माथाडी मंडळांतील रिक्त पदे भरण्याची कामगार विभागाची तयारी, ५९२ पदांचा आकृतीबंध तयार | Mathadi Mandal Bharti 2024
Mathadi Mandal Bharti 2024 - mahakamgar.maharashtra.gov.in
Mathadi Mandal Bharti 2024
Mathadi Mandal Bharti 2024: राज्यातील माथाडी कामगारांसाठी माथाडी कायद्याखाली स्थापन केलेल्या ३५ मंडळांत एकूण पदांच्या सुमारे पन्नास टक्क्यांहून जास्त पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी कामगार विभागाने तयारी केली आहे, मात्र आर्थिक व सामाजिक दृष्टीने मागास प्रवर्गाचा (एसईबीसी) प्रश्न उच्च न्यायालयात असल्याने या प्रवर्गाच्या जागांबाबत सामान्य प्रशासन विभागाला अद्याप ठोस निर्णय घेता येत नाही. यामुळे या प्रवर्गातील पदे भरायची की या प्रवगांतील पदे सोडून इतर सर्व प्रवर्गाची पदे भरायची, याविषयी सामान्य प्रशासन विभागाच्या सल्ल्यांची कामगार विभाग वाट पाहत आहे. या रिक्त पदांमुळे माथाडी कामगारांसंदर्भातील दैनंदिन प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी माथाडी संघटनांकडून येत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पदभरतीसाठी ५९२ पदांचा आकृतीबंध तयार
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कामगार विभागाने पदभरतीसाठी या सर्व मंडळांच्या ५९२ पदांचा आकृतीबंध तयार केला आहे. पूर्वीच्या आकृतीबंधातील काही पदे रद्द केली आहेत, तर इतर काही पदे नव्याने निर्माण केली आहेत. ही सर्व पदे भरण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस) ही कंपनी नेमली आहे. सध्या माथाडी मंडळांतील ३१५ च्या आसपास पदे रिक्त आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर अशा पाच जिल्ह्यांकरिता असलेली ११ मंडळे मुंबईमध्ये आहेत.
उर्वरित जिल्ह्यांसाठी २५ मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. त्यात किराणा बाजार व दुकाने मंडळ, मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळ, कापूस बाजार मंडळ, जळगाव माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ, नागपूर, वर्धा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ, पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मुंबई मंडळ, औरंगाबाद माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ अशा ३५ मंडळांसाठी मंजूर पदांची संख्या ५९२ इतकी आहे.
‘निरीक्षक’ हे अत्यंत महत्त्वाचे असलेले पद काही वर्षांपासून भरले जात नाही. महाराष्ट्र शासनाने १९६६ मध्ये विधान परिषदेचे तत्कालिन सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमली. या समितीच्या अहवालानंतर महाराष्ट्र माथाडी, हमाली आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियमन १९६९ हा कायदा की ज्याला ‘माथाडी कायदा’ असे संबोधले जाते, तो अस्तित्वात आला. या कायद्याने हमाल, माथाडी, अंग मेहनतीने मालाची चढ-उतार, माल रचणे, मालाची ने-आण आदी कामे करणाऱ्या असंरक्षित कामगारांसाठी राज्यात ३५ मंडळांची स्थापना केली आहे. ही मंडळे असंघटित कामगारांना विविध कामगार कायद्याखाली अनुज्ञेय होणारे संरक्षण व इतर लाभ यांच्यासंदर्भात कामकाज पाहतात. यासाठी प्रत्येक मंडळास कामगार खात्याने पदांचा आकृतीबंध मंजूर केला आहे. ही पदे भरण्याचा अधिकार या मंडळांना आहे, मात्र सध्या या मंडळांची पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पदे खाली आहेत.
शासन आणि मंडळे यांच्यातील दुवा म्हणून काम करणे. माथाडी मंडळाच्या सर्वसाधारण कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. माथाडी मंडळाचे वैधानिक कामकाज व त्यावर नियंत्रण ठेवणे. राज्यभरातील माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे. या प्रमुख जबाबदाऱ्या या मंडळांच्या कर्मचाऱ्यांवर आहेत. मात्र रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक माथाडी संघटनांचे म्हणणे आहे.
रिक्त पदांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त
रिक्त पदांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. निरीक्षक हे अत्यंत महत्वाचे पद आहे. ते छापे टाकणे, कंपन्यांना भेटी देऊन कामगार कायद्याची अंमलबजावणीसंदर्भात तपासणी करण्याचे काम करीत असतात. अशी पदे गेल्या कित्येक वर्षांपासून भरली जात नाहीत. त्यामुळे या मंडळांचे अस्तित्व कर्मचारी नसल्यामुळे धोक्यात आले आहे. नंदाताई भोसले, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन
Mathadi Mandal Bharti 2023
Mathadi Mandal Bharti 2023: The Department of Labor has approved a pattern of seats for each board to ensure that unorganized workers are provided with protection and other benefits admissible under various labor laws. These boards have the authority to fill these vacancies. However, currently more than 50 percent of these boards are vacant. The labor department is currently conducting a review in this regard. More details about Mathadi Mandal Bharti 2023, Mathadi Mandal Recruitment 2023 are as given below
More than 50 percent of the total seats are vacant in the 36 boards established under the Mathadi Act for Mathadi workers in the state. Complaints are coming from Mathadi organizations that the issues of Mathadi workers are being ignored due to these vacancies. Mumbai has 11 mandals for five districts namely Mumbai, Mumbai suburbs, Thane, Raigad, Palghar. 25 Mandals have been constituted for the remaining districts.
राज्यातील माथाडी कामगारांसाठी माथाडी कायद्याखाली स्थापन केलेल्या ३६ मंडळांत एकूण जागांपैकी सुमारे ५० टक्क्यांहून जास्त जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी माथाडी संघटनांकडून येत आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर अशा पाच जिल्ह्यांकरीता असलेली ११ मंडळे मुंबईमध्ये आहेत. उर्वरित जिल्ह्यांसाठी २५ मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. त्यात किराणा बाजार व दुकाने मंडळ, मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळ, कापूस बाजार मंडळ, जळगाव माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ, नागपूर, वर्धा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ, पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ आदी ३६ मंडळांसाठी मंजूर जागांची संख्या ५८३ इतकी आहे. त्यातील २७० इतक्या जागा सध्या भरल्या असून ३१३ जागा रिक्त आहेत. निरीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे असलेले पद काही वर्षांपासून भरले जात नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कामगारांसाठी राज्यात ३६ मंडळांची स्थापना
महाराष्ट्र शासनाने १९६६ मध्ये विधानपरिषदेचे तत्कालीन सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमली. या समितीच्या अहवालानंतर महाराष्ट्र माथाडी, हमाली आणि इतर श्रमजीवी कामगार, (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ ज्याला ‘माथाडी कायदा’ असे संबोधले जाते, तो अस्तित्वात आला. या कायद्याने हमाल, माथाडी, अंगमेहनतीने मालाची चढ-उतार, माल रचणे, मालाची ने-आण आदी कामे करणाऱ्या असंरक्षित कामगारांसाठी राज्यात ३६ मंडळांची स्थापना केली आहे.
मंडळांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त
ही मंडळे असंघटित कामगारांना विविध कामगार कायद्याखाली अनुज्ञेय होणारे संरक्षण व इतर लाभ यांच्यासंदर्भात कामकाज पाहतात यासाठी प्रत्येक मंडळास कामगार खात्याने जागांचा आकृतिबंध मंजूर केला आहे. या जागा भरण्याचा अधिकार या मंडळांना आहे. मात्र, सध्या या मंडळांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. याबाबत आढावा घेण्याचे काम कामगार विभागाकडून सध्या सुरू आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. शासन आणि मंडळे यांच्यातील दुवा म्हणून काम करणे, माथाडी मंडळाच्या सर्वसाधारण कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, माथाडी मंडळाचे वैधानिक कामकाज व त्यावर नियंत्रण ठेवणे, या प्रमुख जबाबदान्या या मंडळाच्या कर्मचाऱ्यांवर
आहेत.
माथाडी मंडळांत रिक्त जागांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
निरीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. ते छापे टाकणे, कंपन्यांना भेटी देऊन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात तपासणी करण्याचे काम करीत असतात. अशी पदे गेल्या कित्येक वर्षांपासून भरली जात नाहीत. त्यामुळे या मंडळांचे अस्तित्व कर्मचारी नसल्यामुळे धोक्यात आले आहे. – नंदाताई भोसले, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन, मुंबई
Table of Contents