खुशखबर – HCL टेकमध्ये फ्रेशर्सना मिळणार मोठी संधी

HCL Mega Recruitment 2021

HCL Freshers Recruitment 2021

HCL Mega Recruitment 2021 : If you have studied BE / B.Tech/ MCA / M.Tech/ M.Sc in Computer Science or IT then this is a golden opportunity for you. For the first time, Hindustan Computers Limited (HCL) has organized a career program for freshers students. Further details are as follows:-

हिंदुस्थान कम्प्युटर्स लिमिटेडनं (HCL) पहिल्यांदाच फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर प्रोग्रामचं आयोजन केलं आहे. जर तुम्हालाही तुमचं करिअर सुरू करण्यासाठी कोणत्या चांगल्या कोर्सची गरज असेल तर तुम्ही या प्रोग्रामसाठी लगेच अप्लाय करू शकता. गेल्या काही काळातील IT कंपन्यांमधील जॉब्सचं प्रमाण बघता या प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यानं चांगली नोकरी नक्की मिळू शकणार आहे.

TCS कडून 15 दिवसांचा डिजिटल सर्टिफिकेट कोर्स; जाणून घ्या

BE/ B.Tech/ MCA/ M.Tech/ M.Sc कम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT मध्ये तुमचं शिक्षण झालं असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. हा प्रोग्राम पूर्ण करून तुम्हाला उत्तम IT कंपनीमध्ये जॉब मिळू शकणार आहे. IT इंजिनिअर किंवा BCA मधून पदवीधर विद्यार्थी या कोर्ससाठी अप्लाय करू शकणार आहेत. 2018, 2019, 2020 आणि 2021 बॅचेसच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

पात्रतेचे निकष- Eligibility Criteria for HCL Jobs 2021

 • उमेदवारांना बारावी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षणामध्ये 65 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे.
 • लखनऊ, नागपूर, विजयवाडा, मदुराई या शहरांमधील फ्रेशर्स इंजिनिअर्ससाठी ही संधी असणार आहे.
 • तीन महिन्यांच्या प्रोग्रामनंतर या उमेदवारांना त्या शहरांमधील ऑफिसमध्ये जाऊन ट्रेनिंग घेता येणार आहे.

या संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना HCL टेक्नॉलॉजीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवता येणार आहे.

कसं असेल प्रोग्रामचं स्वरूप 

HCL चा करिअर प्रोग्राम 6 महिन्यांचा असणार आहे. यात 3 महिने virtual क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे. विशेष म्हणजे हे ट्रेनिंग तुम्हाला आपल्या घरी राहूनच करता येणार आहे. तर त्यानंतरचे तीन महिने हे ट्रेनिंग तुम्हाला HCL Technologies च्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण करावं लागणार आहे. या प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांना 1.5 लाख आणि त्यासोबत टॅक्सेस असं शुल्क भरावं लागणार आहे.

भविष्यातील संधी 

या प्रोग्रामनंतर काही उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही निवड पूर्णतः तुमच्या कामावर आणि प्रोग्राममधील प्रगतीवर अवलंबून असणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना IT Engineer, Analyst, Design Engineer या पदांवर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये उमेदवारांना INR 2.75 लाख रुपये प्रतिवर्ष पगार देण्यात येणार आहे.

 


HCL Mega Recruitment 2021 Details 

HCL Mega Recruitment 2021 : It is a company that is making rapid progress in the field of information technology. This year, the company will offer opportunities to new candidates. Under this, 20,000 to 22,000 people will be recruited. The company has also clarified that it is also increasing the salaries of certain smart employees from July 1. Further details are as follows:-

कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद होते. पण आयटी कंपन्यांचे काम मात्र सुरूच आहे. आयटी फर्म एचसीएल टेक्नॉलॉजीसकडून येणाऱया काळात 20 हजार जणांची भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती साधणारी ही कंपनी आहे. यावषी कंपनी नव्याने उमेदवारांना संधी देऊ करणार आहे. याअंतर्गत 20 ते 22 हजार जणांना भरतीत सामील करून घेतले जाणार आहे.

मोठ्या प्रमाणात नोकरभरती, TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून 1 लाखांहून फ्रेशर्स उमेदवारांना संधी

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

1 जुलैपासून ठरावीक हुशार कर्मचाऱयांच्या वेतनात वाढही करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जून 2021 च्या तिमाहीअखेर नोयडात मुख्य कार्यालय असणाऱया या कंपनीत एकूण कर्मचाऱयांची संख्या 1 लाख 76 हजार 499 वर पोहोचली आहे. याच दरम्यान नव्याने दाखल झालेल्या कर्मचाऱयांची संख्या 7 हजार 522 वर पोहोचली आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीसचे मनुष्यबळ विकास अधिकारी (सीएचआरओ) आप्पाराव व्ही. व्ही. यांनी सांगितले, की 2020 मध्ये कंपनीने 14 हजार 600 जणांना जागतिक स्तरावर सामावून घेतले आहे. यावषी 20 ते 22 हजार उमेदवारांना भरती करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रेशर्सची संख्या 6 हजार इतकी असू शकते, असेही ते म्हणाले. जून 2021 ला कंपनीने 9 टक्के वाढीसह 3214 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.


HCL Mega Recruitment 2021 : एचसीएल टेक्नॉलॉजीजने तिच्या नागपूरमधील मिहान येथील प्रकल्पात एक हजार नवे कर्मचारी घेण्याचे ठरवले आहे. ही नोकरभरती महिन्याभरात पूर्ण होईल. यामध्ये अननुभवी व अनुभवी असे दोन्ही व्यावसायिक घेतले जाणार आहेत. या एक हजार पदांसाठी कॉलेजांतून नुकतेच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्यांनाही संधी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मिहानमध्ये एचसीएलचा ५० एकर जागेतील प्रकल्प एप्रिल २०१८ पासून दोन हजार कर्मचाऱ्यांसह कार्यान्वित आहे. हे केंद्र आता अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वारे जगभरातील प्लॅटिनम प्रमाणित प्रकल्पाच्या ‘एलिट लीग’चा भाग आहे. या प्रकल्पात अभियांत्रिकी, अनुसंधान व विकास सेवा (ईआरएस) आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवा व्यवसाय विकसित केले जातात. याखेरीज एचसीएल नागपूरतर्फे ‘कम बॅक होम’ ही मोहीम राबवली जात असून या अंतर्गत नागपुरातील आयटी तज्ज्ञांना त्यांच्या घरी परत बोलवून ईआरएस, अॅप्लिकेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवेमध्ये करियर घडवण्याA4ाठी प्रोत्साहित केले जाते. तसेच ‘स्टे रूटेड’ ही मोहीम कंपनी पदवीधरांसाठी राबवत असून त्यांच्या स्वतःच्या शहरात जागतिक पातळीवर संधी निर्माण करण्यावर याअंतर्गत भर दिला जात आहे. दोन वर्षांपासून २० वर्षांपर्यंतच्या अनुभवी व इच्छुक आयटी व्यावसायिकांनी recruit.nagpur@hcl.com वर अर्ज करावा, असे आवाहन एचसीएल टेक्नॉलॉजीजने केले आहे.

सोर्स : म. टा.


सुवर्णसंधी ! HCL कंपनी देणार 1000 जणांना नोकरी; ‘या’ तारखांना होणार व्हर्च्यूअल नोकरभरती

HCL Mega Recruitment 2021 : आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी असलेली कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने (HCL Technologies) येणाऱ्या १२ आणि १३ फेब्रुवारीमध्ये व्हर्च्युअल रिक्रुटमेंट ड्राइव्हचं (virtual recruitment drive) आयोजन केलं आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, आणि IT प्रोफेशनल् अशा सर्वाना यामध्ये संधी आहे. यामध्ये कंपनीने १००० उमेदवारांसाठी नोकरी देणार असल्याचं सांगितलं आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

पदवीचं शिक्षण पूर्ण केलेले फ्रेशर, २ ते ८ वर्षांचा अनुभव असलेले, तसेच Java, चीप डिझायनिंग, डॉटनेट, अझूर, सॅप, पायथॉन आणि इतर कौशल्यांमध्ये कुशल असलेले आणि अनुभवीही या ड्राइव्हमध्ये संधी मिळणार आहे. गन्नावरम सेंटरमध्ये आणखी ५००० जणांची भरती होणार आहे. सध्या याठिकाणी १५०० कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे आताच्या कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के विजयवाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. ‘सरकारशी करार करूनही आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देतो आम्ही अशा पद्धतीने १००० जणांना प्रशिक्षण देऊ शकतो. आपल्या घराजवळच इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ॲप्लिकेशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट (Engineering Services, Applications and Product Development) विषयांतील करिअर करता येते अशी माहिती कंपनीच्या कॉर्पोरेट उपाध्यक्षा आणि न्यू व्हिस्टास प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती शिवशंकर यांनी दिली आहे.

तर HCL ने आधी सुरू केलेल्या टेकबी उपक्रमाअंतर्गत माध्यमिक परीक्षांमध्ये ६५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला उमेदवार एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतो. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एंट्री लेव्हलचा जॉब त्याला कंपनीकडून मिळू शकतो. या प्रशिक्षणादरम्यान आपलं स्किल दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधीही कंपनी देते. बिट्स पिलानी किंवा सास्रा विद्यापीठातून हे विध्यार्थी पुढचं शिक्षण घेऊ शकतात. तर आतापर्यंत सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी टेकबी उपक्रमासाठी नाव नोंदणी केली आहे. असे शिवशंकर यांनी सांगितले आहे. तसेच HCL कंपनीने दिलेल्या संधीचा फ्रेशर्स आणि इतर प्रोफेशनल्सनी उपयोग करून घावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी कंपनीची वेबसाईट hcltech.com हि दिली आहे.

सोर्स : पोलीसनामा


HCL Mega Recruitment 2021 : HCL is going to hire near about 20000 employees in coming months –  लॉकडाऊनचा काळ आणि सध्या ऑनलाईन व्यवहारावर सरकारचा असलेला भर या गोष्टींमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र भरभराटीला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीच्याही (HCL Technology) महसुलात मागील तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल वाढ आणि या क्षेत्रात होणारी प्रगती लक्षात घेता आगामी काळात HCL Technology 20 हजार जणांना नोकरी देणार आहे. (hcl is going to hire near about 20000 employees in coming months)

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


HCL Technology च्या महसुलात मोठी वाढ

मागील तिमाहीत HCL Technology च्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. या कंनीच्या निव्वळ नफ्यामध्ये तब्बल 31 टक्क्यांनी वाढ झालीये. कंपनीने सांगितल्यानुसार हा नफा 3982 कोटी रुपये आहे. तसेच कंपनीच्या एकूण महसुलात 6.4 टक्क्यांनीव वाढ जाली असून हा महसूल 19302 कोटी रुपये आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आगामी काळात या कंपनीकडून 20 हजार नवे रोजगार दिले जातील, असं एका अधिकाऱ्यांने सांगितलंय.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विजय कुमार यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मागील काही महिन्यांमध्ये कंपनीने अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. तसेच, लोकांचे डिजिटल सेवा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन HCL Technology आगामी काळात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीत 1,59,682 कर्मचारी कामावर होते. मागील तिमाहीमध्ये आम्ही एकून 12,422 जणांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यानंतर मधल्या काळात अनेकांनी राजीनामे दिले. त्यामुळे पुढच्या 4 ते 6 महिन्यांत 20 हजार जणांना काम देणार आहेत.” यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तसेच अनुभवी लोकांची निवड करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

HCL Mega Recruitment 2021 – सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 26.7 टक्के नफा

लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. मात्र आता सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत झाल्यानंतर बाजारात तेजी आली आहे. त्यामुळे HCL Technology कंनीच्या नफ्यामध्येसुद्धा चांगली वाढ झाली. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात HCL Technology या कपंनीला 26.7 टक्के जास्त फायदा झाल्याचं या कंपनीने सांगितलं आहे.

सोर्स : टीव्ही 9 मराठी


HCL करणार १५००० फ्रेशर्सची महाभरती लवकरच – कोरोना विषाणू्च्या फैलावामुळे सध्या गंभीर संकट उभे राहिलेले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगसारखे निर्बंध वारंवार लागू करावे लागत असल्याने त्याचा विपरित परिणाम उद्योगधंदे आणि अर्थविश्वावर होत आहे. व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीने नव्या कर्मचाऱ्यांच्या मेगा भरतीची घोषणा केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये नव्या १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कॉलेज कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ही भरती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून ९ हजार पदांची भरती केली होती.

याबाबत कंपनीचे एचआर हे अप्पाराव व्हीव्ही यांनी सांगितले की, ही भरती दोन प्रमुख पातळ्यांवर होणार आहे. यामध्ये ग्रोथ आणि रिक्त पदे भरली जातील. गेल्या आणि चालू तिमाहीमध्ये कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एट्र्रिशन रेट खूप कमी झालाआहे. या तिमाहीमध्ये एट्रिशन रेट हा सिंगल डिजिटच्या आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅक फिल हायरिंग कमी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोविड-१९ मुळे कॅम्पस हायरिंगमध्ये काही अडथळे येऊ शकतात. कारण कॅम्पस अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही झालेल्या नाहीत. दरम्यान, कंपनी पूर्णपणे व्हर्च्युअल माध्यमातून भरती करणार आहे. जूनमध्ये कंपनीने १ हजार कॅम्पस रिक्रुटमेंट केल्या आहेत. तसेच कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठीचा सरासरी पगार ३.५ लाखांपर्यंत आहे.

दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असले तरी जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीच्या उत्पादनक्षमतेत वाढ झाली आहे. कंपनीचे सुमारे ९६ टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. तर २ टक्के कर्मचारी त्यांची केंद्रे आणि उर्वरित २ टक्के कर्मचारी ग्राहकांकडे जाऊन काम करत आहेत, असेही अप्पाराव यांनी सांगितले.

सोर्स : लोकमत


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

34 Comments
 1. Sonal Shashikant Jagtap says

  Dear Sir/Madam
  I needed a job

 2. Kamlesh Dattaram Mirgal says

  Mi ssc fel aahe mala job bhetel ka

 3. Vikas ugale says

  I am a graduate sir/mam

 4. Sharad Somnath Madage says

  Job ahe ka

 5. Rahul Rathod says

  I am B.sc Completed plzz Reply mi

 6. Namdev Ghadge says

  Sir , Mi SSC pass aahe !
  Mala 10 th la’ 76 ‘ marks aahet .

 7. Pavankumar says

  Kadhi honar ahe bharti?

 8. Yogesh nalind kshirsagar says

  Muze nokari chait

 9. Manisha asane says

  Respected sir/madam
  I needed a job

 10. Bhagyashree Rode says

  Iam BCA Graduation Completed I need Job

 11. सुरज says

  हि भरती केव्हा होणार आहे
  आणि या भरतीला शिक्षणाची अट काय आहे

 12. Rutika says

  Qualification kay ahe

 13. More Gajanan says

  हि.भरती कधी होणार आहे

 14. Arun Gholap says

  Sir B.com cya Bes ver konta job ahet.plz. Agents sanga sir..

 15. Namrata Shende says

  He bharti kadhi honar ahe ani education kay pahije

 16. Megha Kudtarkar says

  I am Bsc graduate want to apply for the job

 17. Sagar Katore says

  I am Electrician tecnician job

 18. Nitin mane says

  B.COM complete

 19. Sarita milendra Tekam says

  Hiii sir/mam.
  Muze ye job krni hai mai 12 pass hu , sir our kb nikhlegi ye bharti……?

 20. Sarita milendra Tekam says

  .
  Hiii sir/mam.
  Muze ye job krni hai mai 12 pass hu , sir our kb nikhlegi ye bharti……?

 21. Sonali Nikhil Khadtare says

  I have Msc. in analytical chemistry. I need a job in this field…..

 22. Prajakta patil says

  I am Mechanical engineer.I have worked for General Electric.(1yr experience)

 23. Nikesh says

  Dear sir/madam

  i needed a job

 24. Nikesh says

  Dear sir/madam

  i needed a job please

 25. Vaishnavee pagdhune says

  I am Vaishnavee patil I have complete my
  B.com III year. And typing Marathi 30 English 30 40. M.S.C.I.T Tally D.T.P

 26. Rajesh chavan says

  Sir interview kadhi chalu honar

 27. Dilip rathod says

  Barti kadhi honar

 28. jyoti male says

  sir / mam mi 10pass aahe mla 66 mark aahet mla job milel ka please reply dya🙏🙏

 29. Roshan Rokade says

  I am 12 pass ITI COPA

 30. Dhammapriya Rajendra fulmali says

  I am post graduate diploma in Economics bhi

 31. Aparna Arvind Kadu says

  Please link send me

 32. Avinash Pawar says

  I am 10pass & MSCIT

 33. Amol Jadhav says

  B.A. passed & ITI fitter , MSCIT, TALLY, ncvt passed

 34. Pravin Bhaskar gawai says

  Can I apply hvac technician post in maintenance department

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड