IT क्षेत्रातही वाढणार नियुक्त्या – दिवाळीत बंपर नाेकऱ्या! सणासुदीमुळे वाढली कर्मचाऱ्यांची मागणी !

IT Recruitment 2023

IT Recruitment 2023 

IT Recruitment 2023  – As soon as the month of Shravan starts, the country starts celebrating festivals. On the occasion of Ganeshotsav, Navratri and Diwali, a large number of purchases are made across the country. Companies are also gearing up for the festive season that will boost the country’s economic cycle. More importantly, the demand for seasonal workers has increased even before the festive season. More than 7 lakh seasonal workers are expected to be recruited this year. It is estimated to increase by 75 percent this year compared to last year. IT Recruitment 2023 Jobs in logistics, warehousing, delivery, etc. will increase. Anticipating the festive season, companies are also preparing to offer 4-5 times incentives with better salaries.

 

 

श्रावण महिना सुरू हाेताच देशात सणासुदीचे वेध लागतात. गणेशाेत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या निमित्ताने देशभरात माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. देशाच्या अर्थचक्राला गती देणाऱ्या सणासुदीच्या हंगामासाठी कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सणासुदीपूर्वीच हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. यावर्षी ७ लाखांपेक्षा जास्त हंगामी कामगारांची भरती हाेण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा त्यात ७५ टक्के एवढी माेठी वाढ हाेण्याचा अंदाज आहे. लाॅजिस्टिक्स, वेअर हाऊसिंग, डिलिव्हरी इत्यादी क्षेत्रात नाेकऱ्या वाढणार आहेत. सणासुदीचा अंदाज घेऊन कंपन्या चांगल्या पगारासह ४-५ पट इन्सेंटिव्हदेखील देण्याच्या तयारीत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.आयटी क्षेत्र देणार गुड न्यूज?
गेल्यावर्षीपासून आयटी क्षेत्रात लाखाे कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली. यावेळी आयटी आणि टेक कंपन्या डिसेंबर तिमाहीपर्यंत बंपर भरती करतील, असा अंदाज आहे. ४४ टक्के नाेकर भरती आयटी क्षेत्रात वाढेल, असा अंदाज मॅनपाॅवर एम्प्लाॅयमेंट आऊटलूक सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे.

 

ई-काॅमर्स, सप्लाय चेनमध्ये मागणीत प्रचंड वाढ
ई-काॅमर्स क्षेत्रात डिलिव्हरीसाठी कर्मचाऱ्यांची मागणी ४० टक्क्यांनी वाढली आहे. या क्षेत्रातील तसेच लाॅजिस्टिक कंपन्या हजाराेंच्या संख्येने हंगामी कर्मचारी भरती करत आहेत. त्यात बहुतांश नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने हाेतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.

– ७ ते ८ लाख नाेकऱ्या पार्टटाईम, तात्पुरत्या आणि हंगामी कर्मचाऱ्यांना मिळू शकतात.
– २३ टक्के भरती यापैकी झालेली आहे.
– ४ लाख लाेकांना २०२२ मध्ये हंगामी नाेकऱ्या मिळाल्या हाेत्या.
– २० ते २५ टक्के

 

ई-काॅमर्स क्षेत्रातील विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.
– ६९ टक्के कंपन्या अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात.
– २० टक्के कंपन्या हंगामी कर्मचाऱ्यांना नियुक्त करतील.
– १८ टक्के नाेकर भरतीत वाढ डिसेंबरमध्ये कंपन्या करू शकतात.

१५% कर्मचाऱ्यांची मागणी वाढली वेअर हाऊसिंग क्षेत्रात.
४०% वाढ डिलिव्हरी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मागणीत झाली आहे.
४०% लाॅजिस्टिक क्षेत्रात हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार आहे.

६४ हजार लाेकांना ब्रॅंडेड रिटेल कंपन्यांनी यावर्षी नाेकरी दिली आहे. ७३ टक्के जास्त भरती वर्ष २०२२च्या तुलनेत.

 


IT Recruitment 2021: Infosys, the country’s second-largest IT company, said on Wednesday it would hire about 45,000 freshers this year, as attrition rates have risen sharply. If you are a fresher, you have a golden opportunity. India’s largest IT companies Tata Consultancy Services (TCS), Infosys, Wipro and HCL Technologies (HCL) together are expected to employ more than 1 lakh freshers this financial year. Further details are as follows:-

1 Lac Jobs For Freshers

कोरोनानंतर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. अनेक कंपन्यांनीही वर्क फ्रॉम होम सुविधा बंद केल्याने कर्मचाऱ्यांना कंपनीत जाऊन काम करावं लागत आहे; मात्र काही कंपन्यांनी हायब्रिड वर्क पॉलिसी अवलंबल्याने अजूनही काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा मिळत आहे. वर्क फ्रॉम होममुळे कंपन्यांचा खर्च वाचत असल्यानं कंपन्या कर्मचाऱ्यांना ही मुभा देतात. आता कॉग्निझंट कंपनी वर्क फ्रॉम होमसाठी पदभरती करणार आहे. ‘कंटेंट टेकगिग डॉट कॉम’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

 

कॉग्निझंट या आयटी कंपनीत प्रोग्रॅमर अ‍ॅनालिस्ट ट्रेनी या पदासाठी भरती होणार आहे. या पदभरतीसाठी वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांची निवड केली जाईल. ही पदभरती शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी असेल. बीई, बीटेक, बीसीए, एमसीए, एमई, एमटेक झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

 

या पदावर काम करणाऱ्या उमेदवारांकडे असलेल्या जबाबदाऱ्यांबद्दलही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, उमेदवारानं कामाबाबतचे प्रश्न, तक्रारी आणि स्पष्टीकरण लगेचच वरिष्ठांना सांगितलं पाहिजे. नियोजित आणि अपेक्षित वेळेत उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी सातत्य राखलं पाहिजे. सहकारी आणि वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारले पाहिजेत. कामासंदर्भात सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे व आवश्यकतेनुसार त्यांचा क्रम लावला पाहिजे. एखादं काम मिळाल्यावर ते पार पाडण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. गरज असल्यास वेळोवेळी कामाबाबतचे अपडेट्स दिले पाहिजेत.

 

या पदावर काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे कोणती कौशल्यं असली पाहिजेत, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी एखाद्या प्रोजेक्टचा दर्जा टिकवण्यासाठी विविध ठिकाणांहून माहिती मिळवली पाहिजे. क्लायंटच्या मागण्या काय आहेत, तांत्रिक उपलब्धता काय आहे, याबाबतही ज्ञान घेतलं पाहिजे. त्याकरिता क्लायंटच्या प्रोजेक्टची सर्व कागदपत्रं वाचली पाहिजेत. नॉलेज ट्रान्स्लेशन वर्कशॉपला हजेरी लावून तुमच्या प्रोजेक्टबाबत सर्व माहिती मिळवली पाहिजे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तांत्रिक ज्ञान आणि तुमचं शिक्षण यात वेळोवेळी आवश्यक ती भर घातली पाहिजे.

 

आयटी क्षेत्रात सतत नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. अलीकडेच कॉग्निझंट कंपनीनं काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. त्यामागे उमेदवारांकडे पदासाठी आवश्यक शिक्षण व अनुभव नसल्याचं कारण पुढे आलं होतं. आणखी काही कंपन्यांनीही याच कारणास्तव कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. त्या पार्श्वभमीवर कॉग्निझंटने पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे; मात्र वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांना यासाठी संधी दिली जाणार आहे.

खुशखबर! TCS मध्ये 35 हजार पदांवर फ्रेशर्सची भरती! 

जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. खरंतर चांगल्या तंत्रज्ञानाच्या टॅलेंटला विकत घेण्यासाठी देशातील शीर्ष आयटी कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (एचसीएल) एकत्रितपणे या आर्थिक वर्षात 1 लाखांहून अधिक फ्रेशर्सना रोजगार देण्याची अपेक्षा आहे

देशातील सर्वात मोठी आयटी फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 35,000 नवीन पदवीधरांची नियुक्ती करण्याची त्यांची योजना आहे. कंपनीने गेल्या सहा महिन्यांत 43,000 पदवीधरांना आधीच नियुक्त केले. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा अॅट्रिशन रेट वाढून 11.9% झाला जो मागील तिमाहीत 8.6% होता. आयटी दिग्गज विप्रोचे सीईओ आणि एमडी, थियरी डेलापोर्टे यांनी आपल्या दुसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या अद्ययावतनादरम्यान सांगितले की, कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 8,100 तरुण सहकाऱ्यांसह नवीन फ्रेशर्सची भरती दुप्पट केलीय.

एचसीएल टेक्नॉलॉजीजने गुरुवारी सांगितले की, कंपनी या वर्षी सुमारे 20,000-22,000 फ्रेशर्स पदवीधर घेण्याचा विचार करीत आहे आणि पुढील वर्षी 30,000 फ्रेशर्स घेण्याची योजना आहे.


Cognizant Recruitment 2021

IT Recruitment 2021 : Cognizant will recruit 1 lakh freshers. Cognizant CEO Brian Humphries said, “We think we will be hiring 1 million employees and training 1 million associates in 2021. In addition, Cognizant plans to acquire 30,000 freshers in 2021 and 45,000 freshers in India. 

IT Recruitment 2021 – अमेरिकन आयटी कंपनी Cognizant या वर्षी जवळपास एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. कॉग्निजेंटचे भारतात जवळपास 2 लाख कर्मचारी आहेत. या कंपनीचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे असते. कंपनीने सांगितलं की, जूनच्या तिमाहीमध्ये त्यांच्या एकूण उत्पन्नात 41.8 टक्के वाढ झाली असून ते 51.2 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 3 हजार 800 कोटी रुपये इतकं झालं आहे. कंपनीने जून 2020 च्या तिमाहीत एकूण उत्पन्न 36.1 कोटी डॉलर्स इतकं होतं.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर! 10 हजार जणांची होणार भरती

पर्सिस्टंट आयटी कंपनीत 2 हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी!! 

खुशखबर – HCL टेकमध्ये होणार 20 ते 22 हजार कर्मचाऱ्यांची भरती 

 

यंदा जूनच्या तिमाही अखेरपर्यंत कंपनीचे जवळपास 3 लाख कर्मचारी होते. कॉग्निजेंटचे सीईओ ब्रायन हम्फ्रीज यांनी सांगितलं की, आम्हाला वाटतं की, आम्ही 2021 मध्ये 1 लाख कर्मचाऱ्यांची भरती करू आणि 1 लाख असोसिएट्सना प्रशिक्षण देऊ. याशिवाय कॉग्निजेंट 2021 मध्ये 30 हजार फ्रेशर्स घेणार आहे तर भारतात 45 हजार फ्रेशर्सना घेण्याचा प्रस्ताव देण्याचा विचार करत आहे.

मोठ्या प्रमाणात नोकरभरती, TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून 1 लाखांहून फ्रेशर्स उमेदवारांना संधी 

तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करताना तो 4.69 ते 4.74 अब्ज डॉलर्स इतका सांगितला आहे. तर आर्थिक वर्ष 2021 चा वर्षभराचा अंदाज हा 18.4 ते 18.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतका असेल असंही कंपनीने म्हटलं आहे.

खालील मोठ्या कंपन्यात सुद्धा भरती अर्ज सुरु : 

कॉग्निजेंटचे मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सेवांच्या कक्षा विस्तारण्यासाठी ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी भरती सुरु ठेवली असून त्यामध्ये कंपनी गुंतवणूक करत आहे. जूनच्या तिमाही अखेरपर्यंत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 3 लाखांपर्यंत पोहोचली आहे.


Jobs in IT Company – खुशखबर! कॉग्निझंट २८ हजार फ्रेशर्सची भरती करणार!

या वर्षी कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामध्ये आयटी क्षेत्राचाही (IT Sector) समावेश आहे. त्यामुळे जॉबच्या (Jobs) शोधात असलेले फ्रेशर्सदेखील अडचणीत आले आहेत.मात्र आता, आयटी क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या फ्रेशर्ससाठी (Freshers) एक दिलासादायक बातमी आहे. आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी कॉग्निझंटने (Cognizant) यावर्षी २८ हजार फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा केली आहे. (Cognizant to Recruit 28,000 Indian freshers this year).
cognizant Jobs 2021
कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज म्हणाले की, “सध्या जगभरात कोरोनाने अनेकजण चिंतेत आहेत. त्यामुळे सगळीकडे औदासिन्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने हे पाऊल उचलले असून आम्ही कर्मचाऱ्यांच्या पगाराचे योग्य व्यवस्थापन करण्याचे काम करीत आहोत.”

अधिकृत वेबसाईट 
IT Recruitment 2020 : आयटी क्षेत्रात १ लाख रोजगाराच्या संधी; कंपन्या मोठ्या प्रमाणात करणार नोकरभरती. Large Number of Vacancies in IT Industries in India. Various New opportunities.

भारतातील आयटी कंपन्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती करण्याच्या तयारीत आहेत. टॉप कंपन्या देशभरात कमीत कमी एक लाख भरती करणार आहेत. क्लाइंट कंपन्यांकडून बरेच काम डिजिटल माध्यमातून करणं सुरु आहे, त्यामुळे आयटी क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. क्लाइंट कंपन्यांनी त्यांचे काम आऊटसोर्सिंग करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांना नवीन नोकरी भरती करणार आहेत.

IT Recruitment image.jpg

पहिल्या तिमाहीमध्ये भरती रोखल्याने आता या कंपन्यांनी वेगाने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस यावर्षी ४० हजार नवीन भरती करू शकते. कंपनीने नवीन आणि पार्श्विक भरती सुरू केली आहे. इन्फोसिस २० हजार आणि एचसीएल १५ हजार भरती करेल. कॉग्निझंट देखील १५ हजार भरतीची तयारी करीत आहेत. कोविड -१९ मुळे कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक आयटी कंपन्यांनी नवीन जॉइनर्सना लेटर देणे देणे बंद केले होते. परंतु आता या भरती पुन्हा सुरू झाल्या आहेत.

जेनसर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात त्यांनी पाच लोकेशन फ्रेशर्स भरती केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कंपन्यांनी भरती केली नसल्याने बरीच जागा भरायच्या बाकी आहेत. गेल्या काही महिन्यांत आयटी कंपन्यांच्या महसुलात घट झाली होती. पण आता परिस्थिती हळूहळू सुधारत चालली आहे. महसूल वाढत असल्यानं कंपन्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे डिजिटलायझेशन होत असल्याचे आयटी कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यांचे बरेच काम डिजिटल माध्यमातून केले जात आहे. म्हणून कमाईची चांगली शक्यता आहे. कोरोनामुळे डिजिटल परिवर्तनाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिल्यावेळी बँकिंग क्षेत्रातील डिजिटल रूपांतरणाचा प्रोजेक्ट १२-१३ महिन्यात पूर्ण झाला होता, तो आता २-३ महिन्यांत पूर्ण होत आहे. आयटी कंपन्यांच्या म्हणण्यानुसार मध्यम व वरिष्ठ पातळीवरही मोठ्या प्रमाणात भरती होत आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
  1. Swapnil says

    Hello I am bsc it pass out yr 2008 can i apply and will I get job

  2. Sagar bhoyar says

    I am mechanical engineer I have interest in it job pass

  3. Arati kadam says

    Mi 12 th pass aahe account job aahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड