डिप्लोमा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन आणि MCQ पद्धतीने परीक्षा
Exam Schedule of Diploma Exam
Exam Schedule of Diploma Exam : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) अखत्यारित येणाऱ्या इंजिनीअरिंग व फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा; तसेच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमातील नियमित, बॅकलॉग विद्यार्थ्यांची हिवाळी प्रात्यक्षिक परीक्षा, थिअरी परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानुसार डिप्लोमाच्या थिअरी परीक्षा २ ते २३ मार्च, प्रथम सत्र आणि थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा थिअरी परीक्षा २४ ते ३० मार्च, नॉन-एआयसीटीई अभ्यासक्रमांची थेअरी परीक्षा २ ते १२ मार्च दरम्यान होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे य%4ंनी संबंधित परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. अभ्य%E सक्रमांच्या थिअरी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. त्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार, हिवाळी परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी घ्यायच्या आहेत. परीक्षा विद्यार्थ्यांना वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणावरूनच देता येणार आहे. या परीक्षा सकाळी १० ते १२; तर दुपारी २ ते ४ या दोन संत्रामध्ये होणार असून, प्रत्येक सत्रात परीक्षेसाठी दोन तास वेळ देण्यात येईल. दोन परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० पैकी ३० प्रश्न सोडवावे लागतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ज्या विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्थास्तरावर घेण्यात यावी. यासाठी विविध मीटिंग अॅप्लिकेशनचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. अशा प्रकारे शक्य नसल्यास टेलिफोनिक पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा संस्थास्तरावर घेण्यात यावी. सर्व प्रयत्नानंतरही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांचे असाइनमेंट, जर्नल्स, निरंतर मूल्यमापन या आधारावर मूल्यमापन करून गुण द्यावेत. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांचीच राहणार असल्याचे डॉ. चितलांगे यांनी सांगितले आहे.
सोर्स : म. टा.
ITI चे आहेत का???