दहावी 2025 परीक्षेचे हॉलतिकीट २० तारखेपासून ऑनलाइन या लिंक वर मिळणार! अशा प्रकारे करू शकता डाउनलोड… !!

Maha SSC Board Exam Hall Tickets - mahahsscboard.in

SSC Hall Ticket 2025 Download

राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट येत्या २० जानेवारी २०२५ पासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळांनी हॉलतिकिटाचे प्रिंटिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. हॉलतिकीट राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हॉलतिकिटाची प्रिंट काढून मुख्याध्यापकांचा शिक्का घेऊन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही आदेशात म्हटले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार, सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी दहावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉलतिकीट विद्यार्थ्यांना देताना त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये. तसेच हॉलतिकिटावर मुख्याध्यापक यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉलतिकिटामध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. हॉलतिकिटावरील फोटो असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा सदोष फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. एखाद्या विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळांनी पुन्हा हॉलतिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट द्यावे, असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Download Maha SSC Board Hall Ticket 2025 Link 

SSC HALL TICKET 2025 –www.mahahsscboard.in 

१. मार्च 2025 मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत…
२. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्याथ्र्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी,
३. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
४. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.

५. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
दहावीचे हॉल मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. तरी मार्च २०२३ तिकीट आले… मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त (इ.१० वी ) प्रमाणपत्र परीक्षेसाठी
६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधि प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Radhika dhangar says

    Maz hall ticket kas download karu

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड