महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीतून बाद झालेल्या उमेदवाराची यादी प्रकाशित! । Maha Security Result
Maha Security Result
Maha Security Result: महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पुर्ण करुन प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवाराना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठविण्यात येते. परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली / धोरण नुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील ०२ प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते. तरी ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादौवर कमी करण्यात येतात. त्यानुसार महामंडळामार्फत आयोजीत भरती क्र. २० मधील ११५१ पुरुष उमेदवाराना प्रशिक्षण सत्र क्र. ६४, ६५ व ६६ मध्ये प्रशिक्षणाची संधी देण्यात आली होती. परंतु प्रशिक्षण सत्र क्र. ६६ मध्ये प्रशिक्षणासाठी अतिरीक्त उमेदवार हजर झाल्यामुळे उर्वरीत उमेदवारांना परत करण्यात आले होते. त्यामुळे सदर ११५१ उमेदवारा पैकी इच्छुक उमेदवाराना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी देण्याचे प्रस्तावीत होते. त्यानुसार प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारा कडुन Google Form व्दारे प्रशिक्षणासाठी इच्छुक असल्याबाबत विनंती अर्ज मागविण्यात आले होते. परंतु खालील नमुद ९८३ उमेदवारानी महामंडळास प्रशिक्षणास इच्छुक असल्याबाबत कळविलेले नसल्यामुळे सदर उमेदवारांची नावे मा. अपर पोलीस महासंचालक तथा सह व्यवस्थापकीय संचालक, मरासुम, मुंबई यांच्या मान्यतेनुसार महामंडळाच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवरुन कायमस्वरूपी कमी करण्यात येत असुन त्यांच्या नावाची यादी खालील प्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बाद झालेल्या उमेदवारांची यादी पहा (१७ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित)
ऑनलाईन फॉर्म भरलेल्यापैकी भरती नोंदणीसाठी एकूण २,४३७ उमेदवार प्रत्यक्ष हजर झाले आहेत. त्यांची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर त्यापैकी २.३५५ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पात्र (Selected) ठरवण्यात आले आहे. तसेच एकूण १६४ उमेदवारांची कागदपत्रे अपुर्ण असल्यामुळे त्यांना प्रतिक्षाधीन यादीत ठेवण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर ३६६ उमेदवारांनी फॉर्म भरला आहे परंतु भरती नोंदणीसाठी हजर झाले नाही. अशा एकूण ५३० उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महामंडळाचे मुख्य कार्यालय ३२, वा मजला जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई येथे दिनांक १०/०१/२०२५ रोजीपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत भरती विभागाकडे परिपुर्ण कागदपत्रे अपडेट करुन सादर करावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maha Security Result Notice
How To Check Maha Security Application Status Online
महामंडळाचे भरती नोंदणी प्रक्रिये मध्ये ऑनलाईन फॉर्म भरलेले २,८८५ उमेदवार त्यांच्या नोंदणीबाबतची स्थिती (Status) https://mssc.co.in/application/index.php या लिंकवर क्लीक करुन उमेदवार आपला आवेदन क्रमांक (Application Number) किंवा मोबाईल क्रमांक (Mobile Number) टाकून स्वतःचे स्थिती (Status) तपासू शकतात. उमेदवारांनी आपला स्वतःचे स्थिती (Status) तपासणी केल्यानंतर त्यांना त्यावर कोणताही आक्षेप असल्यास दिनांक ०१/०१/२०२५ रोजीपर्यंत अर्ज करु शकता.
उमेदवारांनी अपूर्ण असलेली मूळ कागदपत्रे सादर केल्यानंतर HRMS लिंकवर अपलोड करण्याबाबत त्यांना प्राधिकृत करण्यात येईल, त्यांनी त्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म अपलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून मुख्य कार्यालयात दिनांक १०/०१/२०२५ रोजीपर्यंत सादर केल्यानंतर त्यांना भरती नोंदणीत पात्र करण्यात येईल. संबंधीत उमदेवार दिलेल्या कालावधीत हजर न झाल्यास ते इच्छूक नाही आहे, असे समजून त्यांची नावे यादीतून वगळण्यात येतील, त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी संगणक स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी