खुशखबर! TCS या मोठ्या आयटी कंपनीत मोठी नोकरभरती! TCS Recruitment 2021

TCS Bharti 2021

TCS Recruitment 2021 Details 

TCS Bharti 2021 : Tata Consultancy Services will have large recruitment for women. The recruitment will be done through TCS’s Rebegin initiative, Rebegin is an initiative of TCS. There will be huge recruitment for women for various positions soon. In June this year, TCS hired more than 20,000 employees, one of the highest in any quarter. Further details are as follows:-

आयटी क्षेत्रात मोठ्या संधी सध्या दिसत आहेत. तरुणांची मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाते आहे. शिवाय आयटी कंपन्या (IT sector) कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढदेखील देत आहेत. कोरोना काळात तंत्रज्ञानाला आलेल्या महत्त्वामुळे आणि त्यामध्ये झालेल्या बदलांमुळे आयटी क्षेत्रात (IT jobs)मोठ्या संधी निर्माण होत आहेत. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू झाली आहे.

Infosys कंपनी मध्ये नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या | Infosys Recruitment 2021

आयटीमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता !

सध्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मागणी ४०० टक्क्यांनी वाढली आहे. फक्त इतकेच नाही तर एखाद्या विशेष कौशल्यात प्रभुत्व असणाऱ्यांनादेखील मोठी मागणी आहे. यामध्ये अॅप्लिकेशन डेव्हलपर, लीड कन्सल्टन्ट, सेल्सफोर्स डेव्हलपर आण साइट रिलाअॅबिलिटी इंजिनियर यांची मागणी १५० ते ३०० टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ही नोकरी देणारी प्रमुख कौशल्ये झाली आहेत.

कंपन्या देतायेत मोठ्या पगाराच्या ऑफर्स!

फक्त नोकरभरतीचे प्रमाण वाढले आहे असे नाही तर कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठ्या पगाराच्या ऑफर्स देत आहेत. कंपन्या मोठ्या पगाराच्या ऑफर देत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. चांगल्या इंजिनियरला कंपन्या ७० ते १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ देत आहेत. ही वेतनवाढ खूपच जास्त आहे. मागील वर्षापर्यत याच कर्मचाऱ्यांना २० ते ३० टक्के वेतनवाढ दिली जात होती. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने म्हणजे टीसीएसने अलीकडेच जाहीर केले ते महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी नोकरभरती करत आहेत. ज्या महिलांच्या करियरमध्ये गॅप आला असेल किंवा मधला काही काळ नोकरी करता आली नसेल त्यांना मोठीच संधी आहे. गुणवान महिला कर्मचाऱ्यांना नव्याने करियरची संधी देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

 


TCS Bharti 2021

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata Consultancy Services – TCS) महिलांसाठी लवकरच विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे. टीसीएसच्या Rebegin या उपक्रमाच्या माध्यमातून ही भरती केली जाणार असून, Rebegin हा TCS चा एक उपक्रम आहे. या उपक्रमातून प्रतिभावान महिला व्यावसायिकांना त्यांच्या कारकिर्दीला योग्य प्रेरणा मिळण्याची संधी मिळते. त्यामुळे महिलांना आता आयटी (IT) क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची तसेच नोकरी करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सध्या TCS अशा महिलांना ही जॉबची संधी देऊ इच्छित आहे, ज्यांना काही कारणास्तव आपला जॉब सोडावा लागला होता; मात्र, आता त्या पुन्हा जॉब करू इच्छितात. मात्र यासाठी त्यांच्याकडे कमीत कमी दोन वर्षांचा सलग आयटी सेक्‍टरमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. ज्यांना विश्वास आहे की ते त्यांच्या कौशल्य आणि दृष्टिकोनातून जग बदलू शकतात, अशा प्रतिभावंत महिलांसाठी डिझाईन केलेले आमचे विशेष नियुक्ती उपक्रम सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असं TCS ने म्हटले आहे.

या वर्षी जूनमध्ये TCS ने 20 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली, जी कोणत्याही तिमाहीत सर्वाधिक भरतींपैकी एक आहे. TCS मध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. कंपनीने असेही सांगितले, की आर्थिक भरपाईची गतीही समान राहील आणि या वर्षी 40 हजारांहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती केली जाईल.

How to Apply For TCS Jobs for Women

 • प्रारंभी TCS च्या करिअर पोर्टलवर जा.
 • यानंतर Rebegin या लिंकवर क्‍लिक करा.
 • यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्‍लिक करा.
 • यानंतर Apply वर क्‍लिक करा.

Eligibility Criteria TCS Jobs 2021 

 • SQL Server DBA
 • Linux Administrator
 • Network Admin
 • Mainframe Admin
 • Automation Testing
 • Performance Testing Consultant
 • Angular JS
 • Oracle DBA
 • Citrix Administrator
 • Java Developer
 • Dotnet Developer
 • Android Developer
 • IOS Developer
 • Windows Admin
 • Python Developer
 • PL SQL

यापैकी कोणत्याही कोर्समध्ये शिक्षण झालं असेल तर तुम्ही या जॉब्ससाठी अप्लाय करू शकता.

TCS Recruitment 2021 Application Link

अर्ज करा – https://on.tcs.com/3nSi69Z

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड