नोकरभरतीत पाच टक्के जागा प्रकल्पग्रस्तांना

Government Job 2021

Government Job 2021 : राज्यातील प्रकल्पग्रस्तांना सर्व शासकिय विभागांच्या वर्ग 3 व 4 श्रेणीच्या पदांकरीता पाच टक्के कोटा आरक्षित करुनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागणीनुसार मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या नव्याने होणा-या पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सामावून घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 1 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.

राज्यातील प्रकल्पग्रस्तांनी सिंचन प्रकल्प व्हावेत याकरीता शासनाच्या नियम व अटीनुसार पुनर्वसन करण्यात आले. हे पुनर्वसन झाल्यानंतर अशा विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना राज्यशासनाकडून एकूण पदभरतीमध्ये 5 % जागा आरक्षित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित करत सर्व विभागांना सुचना दिल्या आहेत. परंतु याबबात प्रत्यक्षात या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची बाब आबिटकर यांनी भरणे यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी आबिटकर म्हणाले, ‘प्रकल्पग्रस्तांनी आपल्या पिढयान् पिढया नोकरीपासून वंचित असून प्रकल्पग्रस्तांना नाममात्र म्हणायला प्रकल्पग्रस्त दाखले मिळाले आहेत. प्रत्यक्षात आजही राज्यामध्ये हजारो प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित असून त्यांची व त्यांच्या कुटूंबाची यामुळे वाताहात झालेली आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यायचा असेल तर सर्व विभागांनी त्यांच्या पदभरतीमध्ये 5 % जागा राखीव ठेवून पद भरती केली पाहीजे.’

राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यायचा असल्यास सामान्य प्रशासन विभागाने सर्व शासकीय विभागांच्या पदांचा अहवाल पुढील 1 महिन्यामध्ये सादर करावा, अशा सुचना भरणे यांनी दिल्या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सिताराम करपते, उपसचिव गीता कुलकर्णी, राजेंद्र वाघ आदि उपस्थित होते.

सोर्स : सकाळ


अडीच लाख शासकीय पदे रिक्‍त ! जाणून घ्या

Government Job 2021 : जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेने आता शासनाला स्मरणपत्र दिले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांची अंमलबजावणीसह ग्रामीण विकासासंबंधीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागास संचालक नाही. तर कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व बार्शी या पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारीच नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता, बांधकाम विभागात नऊ उपअभियंते, नऊ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसतानाही जिल्ह्याला साथरोग वैद्यकीय अधिकारी मिळू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या तथा शासकीय वाहनांना 21 वाहनचालक नाहीत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची 156 पदे रिक्‍त झाली आहेत. पाच औषण निर्माण अधिकारी, 21 आरोग्य पर्यवेक्षकांची पदेही रिक्‍त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीस वित्त विभागाने मान्यता देऊनही सोलापूर जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त असूनही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही, हे विशेष.

Vacancy Details – झेडपीतील रिक्‍तपदांचा घोषवारा… 

 • प्राथमिक शिक्षक : 596
 • मुख्याध्यापक : 142
 • आरोग्य कर्मचारी : 405
 • पशुधन विकास अधिकारी : 41
 • बांधकामसह अन्य विभाग : 189
 • एकूण : 1,250

सोर्स : सकाळ


सरकारी नोकरीची संधी, शिक्षण विभागातील भरतीला सरकारची मान्यता 

Government Job 2021 : कोरोना लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर आता राज्य सरकारने भरती प्रकियेला गती देण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरतीची गुडन्यूज दिल्यानंतर, पोलीस दलातही मोठी भरती लवकरच सुरु होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. त्यानंतर, आता शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनीही ट्विटरवरुन शिक्षण विभागातील भरतीसंदर्भात माहिती दिली आहे.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरोग्य विभागाकडून भरती प्रकियेची जाहिरात निघाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते. आता, वर्षा गायकवाड यांनीही शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीसंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण २६६ पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलंय. त्यासोबतच, शासनाचे पत्रही जोडण्यात आले आहे. त्यामुळे, आता लिपिक पदासाठी लवकरच जाहिरात निघणार असून उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

सोर्स : लोकमत


Government Job 2021 : सरकारी नोकरी करण्याची बर्‍याच लोकांची इच्छा असते, पण सरकारी नोकरीचं स्वप्न काहींचं अपूर्णच राहतं. दरवर्षी बरेच तरुण सरकारी नोकरीची तयारी सुरू करतात. काही तरुण 12 वीनंतर आणि काही पदवीनंतर सरकारी नोकरीची तयारी करण्यास सुरुवात करतात. प्रत्येक तरुण त्यांच्या क्षमतेनुसार नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु काहीवेळा अर्ज करूनसुद्धा त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. पण त्यातून निराश होण्याची आवश्यकता नाही, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. आतासुद्धा सरकारनं अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज मागवलेले आहेत. (Government Job 2021 Live Updates Today Apply Online For India Post UPPCL NALCO ECIL ETC GOVT JOBS)

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

NHM Recruitment 2021: NHM मध्ये गुणवत्तेच्या आधारे होणार निवड, आजच अर्ज करा

हरियाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) विभाग अनेक पदांवर भरती करणार आहे. ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे तरुण अर्ज करण्यास पात्र असतील. तसेच कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.

NALCO Recruitment 2021: दहावी पास 90,000 पर्यंत पगार मिळेल

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर रोजगार निर्मित करत आहे. इच्छुक उमेदवार 30 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला 90,000 पर्यंत पगारही मिळेल.

ECGC PO Recruitment 2021

आपण पदवीधर असल्यास पीओच्या रिक्त पदांसाठी अर्ज करा

ECGC PO Recruitment 2021: ईसीजीसीने अनेक रिक्त पीओ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेचे पदवीधर या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

NITI Aayog Recruitment 2021 – नीती आयोगात नोकरीसाठी त्वरित अर्ज करा, बरेच फायदे मिळणार

NITI Aayog Recruitment 2021: नीती आयोग अनेक पदांवर नोकरभरती करत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार केवळ 24 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. खास गोष्ट म्हणजे आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अर्ज फी घेतली जात नाही आणि दिल्लीत आपल्याला सरकारी नोकरी सहज मिळेल. एवढेच नाही तर आपल्याला दरमहा 60,000 पर्यंत पगारही मिळेल. म्हणून लवकरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

NIHFW Recruitment 2021 – दिल्लीत सरकारी नोकरीसाठी मोठी संधी, आजच अर्ज करा

NIHFW Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेनं अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफसह इतर अनेक पदं आहेत. विशेष म्हणजे या नोकरीसाठी पदवीधारक ते आठवी पास अर्ज करू शकतात.

KVS Recruitment 2021 – KVS मध्ये परीक्षा न घेता मिळणार नोकरी, आजच अर्ज करा

KVS Recruitment 2021: केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) मधील उपायुक्तांच्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या नोकरीसाठी आपल्याला फक्त मुलाखत द्यावी लागेल आणि अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरायचे नाही. एवढेच नव्हे तर 2,09,200 रुपयांपर्यंतचे मासिक वेतनही निश्चित केले गेले आहे.

Government Job 2021 – DRDO: परीक्षा किंवा मुलाखत, गुणवत्ता यांनाही सरकारी नोकरी मिळणार नाही

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) प्रेंटीसच्या अनेक वेगवेगळ्या पदांवर भरती करणार आहे. 29 जानेवारी 2021 रोजी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सक्रिय होईल. विशेष म्हणजे या नोकरीसाठी आपली निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. कोणतीही अर्ज फी घेतली जाणार नाही.

सोर्स : TV9 मराठी27 Comments
 1. Kavita says

  Nhm sathi application kothe kryche

 2. वैशाली लांडे says

  हि जागा पुणेआहेका

 3. Dnyaneshwar karche says

  आठवीं पास सरकारी नौकरी कोनति आहे

 4. Pramod pawara says

  Website konti aahe

 5. Sidheshwar says

  कोणत्या website वर भरायच्या ह्या जागा

 6. Tejas kamble says

  I have all above job this

 7. Anuja shelke says

  Where is apply for all this job profile

 8. 7066045902 says

  आठवीं पास सरकारी नौकरी कोनति आहे

 9. Ramesh madhukar chaudhari says

  Ramesh madhukar chaudhari wabe site konati ahe mi baravi pass ahe sir.

 10. Tanjeela mansuri. says

  Hi nokari ahamadnagar giillt ahe ka. W ti konti ahe.

 11. Nirmala Natak says

  Sir yachi link and vebsite Kay aahe

 12. Sahil pawar says

  Website konti aahe grp var send kara

 13. Ganesh Prakash shelke says

  Covenant job

 14. Vishwas says

  I’m Entrested
  I’m vishwas pawar
  Job experience in State Bank of India
  Credit card Department in 3 year
  Please job chi garaj ahy Aata

 15. Namdev says

  Please send link for apply online all dept

 16. Sarkunde sonam says

  Website konti aahe

 17. Ashish panchal says

  Arj kutun kute kraycha

 18. Sagar baban kamble says

  Website konti aahe

 19. Ajay Balu khandekar says

  सैन्य भरती वयाची अट

 20. Aishwarya says

  सोलापूर जिल्हा आहे का

 21. Maithilee katkar says

  Ladies la pan ahe ky

 22. [email protected] says

  10th konti job aahe

 23. Akshay khandekar says

  Kvs recruitment pdf kuthe bhetley sir

 24. Aarti Ingle says

  Icmr company of pune ANM staff nurse vacancy in government job

 25. Komal says

  Anm sathi Aarj kothe karava

 26. Akash Anjankar says

  I deaf yes 10th pass job give me..Re…

 27. Kalyani says

  Niti ayoga job chi link pathva

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड