JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कारागृह विभागात तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त; नवीन पदभरती जाहिरात… | Maharashtra Prisons Department Bharti 2025

Maharashtra Prisons Clerk Normalization Process 2025 

 महाराष्ट्र कारागृह विभागात मागील दहा वर्षांपासून तुरुंगाधिकारी (श्रेणी २) पदांची नव्याने भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यातील मध्यवर्ती (सेंट्रल) आणि खुल्या कारागृहांत अधीक्षक व वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. एकीकडे कैद्यांची संख्या वाढत असल्याने आठ नवीन कारागृहे स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे कैद्यांना सांभाळणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांची पदे रिकामी पडली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पोलिस खात्याप्रमाणे कारागृह विभागात अधिकारी पदांची भरती करावी, अशी मागणी प्रशासनाकडून होऊ लागली आहे. राज्यात नऊ मध्यवर्ती, २८ जिल्हा, १९ खुली आणि प्रत्येकी एक विशेष महिला कारागृह, किशोर सुधारालय व बाल सुधारगृह अशी ६० कारागृहे आहेत. कारागृहांत कैदी ठेवण्याची क्षमता २७ हजार १८४ असताना प्रत्यक्षात ३९ हजार ६४७कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये साडेसहा हजार शिक्षाधीन आणि तीस हजार न्यायाधीन (कच्चे) कैदी वास्तव्याला आहेत. राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी-२ची तब्बल २५० पदे रिक्त आहेत. तुरुंगाधिकारी हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे वास्तव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तुरुंगाधिकारी या पदाची पदभरती घेतली जाते. मात्र, गत दहा वर्षांपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची माहिती आहे. गृह विभागाने २०१४ पासून तुरुंगाधिकारी श्रेणी-२ या पदभरतीला मंजूरी प्रदान केली नाही. त्यामुळे तुरुंगाधिकारी पदभरतीच्या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक युवकांनी वयोमर्यादादेखील ओलांडली. राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह आहेत. तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याबाबत कारागृह प्रशासनाच्या मुख्यालयाचे प्रमुख डॉ. जालिंदर सुपेकर यांना विचारणा केली असता ही पदे रिक्त आहेत; पण नेमकी किती हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

राज्यातील कारागृहांत कैद्यांची गर्दी होऊ लागली आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी येरवडा, हिंगोली, भुसावळ आणि गोंदिया येथे नवीन कारागृहे उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. भविष्याचा विचार करून सातारा, सांगली, अंबाजोगाई (बीड) आणि नांदेड या जिल्ह्यांत नवीन कारागृहे उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात कारागृहांची संख्या ६०वरून ६८ होणार आहे. मात्र, कारागृह विभागात मागील दहा वर्षांपासून (२०१५) नव्याने तुरुंग अधिकाऱ्यांची भरती झालेली नाही. दहा वर्षांपूर्वी तुरुंग अधिकारी म्हणून भरती झालेले आज वरिष्ठ तुरुंगाधिकारी (श्रेणी १) म्हणून सेवा बजावत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रमुख मध्यवर्ती, खुल्या कारागृहांत तुरुंग अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत.

राज्यातील सर्वच कारागृहांत क्षमतेच्या दुप्पट कैदी शिक्षा भोगत असताना संबंधित कारागृह प्रशासनाला उपलब्ध मनुष्यबळात कैद्यांची आणि कारागृहाची सुरक्षा सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चार-पाच वर्षांच्या कालावधीनंतर कर्मचाऱ्यांची भरती प्रकिया पार पडल्याने विविध प्रमुख कारागृहांना काही प्रमाणात वाढीव मनुष्यबळ मिळाले आहे. त्यामुळे कारागृहाला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्वांत मोठ्या येरवडा कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांची ३३ पदे रिक्त आहेत. मंजूर ४५ पदांपैकी केवळ १२ तुरुंग अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि ४५० कर्मचारी साडेसहा हजार कैद्यांना सांभाळत आहेत. ना जाहिरात, ना पदभरती – एमपीएससीमार्फत तुरुंगाधिकारी या पदासाठी परीक्षा घेणे अपेक्षित आहे. मात्र, पदभरतीला गृह विभागाकडून मान्यता मिळाली नाही. गत दहा वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. ना जाहिरात, ना परीक्षा पुढे निवड कधी होणार, हे सांगणे कठीण आहे. प्रशिक्षणाचा तर प्रश्न येत नाही. त्यामुळे या पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणाईच्या स्वप्नावर विरजण येत असल्याचे चित्र आहे.

एडीजी, तीन डीआयजींची पदे रिक्त कारागृह प्रशासनात अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) हे पद रिक्त असून, तीन विशेष पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) पदांचा प्रभारी कारभार सुरू आहे.सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरहे यांच्याकडे कारागृह प्रशासनाच्या एडीजी पदाची धुरा सोपविली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Educational Qualification For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Physical Criteria For Karagruh Vibhga Shipai Police Bharti 

Physical Eligibility Police Bharti 2022

पोलीस भरती महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

 Karagruh Vibhga Shipai Police Bharti Details 

Karagruh Vibhga Shipai Police Bharti – As you know, Maharashtra Police Bharti is started. The Karagruh Vibhga Shipai District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2024 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील परभणी पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर) तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

 

परभणी पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • परभणी पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject)गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

 

Maharashtra Police Bharti 2024 | Karagruh Vibhga Shipai Police Driver Bharti 2024 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Karagruh Vibhga Shipai Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-

 

Selection Procedure For Karagruh Vibhga Shipai Police Recruitment 2024

  • Karagruh Vibhga Shipai Police Bharti 2024, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Bharti 2024 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड