MPSC महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या अंतिम निवड यादीस विलंब!

MPSC MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES MAIN EXAMINATION Exam 2022 Result  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यातआलेल्या सेवा मुख्य MPSC परीक्षा २०२४महाराष्ट्र कृषी च्या अंतिम निवड यादीस विलंब झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. मुख्य परीक्षा, मुलाखती तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होऊनही अंतिम निवड यादी अद्याप प्रसिद्ध न झाल्याने हजारो उमेदवारांचे भविष्य अनिश्चिततेत अडकले आहे. महाराष्ट्र कृषी सेवा भरती प्रक्रियेची सुरुवात सप्टेंबर २०२४ मध्ये झाली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि त्यानंतर १८ मार्चला तात्पुरती गुणवत्ता यादी हे सर्व टप्पे पूर्ण झाले. मात्र, मुलाखत प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला असतानाही अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जवळपास दोन वर्षांपर्यंत लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारांच्या मते, आयोगाकडून सातत्याने होणारा विलंब हा अत्यंत निराशाजनक आहे. अंतिम निकालासंदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक उमेदवार अन्य नोकरीच्या आणि पुढील स्पर्धा परीक्षांच्या संधी बाजूला ठेवून या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे आयोगाने तात्काळ अंतिम निवड यादी जाहीर करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर त्यावर आठ दिवसांत हरकती मागवल्या जातात. त्यानंतर तज्ज्ञ समितीकडून त्यावर चर्चा करून सुधारणा केली जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये काही दिवस जातात. कृषी विभागाचा निकाल लवकरच जाहीर होईल अशी माहिती मिळाली आहे. त्या नुसार हा निकाल लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.


MPSC Krushi Seva Main Exam 2022 Merit List 2022 : The Maharashtra Public Service Commission (MPSC) published an advertisement on December 29, 2023, for the ‘Maharashtra Civil Services Combined Preliminary Examination-2024’ for the State Services, Forest Services, and Civil Engineering Services categories under MPSC Krushi Seva Exam Result . This advertisement included a total of 570 posts, comprising 477 for State Services, 48 ​​for Forest Services, and 45 for Civil Engineering Services. However, students protested because the posts for the Agriculture Services category were excluded from this advertisement. Subsequently, on September 26, 2024, 258 posts from the Agriculture Services category were included. Consequently, the combined preliminary examination for a total of 828 posts was held on December 1, 2024. The main examinations were conducted as per the Commission’s schedule. Accordingly, the Agriculture Services main examination was held on May 18, 2025. However, seven months have passed since the examination, and the results have not yet been declared, leading to dissatisfaction among the students. When contacted regarding this matter, senior officials of the Commission stated that, “The process for the Agriculture Services main examination results is currently in its final stages. The results will be declared soon.”

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

आयोगातर्फे राज्यसेवा, वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या संवर्गासाठी ‘महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ ची जाहिरात २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यसेवा ४७७, वनसेवा ४८ आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ४५ अशा एकूण ५७० पदांचा समावेश होता, मात्र या जाहिरातीतून कृषी सेवा संवर्गाची पदे वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर २६ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी सेवा संवर्गातील २५८ पदांचा समावेश करण्यात आला. परिणामी, एकूण ८२८ पदांसाठी १ डिसेंबर २०२४ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. आयोगाच्या नियोजनाप्रमाणे मुख्य परीक्षा पार पडल्या. त्यानुसार कृषी सेवा मुख्य परीक्षा १८ मे २०२५ रोजी झाली, मात्र परीक्षा होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे, तरी निकाल जाहीर करण्यात आला नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आयोगाशी संपर्क साधला असता आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल.” 

याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, “या जाहिरातीमधील एकाच वेळी घेण्यात आलेल्या राज्यसेवा, वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर होऊन मुलाखतीदेखील पूर्ण झाल्या आहेत, मात्र कृषी सेवा मुख्य परीक्षा होऊन सात महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही आयोगातर्फे कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने संभ्रम वाढत चालला आहे. पारदर्शक माहिती नसल्याने अफवा पसरत आहेत. दरम्यान, दीर्घ प्रतीक्षेमुळे मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि पुढील नियोजनाबाबत अनिश्चितता वाढल्या आहेत. त्यामुळे आयोगाने पारदर्शकता राखून प्रक्रिया लवकर पूर्ण करावी आणि तातडीने निकाल जाहीर करावा.”

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड