तर प्रवेश रद्द

प्रवेश निश्चित करताना शुल्क भरण्याबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी शुल्क भरण्यासाठी धनादेशाद्वारे पेमेंट करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी पुढील कामकाजाच्या दिवशी हा धनादेश डिमांड ड्राफ्टने बदलून सादर करणे अनिवार्य असणार आहे. उमेदवाराने निर्धारित मुदतीत डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास त्याचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा सीईटी सेलने दिला आहे.

  • राज्य कोट्यातील प्रवेशासाठी प्रक्रियेस प्रारंभ
  • ‘एमबीबीएस’च्या ८ हजार ६५ विद्यार्थ्यांना संधी
  • ‘बीडीएस’च्या २ हजार ४४४ विद्यार्थ्यांना संधी

पहिल्या प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे तसेच शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक असणार आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड