पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात (MoEFCC) ३३ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात ४, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया २२, भारतीय प्राणीसंग्रहालय ५ आणि नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये २ पदे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी ३० मार्च २०२५ पूर्वी अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रतेनुसार, शास्त्रज्ञ बीसाठी सागरी जीवशास्त्र, सागरी विज्ञान किंवा समुद्रशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट असणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञ सीसाठी वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी/डॉक्टरेट आवश्यक आहे. शास्त्रज्ञ डीसाठी लिमनोलॉजी, पर्यावरण विज्ञान किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी/डॉक्टरेट आवश्यक आहे, तर शास्त्रज्ञ जी (संचालक) पदासाठी वनस्पतीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी वेतनश्रेणीही आकर्षक आहे. शास्त्रज्ञ बी पदासाठी दरमहा ५६,१०० ते १,७७,५०० पर्यंत वेतन मिळेल, तर शास्त्रज्ञ सीसाठी ₹६७,७०० ते ₹२,०८,७००, शास्त्रज्ञ डीसाठी ₹७८,८०० ते ₹२,०९,२०० आणि शास्त्रज्ञ जी (संचालक) पदासाठी १,४४,२०० ते २,१८,२०० पर्यंत वेतन दिले जाणार आहे. वयोमर्यादेनुसार, शास्त्रज्ञ बी आणि सीसाठी ३५ वर्षे, शास्त्रज्ञ डीसाठी ४० वर्षे आणि शास्त्रज्ञ जीसाठी ५० वर्षे मर्यादा आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा आणि संधीचा फायदा घ्यावा!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















