Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्वाची बातमी – लिपिक टंकलेखक व कर सहायक उमेदवारांच्या प्रमाणात आता कोणताही बदल करण्यात येणार नाही ! MPSC Lipik Bharti 2023

MPSC Lipik Bharti 2024

MPSC Lipik Bharti 2024

MPSC Lipik Bharti 2024: The Commission has received/are receiving a large number of candidates’ representations regarding the increase in the ratio of candidates qualifying for the Typing Skill Test of the Clerk Typist and Tax Assistant Cadre from 1:3 to 1:5 in the Maharashtra Group-C Service Main Examination 2023. In this regard, the candidates are informed that in the advertisement of Maharashtra Group-C Service Main Examination 2023 published on 13th October, 2023 for the cadre presented by the Commission, in point no. There is a provision that the candidates will be available for Typing Skill Test, thus the minimum cut off line of marks will be fixed. No change in the said provision will now be possible at the stage after the main examination.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ या स्पर्धा परीक्षेमधुन भरावयाच्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणा-या उमेदवारांचे प्रमाण १:३ वरुन १:५ करण्याबाबत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अभिवेदने प्राप्त झाली/होत आहेत. या संदर्भात उमेदवारांना अवगत करण्यात येते की, आयोगामार्फत प्रस्तुत संवर्गाकरीता दिनांक १३ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक १०.२.५ मध्ये ‘भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी सुमारे ३ पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील, अशा रितीने गुणांची किमान सिमारेषा (cut off line) निश्चित करण्यात येईल’ अशी तरतुद आहे. सदर तरतुदीमध्ये आता मुख्य परीक्षेनंतरच्या टप्प्यावर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Lipik Tanklekhan Certificate Update

MPSC Lipik Tanklekhan Certificate Update


MPSC Process used for assessment of response sheets of Typing Skill test

MPSC Lipik Bharti 2023: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced a new procedure for the examinations for the posts of ‘Clerk-Typist, Tax Assistant’ requiring typing. According to this, the candidates will be able to choose either Marathi or English typing skill test for the main examination in Clerk-Typist recruitment. To get all the further updates regarding this recruitment on time, visit MahaBharti.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ‘लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक’ या टंकलेखन आवश्यक असलेल्या पदांच्या परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती जाहीर झाली आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक पद भरतीत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

लिपिक-टंकलेखक पद भरतीत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार आहे. तसेच कर सहाय्यक पदासाठी दोन्ही भाषांतील टंकलेखन कौशल्य चाचण्या द्याव्या लागणार आहेत. दोन्ही पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी अहर्ताकारी स्वरूपाची केली आहे. ‘एमपीएससी’ने या संदर्भात माहितीपत्रक काढले आहे.

लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक या पदांच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी आणि अन्य बाबींचा साकल्याने विचार करून कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक पदासाठीच्या पदभरतीत संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.

लेखी परीक्षेच्या आधारे संबंधित पदांसाठी भरल्या जाणाऱ्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवले जातील. ही कार्यपद्धती यापुढे होणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीला लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अपंग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी आणि दोन संधी लागू असल्याने या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे

Advt.No.58/2022 and 60/2022 -Announcement- Process used for assessment of response sheets of Typing Skill test


MPSC Lipik Tanklekhan Certificate New Rule

MPSC Lipik Bharti 2023: Typing Skill Test (Typing Skill Test) has been implemented for the examinations of Clerk-Typist and Tax Assistant cadres which require typing qualification organized by Maharashtra Public Service Commission. In this regard, after considering the provisions of the entry rules of the concerned cadre and other matters, the Commission has taken the following decision. Candidates can download full MPSC Clerk Typist Certificate New Rule From below PDF

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गाच्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी व इतर बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगाकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

(१) लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
(२) टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.
(३) लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरविण्यात येतील.
(४) लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता मुख्य परीक्षेस अर्ज करतेवेळी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीपैकी कोणतीही एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येईल. उमेदवारांनी निवड केलेल्या मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाची कौशल्य चाचणी आयोगातर्फे घेण्यात येईल व त्या चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल. तसेच कर सहायक संवर्गाकरीता उमेदवारांना मराठी व इंग्रजी या दोन्ही कौशल्य चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल.
(५) टंकलेखन कौशल्य चाचणीचा तपशील :-

