MPSC Group B Bharti 2026
MPSC Group B Bharti 2026 : MPSC Group B (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Chemist “. There are 04 vacant Post available to fill. Eligible and interested candidates can send their application to the given link before the last date. Also, the last date to apply is 29th September 2026. More details are as follows about MPSC Group B Bharti 2026 , MPSC Group B Recruitment 2026 , visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत “उप-वैद्यकीय अधीक्षक, सहाय्यक भाषा संचालक” पदांच्या 04 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब भरती २०२६ अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब भरती २०२६
- पदाचे नाव – उप-वैद्यकीय अधीक्षक, सहाय्यक भाषा संचालक
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुल्क –
- अराखीव (खुला) – रुपये ७१९/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग रुपये ४४९/–
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ सप्टेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
MPSC Group B Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| उप-वैद्यकीय अधीक्षक | 02 |
| सहाय्यक भाषा संचालक | 02 |
Educational Qualification For MPSC Group A Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| उप-वैद्यकीय अधीक्षक | (i) Must hold a degree in Medicine and Surgery (MBBS) from a recognized university and a postgraduate degree/diploma in Hospital Administration from a recognized university or institution. (ii) The postgraduate degree/diploma in Hospital Administration must not have been obtained through distance education. |
| सहाय्यक भाषा संचालक | (1) Possess a degree or Master’s degree in Marathi subject, atleast in the second class; (2) Have passed with English or Communication Skills in English as one of the subject atleast in one year of three years degree course of a statutory university; (3) (i) Have passed with Sanskrit as one of the subject either in Secondary School Certificate Examination or Higher Secondary School Certificate Examination; OR (ii) Possess degree or Master’s degree in Sanskrit of a statutory university; OR (iii) Possess degree or diploma in Sanskrit of a recognised institution or of a Deemed University or have passed equivalent examination of a statutory university; |
Salary Details For MPSC Group B Arj 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| उप-वैद्यकीय अधीक्षक | स्तर एम ३७- रुपये ७१,१००/- ते रुपये २,११,९००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
| सहाय्यक भाषा संचालक | स्तर एस-१५ रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. |
How To Apply For MPSC Group B Application 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Group B Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात -1 | https://lnk.ua/GFMobFzsK |
| 📑 PDF जाहिरात -2 | https://lnk.ua/GFMobFzsK |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/UHYLD |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in |
MPSC Group B Bharti 2026 : एमपीएससीच्या ड्रग इन्स्पेक्टर (गट-ब) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रकरणावरून विरोधकांसह उमेदवारांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर भिमनवार यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट करत, संबंधित घटना आपण आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच घडली असल्याचा दावा केला आहे.
ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील कथित गैरप्रकारावरून आरोपांच्या केंद्रस्थानी आलेल्या एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी अखेर आपली बाजू स्पष्ट केली आहे. संबंधित गैरप्रकाराची घटना जानेवारी २०२६मध्ये घडली असून, आपण आयोगाच्या मुख्य पदाचा कार्यभार १८ फेब्रुवारी रोजी स्वीकारला आणि प्रत्यक्ष पदभार ३ मार्च रोजी हाती घेतला, असे भिमनवार यांनी निवेदनातून स्पष्ट केले. त्यामुळे आपल्यावर आरोप करण्यापूर्वी घटनेचा कालावधी आणि त्या वेळची वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, मुंबई पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये परीक्षेत सातवा क्रमांक मिळवलेल्या एका महिला उमेदवाराचाही समावेश असल्याचे भिमनवार यांनी सांगितले.
परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एमपीएससीने आता सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक सक्षम करण्यासाठी आयोगाकडून उच्चस्तरीय अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करून ती अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारनेही स्वतंत्र उच्चस्तरीय समिती गठीत केली असल्याची माहिती एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी दिली.

MPSC Group B Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक (गट-ब) भरती प्रक्रियेला पेपरफुटीच्या प्रकरणाने मोठा धक्का बसला असून, जुलै २०२५ मधील जाहिरातीपासून ते मार्च २०२६ मधील पेपरफुटी, ऑगस्ट २०२६ मधील भरती रद्द करण्याचा निर्णय आणि त्यानंतर आयोगाच्या अवर सचिवांसह सहा जणांच्या अटकेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आला आहे. या प्रकरणातील सर्व उमेदवारांना दिलासा देणारी बाब म्हणजे, लवकरच त्यांच्यासाठी मोफत फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर टाइमलाईन जाणून घेऊया.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) गट-ब भरतीला पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. पेपरफुटीचा आरोप सिद्ध झाल्यानंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर या प्रकरणाच्या तपासात एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसह तब्बल सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. नेमकं काय घडलं, पेपरफुटीचा प्रकार कधी आणि कसा उघडकीस आला आणि कारवाई कुठपर्यंत पोहोचली? जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाची क्रमवार टाइमलाईन.
- वर्ष २०२५: भरतीची सुरुवात
- २९ जुलै २०२५: एमपीएससीने अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षक गट-ब पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली.
- वर्ष २०२६: परीक्षा, निकाल आणि तक्रारींचा पाऊस
- २२ मार्च २०२६: महाराष्ट्रातील सहा विभागीय मुख्यालयांमध्ये औषध निरीक्षक पदासाठीची चाळणी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली.
- १२ जून २०२६: चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मुख्य परीक्षेच्या कामगिरीच्या आधारे ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले.
- १ ते २२ जुलै २०२६: पात्र उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. एकूण ५०६ पैकी ४८८ उमेदवारांनी या मुलाखत प्रक्रियेत सहभाग घेतला.
- २१ जुलै २०२६: मुलाखती सुरू असतानाच, परीक्षेत कथित अनियमितता आणि पेपरफुटी झाल्याबाबतची पहिली लेखी तक्रार एमपीएससीला प्राप्त झाली.
- २२ जुलै २०२६: मुलाखत प्रक्रिया संपताच आयोगाने ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. यात ४८५ उमेदवार पात्र तर ३ उमेदवार अपात्र ठरले.
- २२ ते २६ जुलै २०२६: या कालावधीत काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून आयोगाकडे तक्रारींचा ओघ वाढला. परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजेच २० मार्च रोजीच प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर लीक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
- २७ जुलै २०२६: तक्रारींचे गांभीर्य आणि वाढता राजकीय वाद पाहता, एमपीएससीने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुंबई पोलिसांना पाचारण केले.
- जुलै अखेर: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्परतेने प्राथमिक चौकशी करून आपला अहवाल एमपीएससीला सादर केला. चौकशीत प्रथमदर्शनी एका उमेदवाराला परीक्षेपूर्वीच प्रश्नसंच मिळाला असून त्याने त्याचा गैरफायदा घेतल्याचे सिद्ध झाले.
- ऑगस्ट २०२६: भरती रद्द आणि मोठी कारवाई
- २५ ऑगस्ट २०२६: परीक्षेची गोपनीयता, पारदर्शकता आणि उमेदवारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी एमपीएससीने औषध निरीक्षक गट ‘ब’ पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा केली.
२६ ऑगस्ट २०२६ (बुधवार): मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने (SIT) मोठी कारवाई करत थेट एमपीएससीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६ आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्व ६ आरोपींना सत्र न्यायालय कोर्ट नं. ४ समोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
MPSC Group B Bharti 2026 : आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील पदांच्या भरतीसाठी दिनांक २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात क्रमांक ११६/२०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेअंतर्गत चाळणी परीक्षा दिनांक २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दिनांक १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून, चाळणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे एकूण ५०६ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले. पात्र उमेदवारांपैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ०१ जुलै २०२६ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या ४८५ उमेदवारांची तसेच अपात्र ठरलेल्या ०३ उमेदवारांची, अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















