म्हाडा कोकण मंडळाच्या ५,२८५ घरं आणि ७७ भूखंडांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता केवळ दोनच दिवसांवर आली असून, १३ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकृती होणार आहे. म्हाडाने अधिकाधिक अर्जदारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
दिवाळीपूर्वीच घर मिळण्याचं स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्याकडून यंदा मोठ्या प्रमाणावर घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.

या योजनेअंतर्गत राज्यभरात जवळपास १९,५०० घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून, त्यापैकी मुंबई महानगरात तब्बल ५,००० घरं सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही घरं मुख्यतः आर्थिक दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) असतील.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितलं की, यंदाची लॉटरी मोठ्या प्रमाणावर असेल आणि जास्तीत जास्त लोकांना आपलं स्वतःचं घर मिळेल याची काळजी घेतली जात आहे.
या घरांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पातून तब्बल ९,२०२ कोटी रुपयांची तरतूद केली असून, घरांची निर्मिती व वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जलदगती राखली जाणार आहे.
म्हाडाकडून लवकरच याची अधिकृत जाहिरात, अर्ज प्रक्रिया, नोंदणीची तारीख व अर्ज फी याची माहिती जाहीर होईल. त्यामुळे जे नागरिक आपल्या हक्काचं घर मिळवण्यासाठी वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही एक दिवाळीपूर्वीची सुवर्णसंधी ठरू शकते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