Details of MPSC Typing Skill Test 

Details of MPSC Typing Skill Test 

(९) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-१११४/प्र.क्र.२००/१६-अ, दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ अन्वये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे सदर वर्गातून आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही..
(१०) टंकलेखनातील त्रुटी/चुकांसंदर्भात टंकलेखनासाठी परीक्षेमधील परिच्छेदामध्ये Key Depression कितीही असले तरी, मराठीसाठी प्रथम १५०० Key Depression व इंग्रजीसाठी प्रथम २००० Key Depression नुसार तयार होणा-या शब्दांच्या शेकडा प्रमाणात त्रुटी/चुका पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
उदाहरणार्थ १९०० key depression असलेल्या एखाद्या मराठी उता-यात प्रत्यक्ष पात्रता ठरविताना त्या उता- यातील पहिल्या १५०० key depression नुसार जर २३६ शब्द तयार होत असतील तर उमेदवारांच्या पात्रतेसाठी खालीलप्रमाणे निकष लागू होईल:-
अराखीव उमेदवार २३६ शब्दांपैकी २१९ बरोबर शब्द
राखीव उमेदवार २३६ शब्दांपैकी २१२ बरोबर शब्द
२. टंकलेखन कौशल्य चाचणीबाबतच्या इतर सुचना / माहिती आयोगाकडून वेळोवेळी अवगत करण्यात येईल.
३. प्रस्तुत कार्यपध्दत यापुढे घेण्यात येणा-या टंकलेखन कौशल्य चाचणीस लागू राहील

Download Full MPSC Clerk Typist Bharti Certificate new Rule

MPSC Lipik Bharti 2023 Update

MPSC Lipik Bharti 2023 – The process of filling seven thousand 34 posts in Group C Clerical Cadre is going on through Maharashtra Public Service Commission. In this recruitment, the candidates will have the option to give one or more appointing authorities according to the order of preference of the appointing authority. Also, Minister Gulabrao Patil said that the final recommendation list will be published according to the order of preference of the candidates by the appointing authority. Know More Update MPSC Lipik Bharti 2023 at below

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सात हजार 34 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रमानुसार एक किंवा अनेक नियुक्ती प्राधिकारी देण्याची मुभा असणार आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

लिपिकवर्गीय संवर्गातील भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम देण्याची मुभा – मंत्री गुलाबराव पाटील

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘ब’ व ‘क’ संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील गट ‘क’ च्या भरती अनुषंगाने सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, राज्य शासकीय कार्यालयातील गट- ‘क’ मधील लिपिकवर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामधील प्रथम टप्प्यात लिपिक-टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अराजपत्रित गट-‘ब’ व गट-‘क’ संवर्गातील एकूण ८ हजार १६९ पदभरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ८ हजार १६९ पदांमध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गाची ७ हजार ३४ पदे अंतर्भूत आहेत. प्रस्तूत जाहिरातीस अनुसरुन एकूण ४ लाख ६६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी एकूण २८१ नियुक्ती प्राधिकारी निश्चित केले आहेत.

उमेदवारांना अर्ज सादर करतांना पसंतीक्रम देण्याची मुभा आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल भागातील उमेदवारांनासुद्धा त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या पसंतीच्या कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या तरतुदीमुळे कोणताही उमेदवार अपात्र ठरणार नाही असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.


MPSC Lipik Recruitment 2023

MPSC Lipik Bharti 2023 Students and parents are very happy to inform in accordance with this advertisement and for many years the government did not recruit the youth to participate in government jobs, due to which the students who were preparing for the competitive examination were depressed, now their wait is over because now the government of Maharashtra has announced the ministerial administrative department as well as the state government Clerk Vacancies.

Recruitment advertisement has been published in various offices in Maharashtra and in this the most recruitment has been published for the post of Clerk Typist 7034. However, those students who have not cleared the Typing Certificate Examination should immediately take admission in their nearest government recognized Typing Institute and take Typing Course so that the upcoming There will be no difficulty in filling the form in the post recruitment.

७ हजार पेक्षा जास्त लिपिक पदांसाठी करा अर्ज, पगार रुपये 19900 – 63200

एमपीएससी (MPSC) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण ७०३४ पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीकडून 8169 पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात सर्वाधिक ७०३४ पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार (ता.२५) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल. कोणत्या विभागात, कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल आणि वेतनश्रेणी किती असेल या संदर्भात जाणून घेऊयात..तसेच जर आपण MPSC परीक्षेची तयारी करत असाल तर या लिंकवरून नवीन पॅटर्न नुसार अपेक्षित प्रश्नसंच सोडवू शकता…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यशासनाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, एमपीएससीच्या वतीने विविध संवर्गांसाठी ही मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

  • पदाचे नाव – लिपिक-टंकलेखक
  • पदसंख्या7034 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

महत्त्वाच्या तारखा – MPSC Clerk Online Application Important date

– अर्ज करण्याची मुदत ः १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी

– ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत ः १४ फेब्रुवारी

– भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देण्याची मुदत ः १६ फेब्रुवारी

– चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ः १९ फेब्रुवारी

– संयूक्त पूर्व परीक्षा २०२३ ः ३० एप्रिल

– गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ः २ सप्टेंबर २०२३

– गट क संयुक्त मुख्य परीक्षा ः ९ सप्टेंबर २०२३

Educational Qualification For Maharashtra Lipik Bharti 2023

लिपिक-टंकलेखक 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

Tanklekhan Educational Criteria

MPSC Clerk Typist Salary

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपिक-टंकलेखक S-६ : रु.१९९००-६३२०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)

How To Apply Fill MPSC Lipik Online Application Form 2023 |mpsconline.gov.in

  • Candidates you have to register using their Email ID and Contact Number on the official website https://mpsc.gov.in.
  • Save the Username and Password provided after the registration.
  • Log in with your credentials and fill in all the details in the application form.
  • Upload scanned copies of the documents in the blank space provided in the application form, such as the Degrees and Certificates.
  • Candidates from reserved categories are required to submit relevant category certificates along with other documents.
  • In addition, scanned copies of a recent Passport-size Photograph and a Signature is to be uploaded.

 टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट (कर सहायक व लिपिक-टंकलेखक पदाकरीता) :-

  • दिव्यांग उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अपंग- २०१६/प्र.क्र.११६/१६-अ, दिनांक १६ नोव्हेंबर, २०१६ नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
  • माजी सैनिक वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१८०/२८, दिनांक १३ जून, २०१९ अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
  • अनाथ उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अनाथ- २०२२/प्र.क्र.८४/१का-०३, दिनांक ०७ जुलै २०२२ नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अहंता अनिवार्य नाही.
  • प्रकल्पग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- १११४/प्र.क्र.२००/१६-अ, दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
  • भूकंपग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- १११४/प्र.क्र.२००/१६-अ, दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे भूकंपग्रस्त आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
  • पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- १११४/प्र.क्र.२००/१६-अ, दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

निवडप्रकिया :- MPSC Clerk Typist Recruitment 2023 Selection Process

जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. ६. २ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येईल :-
(१) सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम २०१८. (२) राज्य कर निरीक्षक, (विक्रीकर निरीक्षक) गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम २०२१.
(३) पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम १९९५.
(४) दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) व वरिष्ठ लिपीक/पर्यवेक्षक (गट-क) सेवाप्रवेश नियम २०२२. (५) राज्य उत्पादन शुल्क विभागामधील दुय्यम निरीक्षक, (सेवाप्रवेश) नियम २००९.
(६) विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१३.
(७) वित्त विभागातील तांत्रिक सहायक, गट-क विमा संचालनालय (सेवाप्रवेश) नियम, २००१. (८) शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१७.

Skill Test Information For Clerk Typist Vacancy 2023

टंकलेखन कौशल्य चाचणी (केवळ लिपिक-टंकलेखक व कर सहायक पदाकरीता) :-

  • लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
  •  कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अर्हताकारी / पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक आहे.
  •  टंकलेखन कौशल्य चाचणीचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना / पद्धतीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

परीक्षा कधी होणार? Maharashtra Clerk Bharti Exam Date

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 8,169 जागांची जाहिरात काढली आहे. राज्यातल्या 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी आयोगाकडून तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. , तर गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2 सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा 9 सप्टेंबरला घेण्यात येईल.

इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी करीता उमेदवारांसाठी ठळक सुचना –
Important Tips for Candidates for English Typing Skill Test

१. खालील सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि वेळेचे नुकसान / अपात्रता टाळण्यासाठी त्यांचे अनुसरण करावे.
१.१ सूचना वाचल्यानंतर, सहमती देऊन “मी सुरू करण्यासाठी तयार आहे” वर क्लिक करा.
१.२ कीबोर्ड Layout इंग्रजी (यूएस) असेल. जे QWERTY कीबोर्ड Layout आहे.
१.३ संगणक/कीबोर्ड इत्यादी हाताळणे परिचित होण्यासाठी प्रत्यक्ष चाचणी सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे सराव चाचणी सुरू होईल.
१.४ सराव चाचणी नंतर आणि प्रत्यक्ष चाचणी सुरू होण्यापूर्वी ०३ मिनिटांचा अवधी दिला जाईल.
१.५ एकदा प्रत्यक्ष चाचणी सुरू झाल्यावर, परिच्छेदात दर्शविल्याप्रमाणे चित्तवेधक (Highlight) केलेला शब्द
टंकलिखित करा.
१.६ परिच्छेदात दिलेला मजकूर पूर्ण होईपर्यंत टंकलिखित केलेला मजकूर कोणत्याही वेळी बदलता येईल. विहित
वेळेपूर्वी बदल केलेला कोणताही मजकूर त्रुटी मोजण्यासाठी गणला जाणार नाही.
१.७ सबमिट बटण १० मिनिटांनंतर कार्यान्वित होईल, सबमिट न केल्यास १० मिनिटांनंतर स्वयंचलितपणे सबमिट
केले जाईल.
१.८ खालीलपैकी कोणतीही त्रुटी आढळल्यास, संयम बाळगून समवेक्षकाशी संपर्क साधावा :-
(१) कीबोर्ड त्रुटी
(२) मशीन ऑटो लॉक
(३) वीज व्यत्यय
(४) स्वयंचलितरित्या चाचणीमधून बाहेर पडल्यास
१.९ वरील तांत्रिक बिघाड झाल्यास काळजी करू नका, तुम्हाला पुन्हा लॉगिन करण्याची मुभा दिली जाईल आणि
चाचणी मूल्यमापनासाठी पूर्ण मूल्यांकन वेळ प्रदान केला जाईल.
१.१० चाचणीमध्ये कोणतीही अनुचित कृती किंवा अनुचित मार्ग वापरल्यास चाचणीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.

२. चाचणी पुर्ण झाल्यानंतर खालील त्रुटी या चुका म्हणून गणल्या जातील :-

२.१ प्रत्येक शब्द वगळण्यासाठी.
२.२ चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनासाठी.
२.३ उताऱ्यात न आढळलेल्या शब्दाच्या प्रत्येक जोडणीसाठी.
२.४ पुनरावृत्तीच्या मार्गाने झालेल्या प्रत्येक शुद्धलेखनाच्या त्रुटीसाठी, किंवा अक्षर / अक्षरांची बेरीज किंवा बदल किंवा वगळणे किंवा बदलणे, उदा.: ‘Spelling’ हा शब्द ‘seeplings’ इत्यादी.
२.५ चुकीचे कॅपिटलायझेशन: कॅपिटल अक्षराचा चुकीचा वापर लहान अक्षरासाठी आणि त्याउलट,
२. ६ एक चूक = एक त्रुटी

३. खालील गोष्टींचे अनुकरण करा :-

३.१ संगणक/कीबोर्ड इत्यादी हाताळणे परिचित होण्यासाठी वास्तविक चाचणी सुरू होण्यापूर्वी सराव चाचणी द्या. ३.२ दिलेल्या मजकुरात फक्त चित्तवेधक (Highlight) केलेला शब्द टाइप करा, कारण केवळ त्याचेच मूल्यमापन केले जाईल.

४. खालील गोष्टी करणे टाळा :-

४. १ दिलेला मजकूर टंकलिखीत करण्यासाठी आवश्यक असलेल्या की व्यतिरिक्त इतर कोणतीही ‘की’ किंवा ‘की’ संयोजन वापरू नका.
४.२ दिलेल्या मजकुरात नमूद केल्याखेरीज कोणतेही विशेष वर्ण/चिन्ह प्रविष्ट करू नका. त्यामुळे टंकलिखित
केला शब्द वगळू शकतो, टंकलेखन त्रुटी होऊ शकते, टंकलेखन चूक म्हणून मूल्यांकन केले जाऊ शकते. ४.३ कोणत्याही कारणास्तव भाषा आणि कीबोर्ड इनपुट दरम्यान अदला बदल करू नका.
४.४ एकदा चाचणी सबमिट केल्यानंतर आणि सारांश प्रदर्शित झाल्यानंतर बँक स्पेस किंवा इतर कोणतीही ‘की दाबू नका.

MPSC Typist Exam Skill Test Information

Apply Online For MPSC Lipik Vacancy 2023

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    New Information about Lipik Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड