अग्निशामक विभाग भरतीचा मार्ग अखेर मोकळा

Fire Department BHarti 2020 Starting Soon

Fire Department BHarti 2020 Starting Soon – मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी भरतीवरील निर्बंध अखेर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उठवले आहेत. त्यामुळे दलातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तूर्तास ही भरती अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची होणार आहे. त्यात अग्निशमन जवानांना प्राधान्य दिले जाणार आहे. अग्निशमन जवानांची सर्वाधिक म्हणजे ६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ यंत्रचालकांची पदे भरण्यास प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

अग्निशमन दलात विविध प्रकारची एकूण ३,६९४ पदे आहेत. त्यापैकी सुमारे २,८०० पदे सध्या कार्यरत आहेत, तर ९००हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक रिक्त पदे ही अग्निशमन जवानांची आहेत. जवानांच्या २,३४० पदांपैकी ६०४ पदे रिक्त आहेत. १५९ चालक-यंत्रचालक, ६९ प्रमुख अग्निशामक, ६६ दुय्यम अधिकारी, १७ वरिष्ठ केंद्र अधिकारी, १० केंद्र अधिकारी इतकी पदे रिक्त आहेत. एकूण पदांपैकी सुमारे २५ टक्के पदे रिक्त आहेत. अग्निशमन जवान संवर्गातील पदे सरळसेवा भरतीने भरण्याचा प्रस्ताव दलाकडून प्रशासनाला सादर करण्यात आला होता. दरम्यान, करोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आयुक्तांनी ३० सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ही पदे नजीकच्या काळात भरण्याची शक्यता नव्हती. अग्निशमन जवान अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ही पदे भरण्यासाठी दलाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ही पदे भरण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीची माहिती दलाकडे माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यावर दलाने दिलेल्या उत्तरात अग्निशमन जवानाची ८२ पदे रिक्त असून कार्यरत ४७ व संभाव्य ३५ पदे पदोन्नतीने भरणार असल्याचे म्हटले आहे. यंत्रचालकांची ३२ पदे मार्च २०२० मध्ये भरण्यात आली आहेत. ५५ रिक्त पदे भरण्यासाठी संबंधितांकडून वाहन परवाना आणि प्रशिक्षण कार्यवाही केली जात आहे. याच दरम्यान त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दुय्यम अधिकारी संवर्गाच्या ६६ पदांचे प्रकरण २००८ पासून औद्योगिक न्यायालयात होते. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले. या प्रकरणात कामगार संघटनांचा समेट घडवण्यात आला असून या पदांच्या सुधारित अर्हता सादर करण्याकरिता प्रशासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात वरिष्ठ केंद्र अधिकाऱ्यांच्या चार पदांचाही समावेश आहे. तसेच केंद्र अधिकारी संवर्गाची सहा पदे भरण्याचा प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

आरक्षित पदे रिक्तच

अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत विविध संवर्गाची पदे असून त्यातील काही पदांसाठी आरक्षण असल्याने ८ जानेवारी २०१८ पासून फक्त खुल्या संवर्गातील पदे भरण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आरक्षित पदे रिक्त आहेत. तर, काही पदांसाठी विहित अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने रिक्त आहेत. कामगार संवर्गातील पदे प्रमुख कर्मचारी, अधिकारी विभागाकडून भरण्यात येतात. अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध होतात तशी ही पदे पदोन्नतीने भरण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Shubham japkar says

    Sir hi bhrti chi form kde pasun cahlu honar aahi

  2. Atish shivram bagul says

    फॉम भरण्या साठी लिक

  3. Atish shivram bagul says

    Aaplikeshan like

  4. Mayur Wankar says

    Only for 10th pass job updates

  5. Sandip shahji Hipparkar says

    I am ready

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड