Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 | आदिवासी विकास विभाग सरळ सेवा ६०२ पदांसाठी त्वरित अर्ज करा!।

Mahatribal Bharti 2023

Mahatribal Mega Bharti 2023

Mahatribal Bharti 2023: Under the Commissioner of Tribal Development Department, Tribal Development Department, State of Maharashtra, Nashik as well as appointing authority Additional Commissioner, Nashik/Thane/Amravati/Nagpur establishment Group (B) Non-Gazetted and Group C Cadre Direct Service Quota for direct service recruitment of 602 posts in various cadres Applications are being invited from 23.11.2023 to 13.12.2023 only through online mode from eligible candidates on the website @tribal.maharashtra.gov.in. Under Maharashtra Tribal Department Bharti 2023, there is a vacancy for Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Deputy Accountant/Chief Clerk, Senior Clerk/Statistical Assistant, Stenographer, Housekeeper (Male), Superintendent (Male), Housekeeper (Female), Superintendent (Female), Librarian , Laboratory Assistant, Tribal Development Inspector, Assistant Librarian, Primary Teaching Assistant (Marathi Medium), Secondary Teaching Assistant (Marathi Medium), Higher Secondary Teaching Assistant Primary Teaching Assistant (English Medium) Posts. To recruit the said posts, a Computer Based Test will be conducted at the designated examination center in Maharashtra. Know More details about Mahatribal Bharti 2023 at below:

Finally, Mega Adivasi Vibhag Recruitment 2023 Notification is Out !! Those who are eagerly waiting for this, must grab this Opportunity for being a part of MahaTribal Department Of Maharashtra. For this You have to go through all the details mentioned below like How Many Vacancies are there in Mahatribal Bharti 2023, Posts Names, Mahatribal Eligibility CRiteria 2023, Mahatribal Age Limit, How To Apply For Mahatribal Vacancy 2023 and other details so that you can get all information before filling Maharashtra Tribal Department Online Application 2023

 

आदिवासी विकास महामंडळ येथे “उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या एकूण 602रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे. ✅या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, गुण पद्धती व परीक्षा स्वरूप येथे बघा !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आदिवासी विकास विभाग सरळ सेवाभरती हॉल तिकीट व परीक्षा तारखा 

  • पदाचे नावउच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
  • पद संख्या – 602 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
    • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in

प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) शैक्षणिक अर्हतेबाबत

It is mandatory for the candidates to have completed their education from 1st to 10th through English medium. However, even if such candidates select the No option in front of this option in the link, they will be given the option of further education from 1st to 12th through English medium. In this option, since some applicants have completed their education only in 11th and 12th through English medium, even if they select the Yes option there, since their basic education from 1st to 10th was not through English medium, even if the application of such a candidate is accepted due to wrong information filled by him, such a candidate is eligible. It should be noted that it will not be done and such candidates should apply for the suitable post as per their educational qualification.

Maha Tribal Primary Shikshan Sevak Eductaional Criteria

Maha Tribal Primary Shikshan Sevak Eductaional Criteria

Download Maha Tribal Department Corrigendum

Adivasi Vikas Vibhag  Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 14
संशोधन सहाय्यक 17
उपलेखापाल-मुख्य लिपिक 30
आदिवासी विकास निरिक्षक 08
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 187
लघुटंकलेखक 05
गृहपाल (पुरुष) 43
गृहपाल (स्त्री) 25
अधिक्षक (पुरुष) 26
अधिक्षक (स्त्री) 48
ग्रंथपाल 38
प्रयोगशाळा सहाय्यक 29
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 11
सहाय्यक ग्रंथपाल 01
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) 48
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15
उच्च श्रेणी लघुलेखक 03
निम्न श्रेणी लघुलेखक 13

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  • संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
संशोधन सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल-मुख्य लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
आदिवासी विकास निरिक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
लघुटंकलेखक
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
गृहपाल (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री)
  • समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (स्त्री)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
प्रयोगशाळा सहाय्यक
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
सहाय्यक ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच बी.एड. व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)
  • उमेदवाराचे इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे तसेच डी.एड पदवीका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Teacher Test Eligibility /Central Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
  • उमेदवार एसएससी / एचएससी अधिक डी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
  • शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Test /Central Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
  • उमेदवार पदवी अधिक बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
उच्च श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
निम्न श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम

Salary Details For Adivasi Vikas Vibhag Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 38600-122800
संशोधन सहाय्यक 38600-122800
उपलेखापाल-मुख्य लिपिक 35400-112400
आदिवासी विकास निरिक्षक 35400-112400
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 25500-81100
लघुटंकलेखक 25500-81100
गृहपाल (पुरुष) 38600-122800
गृहपाल (स्त्री) 38600-122800
अधिक्षक (पुरुष) 25500-81100
अधिक्षक (स्त्री) 25500-81100
ग्रंथपाल 25500-81100
प्रयोगशाळा सहाय्यक 19900-63200
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 35400-112400
सहाय्यक ग्रंथपाल 21700-69100
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक मानधन-२०,०००
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) मानधन १६,०००
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) मानधन १६,०००
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) मानधन १८,०००
उच्च श्रेणी लघुलेखक 41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक 38600-122800

Important Date – Tribal Development Department Bharti 2023

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 23/11/2023
Closure of registration of application 13/12/2023 

 

 

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2023

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2023

Adivasi Vikas Mahamandal Bharti Details 2023

१) परोक्षेत्ता दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
२) ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित क्योमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शतीं, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याचाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल,
३) स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद करणे, अर्शतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील, व त्यांचा निर्णय अंतिम असेल, पात्रावत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल, सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात बाद, तक्रारी, उद्‌भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.

Maha Tribal Development Department Jobs 2023 – Important Documents 

  • परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
  • अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र

How to Apply For Maha Tribal Development Department Recruitment 2023

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  2. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
  5. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023  आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For tribal.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑 सिलॅबस व परीक्षा स्वरूप  पूर्ण माहिती वाचा 
📑 PDF जाहिरात https://shorturl.at/bLN49
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/svAH4
✅ अधिकृत वेबसाईट
tribal.maharashtra.gov.in

District Wise Maharashtra Tribal Department Notification PDF

District Name

PDF Download

Adivasi Vikas Vibhag Thane Bharti 2023

Download

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023

Download

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2023

Download

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2023

Download


Mahatribal Bharti 202३ – Latest Update

राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत राज्यस्तरीय जवान पदभरतीसाठी ७१७ जागांची जाहिरात निघाली आहे. परंतु, यात साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासींकरिता केवळ ३ पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत. एकीकडे आरक्षणासाठी राज्यात आंदोलनांचे वादळ उठलेले असताना राज्य सरकारने आदिवासी आरक्षणावर वरवंटा फिरविल्याचा संताप बेरोजगार युवकांमधून उमटत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या विभागात वाहनचालक, लघुलेखक, लघुटंकलेखक, चपराशी अशी पदे भरली जाणार आहेत. त्यात आदिवासींना केवळ जवान या एकाच संवर्गातील ५६८ जागांपैकी केवळ ३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इतर संवर्गाच्या पदांमध्ये तर एकही जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली नाही. यापूर्वी छोट्या संवर्गातील बिंदूनामावलीमध्ये आदिवासींचा बिंदू चोरून छोट्या संवर्गातील बिंदूनामावलीत आदिवासींना आठव्या क्रमांकावर फेकण्यात आले. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पदभरतीत राज्यघटनेनुसार आदिवासींना मिळालेले ७.५० टक्के आरक्षण डावलण्यात आले आहे.

या पदभरतीमध्ये एससी, एनटी-सी, इडब्ल्यूएस अशा प्रवर्गांना त्यांच्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार आरक्षित पदे उपलब्ध होत आहेत. परंतु, आदिवासींची पदे कोणत्या आधारावर कमी करण्यात आली, याबाबत आदिवासी संघटनांनी सवाल उपस्थित केला आहे. सरकारने तत्काळ ही जाहिरात रद्द करावी. छोट्या संवर्गातील बिंदूनामावली दुरुस्त करावी. अन्यथा हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांना नागपुरात फिरकूही देणार नाही, अशी भूमिका आदिवासी संघटनांनी घेतली आहे.

उत्पादन शुल्क विभागात जवान या संवर्गाची एकूण ५६८ पदे भरली जात आहे. त्यात १३ टक्के आरक्षण असलेल्या एससी प्रवर्गाला ८१ पदे आरक्षित आहेत. तर फक्त ३.५ टक्के आरक्षण असणाऱ्या एनटी-सी प्रवर्गाला २५ पदे आरक्षित आहेत. इडब्ल्यूएस प्रवर्गाकरिता १० टक्के आरक्षणानुसार ५७ पदे आरक्षित आहेत. मात्र ७.५० टक्के आरक्षण असलेल्या एसटी प्रवर्गाला केवळ ३ पदे राखीव ठेवण्यात आली.  संविधानानुसार आदिवासींना शिक्षण, नोकऱ्यांमध्ये ७.५ टक्के आरक्षण आहे. परंतु महायुती सरकारमध्ये आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाला छेद देण्याचे काम सुरू असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवरून दिसते. शासनाने सदर जाहिरात तात्काळ रद्द करून आदिवासींच्या आरक्षणानुसार नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी.

 


Mahatribal Bharti 2022: The latets update for Mahatribal Recruitment 2022. There are a total of 31 posts sanctioned including Manager along with Deputy Manager Marketing Inspector and others in the Regional Office at Gadchiroli. 17 posts vacant out of the sanctioned posts. Further details are as follows:-

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. खरेदीच्या व्यवहारात हुंड्या काढण्यापासून धान भरडाई तसेच इतर सर्व कामे महामंडळामार्फत होतात; मात्र महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्वच पाच उपप्रादेशिक कार्यालयात तसेच प्रादेशिक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून ५५ टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

 

Adivasi Vikas Vibhag Recruitment 202३ – Vacancy Details 

  • गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयात व्यवस्थापकासह उपव्यवस्थापक विपणन निरीक्षक व इतर सर्व मिळून एकूण ३१ पदे मंजूर आहेत.
  • यापैकी १४ पदे भरण्यात आली असून १७ पदे रिक्त आहेत.
  • रिक्त पदांमध्ये व्यवस्थापक (प्रशासन) दोन पदे, उपव्यवस्थापक तीन पदे, लेखापालाची पाच, कनिष्ठ सहायकाची दोन, टंकलेखकाची तसेच गोदामपाल व इतरही पदे रिक्त आहेत.
  • धानोरा, आरमोरी, कोरची येथे विपणन निरीक्षक, कनिष्ठ सहायक, रखवालदार व ग्रेडरची पदे रिक्त आहेत.या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

Mahatribal Bharti 2022



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Atul dane says

    Q krun pn answer det nh n bhai

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड