JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जिल्हा न्यायाधीश भरतीला मोठा दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; मुख्य परीक्षेचा मार्ग मोकळा | Maharashtra District Court Bharti 2026

District Court Recruitment 2026

जिल्हा न्यायाधीश भरती प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत भरती प्रक्रियेला कायदेशीर मान्यता दिली आहे. भरती प्रक्रियेला आणि २७ व २८ जून रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेला आव्हान देणारी रिट याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेल्या १,०१३ उमेदवारांची मुख्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार निर्विघ्नपणे पार पडणार आहे.

प्राथमिक परीक्षेत अपयशी ठरलेल्या आठ वकिलांनी भरती प्रक्रियेतील सुधारित नियमांना आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुधारित नियम पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केल्यामुळे भरती प्रक्रिया बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

मात्र, उच्च न्यायालय प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आलेल्या बाजूमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करतानाच घटनापीठाच्या आदेशानुसार मंजूर करण्यात आलेल्या नव्या नियमांनुसारच भरती प्रक्रिया राबविली जाईल, हे स्पष्ट करण्यात आले होते. उमेदवारांनी या अटी मान्य करून प्राथमिक परीक्षा दिल्यानंतर अपात्र ठरल्यानंतरच भरती प्रक्रियेला आव्हान दिले असल्याने त्यांचा दावा ग्राह्य धरता येणार नाही, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालय प्रशासनाचा युक्तिवाद मान्य करत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश भरती प्रक्रिया आणि मुख्य परीक्षेवरील अनिश्चितता दूर झाली असून, पात्र उमेदवारांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.


District Court Recruitment 2026

विविध कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्त पदांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, दंडाधिकारी आणि इतर न्यायिक अधिकाऱ्यांच्या ३००० हून अधिक मंजूर, रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी कोणती पावले उचलली आहे, याची ब्लूप्रिंट सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच विविध संवर्गात मंजूर झालेल्या एकूण पदांची संख्या, १ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त पदे आणि भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात सुरू केली जाईल, याचा खंडपीठाने सादर करण्याचे निर्देश दिले.

 


: : Previous Updates : : 

मुंबई उच्च न्यायालयाने (BHC) महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांच्या भरतीबाबत एक छोटी सूचना जारी केली आहे. सूचनेनुसार, स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल यांच्या रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला आमंत्रित करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत केंद्रीय भरती प्रक्रिया-2026 वर यथास्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्टेनोग्राफर (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल पदांसाठी निवड प्रक्रियेचा भाग असलेले सर्व उमेदवार मुंबई उच्च न्यायालय (BHC) – https://bombyhighcourt.nic च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली नोटिस PDF पाहू शकतात. आहेत

बॉम्बे हायकोर्ट भर्ती 2026  सूचना
उमेदवार जे स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल यांच्या निवड प्रक्रियेच्या वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्हा न्यायालयांमध्ये हजर झाले आहेत ते अधिकृत वेबसाइटवर सूचना पाहू शकतात.

लघुसूचनेत पुढे असे लिहिले आहे की, “सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 17.05.2024 च्या विशेष रजा अपील (C) क्रमांक (S) 11351/2024 मधील निर्देश लक्षात घेऊन, मुंबई उच्च न्यायालयाने विविध जिल्हा न्यायालयांमध्ये स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल यांची रिक्त पदे भरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय भरती प्रक्रिया-2026 मध्ये स्थिती कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बॉम्बे हायकोर्ट भर्ती 2026  विहंगावलोकन
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी वेगवेगळ्या पदांसाठी भरती मोहिमेसाठी तपशीलवार सूचना जारी केल्या होत्या. एकूण 4629 रिक्त पदांपैकी 2795 कनिष्ठ लिपिक पदांसाठी, 1266 शिपाई पदासाठी आणि उर्वरित 568 लघुलेखक पदांसाठी आहेत. या पदांसाठीच्या भरती मोहिमेची तपशीलवार माहिती खाली थोडक्यात दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुरू केलेल्या मोहिमेची सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते.

 

मुंबई उच्च न्यायालय 2026 ची नोटीस डाउनलोड करा

  • खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही नवीनतम अपडेट नोटिस PDF डाउनलोड करू शकता.
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://bombyhighcourt.nic.in/ .
  • मुखपृष्ठावरील सूचना – माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना लिंकवर क्लिक करा.
    तुम्हाला मुख्यपृष्ठावर नोटीस PDF मिळेल.
  • आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

 


Jilha Nyayalay Bharti 2026

नवीन नियमावली -महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट 2026) न्यायिक आणि प्रशासकीय सदस्यांची रिक्त पदे येत्या दोन महिन्यांत भरण्याचे आदेश केंद्र शासनाला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. मॅटमधील पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

न्यायिक आणि प्रशासकीय सदस्यांची रिक्त पदे येत्या दोन महिन्यांत भरवा 

मॅटमधील रिक्त पदांबाबत ॲड. राहुल शिरळकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी १४ मार्च रोजी मॅटमध्ये न्यायिक आणि प्रशासकीय सदस्यांच्या नेमणुकीबाबत शिफारस केली होती. ही शिफारस केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. मार्च महिन्यापासून राज्य शासनाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे मॅटच्या नागपूरसह इतर खंडपीठांतील कार्यावर परिणाम होत आहे. सुनावणीदरम्यान केंद्र शासनातर्फे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ॲड. नंदेश देशपांडे यांनी निर्णय घेण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची विनंती केली. हायकोर्टाने पदभरतीबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्राला आठ आठवड्यांचा अवधी दिला आहे. या कालावधीत केंद्राला घेतलेल्या निर्णयाबाबत हायकोर्टात माहिती सादर करायची आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या १० जुलै रोजी होणार आहे. याचिकाकर्ता ॲड. राहुल शिरळकर यांनी स्वतः बाजू मांडली. राज्य शासनातर्फे ॲड. दीपक ठाकरे तर केंद्रातर्फे ॲड. नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.

 District Court Bharti 2026 Overview

Recruitment OrganizationDistrict Court Bharti 2026
Post NameStenographer, Junior Clerk, Peon/ Hamal
Advt No.Bombay High Court Recruitment 2026
Vacancies4629 Vacancies
Salary/ Pay ScaleVaries Post Wise
Job LocationAll Districts of Maharashtra
Last Date to Apply
Mode of ApplyOnline Application Forms
CategoryBombay High Court Vacancy 2026
Official Websitebombay high court. nic.in

 

Application Fees For District Court Bharti 2026

CategoryFees
GenRs. 1000/-
SC/ ST/ OBC/ SBCRs. 900/-
Mode of PaymentOnline

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 District Wise PDF Advertisement Link

 

Zilla Court Recruitment Salary Criteria:

  • Stenographer (Grade-3) – Rs.38,600/- to Rs.1,22,800/- per month.
  • Junior Clerk – Rs.19,900/- to Rs.63,200/- per month.
  • Peon/Hamal – Rs. 15,000 to Rs. 47,600

District Court Vacancy Details 2026

Online Applications are invited from the eligible candidates who fulfill eligibility criteria as of the date of publication of this advertisement, for preparing Select Lists and Wait Lists of the candidates as follow:

Name of the PostSelect ListWait List
Junior Clerk2795700
Peon/Hamal1266318
Stenographer (Grade-3)1266146

District Court Eligibility Criteria 2026

Junior Clerk:

  • Degree and possess adequate knowledge of the regional language of the Court in the District.
  • Must have passed Government Commercial Certificate Examination or examination conducted by Government Board or Government Certificate in Computer Typing Basic Course (GCC-TBC or I.T.I.) for speed of 40 w.p.m. or above in English Typing and 30 w.p.m. or above in Marathi
  • Possesses computer Certificate for proficiency in the operation of word processors in Windows and Linux in addition to M.S. Office, M.S. Word, Wordstar-7 and Open Office Org.

Peon:

  • Must be 7th class passed and having good physique.

Stenographer (Grade-3)

  • Graduation and knowledge of the regional language of the Court in the District
  • Qualify for the Government Commercial Certificate Examination or examination conducted by
    Government Board or Government Certificate in Computer Typing Basic Course (GCCTBC or I.T.I.) for a speed of 100 w.p.m. or above in English Shorthand and 80 w.p.m. or above in Marathi Shorthand and 40 w.p.m. or above in English Typing and 30 w.p.m. or above in Marathi Typing.
  • Possesses computer Certificate for proficiency in the operation of word processors in Windows and Linux in addition to M.S. Office, M.S. Word, Wordstar-7 and Open Office.

Age Limit:

18 to 38 years

How to Apply for Zilla Nyayalaya Recruitment 2026?

Follow these steps to apply for the District Court Recruitment 2026

  • Step-1: Check the eligibility from the Bombay High Court Notification 2026
  • Step-2: Click on the Apply Online Link given below or visit the website bombayhighcourt.nic.in
  • Step-3: Fill out the application form
  • Step-4: Upload the required documents
  • Step-5: Pay Fees
  • Step-6: Print the Application Form

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड