Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर! 10 हजार जणांची होणार भरती

UST Recruitment 2021

UST Recruitment 2021 Details 

UST Recruitment 2021This is good news for job seekers in the IT sector. Digital Transformations Solutions Company (UST) has announced that it will hire more than 10,000 new employees in its offices across the world, including India. Further details are as follows:-

बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी. ‘या’ IT कंपनीमध्ये 10 जणांची होणार भरती. या संदर्भातील अधिक माहिती खालीलप्रमाणे….

नोकरीच्या शोधात असलेल्या आयटी क्षेत्रातील (IT) लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यूएसटी (UST) या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स कंपनीने (Digital Transformations Solutions Company) यंदा भारतासह (India) जगभरातील त्यांच्या कार्यालयांमध्ये तब्बल 10,000 पेक्षा अधिक नवीन कर्मचारी (New Employee) नोकरीवर घेण्याची घोषणा केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

UST ग्राहकांना मानव-केंद्रित दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या व्यवसायात बदल करण्यासाठी मदत करणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने ही कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने एक निवेदन जारी केलं आहे. UST कंपनी दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांची भरती करणार असून, यात 2 हजार जागा एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग पदासाठी असतील. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे. अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मॉडर्नायझेशन, AI/ML, ऑटोमेशन (RPA/IPA) याचं ज्ञान असणं हे मुख्य कौशल्य ठरेल.

ही नवीन कर्मचारी भरती प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोपसह आशिया पॅसिफिक देशांमध्ये केली जाणार आहे. आशिया पॅसिफिक देशांमध्ये भारत, इस्रायल, मलेशिया आणि सिंगापूर येथून कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. तर युरोपमधील ब्रिटन, स्पेन, जर्मनी, बल्गेरिया, रोमानिया, युक्रेन, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आदी विविध देशांमध्ये ही भरती केली जाणार आहे. मात्र, कोणत्या देशात किती कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल याची माहिती कंपनीने दिलेली नाही.

UST Mega Bharti 2021 Selection Process – निवड प्रक्रिया 

  • UST मध्ये निवड होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 100 तासांच्या विशिष्ट कौशल्य कार्यक्रमामधून (Skill Program) जावं लागतं.
  • नवनिर्मितीवर कंपनीचा भर असल्याने कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अडचणी दूर करणारी इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स पुरवते.
  • त्यामुळे अशी सोल्युशन्स निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यं असलेल्या उमेदवारांची निवड केली जाते.
  • कंपनी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अत्यंत उत्तम वातावरण देते.
  • फ्लेक्सिबल आणि हायब्रिड वर्कप्लेस कल्चरमुळे कंपनी भारत, यूके, मेक्सिको आणि यूएसमध्ये ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ साठी (Great Place to work) ओळखली जाते, असं कंपनीच्या मुख्य संयुक्त अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड