महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – १९५८ – Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download
Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download
Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download – The PDF copy of Gram Panchayat Act 1958 in Marathi is given below for downloading. The candidates looking for this Act PDF Copy can download this copy of document for your reference. This PDF is published by government, so can download the document for free. This Document cover all information about Panchayat Samiti, Zilla Parishad, Gramin Shasan, Gram Panchayat & other details. Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download Link is given for your refrence.
Maharashtra Gram Panchayat Adhiniyam 1958, 1959 Sudharit
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – १९५८ आणि त्यातील सुधारणा , Maharashtra Gram Panchayat Act, 1958 in Marathi pdf – मित्रांनो आपल्याला माहीतच असेल कि आपल्या भारतात, समाजाचे नियमन करण्यात स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थांसोबत, फेडरल सरकार आणि राज्य सरकार देखील सामाजिक नियमनाच्या कामात सहभागी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असे वर्गीकरण केले जाते. तर मित्रानो, या लेखात ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल जाणून घेऊया. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना एकत्रितपणे ‘पंचायती राज्य व्यवस्था’ असे म्हणतात. या संदर्भातील पूर्ण नवीन माहिती आणि यात झालेले विविध बदल आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Gram panchayat information in Marathi
ग्रामपंचायत हि संस्था गावाचा कारभार आणि विविध विकास योजना राबवित असेल, याचा उद्देश म्हणजे गावाचा सर्वागीण विकास होय. या स्थानिक संस्थेला ग्रामपंचायत असे म्हणतात. याच समितीला ग्रामसभेची कार्यकारी समिती असे सुद्धा म्हणतात. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने या समितीचा पूर्ण कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीचा कारभार मुबंई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये चालतो. तसेच मित्रानो, नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी कमीत कमी ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
Gram Panchayat Sabhasad List
Number of Gram panchayat Sabhasad is depend on the populations of village. The Details about this are given below.
गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतीच्या सभासदची संख्या खालील प्रमाणे ठरवली जाते.
१) 600 ते 1500 – 7 सभासद
२) 1501 ते 3000 – 9 सभासद
३) 3001 ते 4500 – 11 सभासद
४) 4501 ते 6000 – 13 सभासद
५) 6001 ते 7500 – 15 सभासद
६) 7501 त्यापेक्षा जास्त – 17 सभासद
Gram Panchayat Karya
ग्रामपंचायतींची कार्ये: ग्राम पंचायत गावाच्या विकासासाठी विविध कार्य आणि योजना राबविते. या बद्दल संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे आहे.
- १. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.
- २. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
- ३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
- ४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.
- ५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.
- ६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.
- ७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.
- ८. प्रशासन – महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे.
Table of Contents
गांवा मधे कूठली अप्पाती अल्यास ते सुवेव्सथित करण्यास न्यायालीन खर्च करू शकतात काय
disqualification of sarpanch and appellate authority
Gram Panchayat Act 1958 in Marathi PDF Download – धन्यवाद !