CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी होणार, वेळापत्रक जाहीर.. | CTET Exam 2026

CTET Exam 2026

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईकडून घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी परीक्षेच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, यंदाच्या वर्षात १२ आणि १३ डिसेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राची माहिती दोन दिवस आधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याद्वारे परिपत्रका द्वारे सूचित करण्यात येते की, ‘सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट’ (CTET) ची २२ वी आवृत्ती १२ आणि १३ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल. प्रत्येक उमेदवाराला नेमून दिलेल्या परीक्षा शहराबाबतची आणि परीक्षेच्या तारखेबाबतची माहिती परीक्षेच्या १५ दिवस आधी CTET पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षा केंद्राचा तपशील असलेले प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षेच्या दोन दिवस आधी CTET पोर्टलवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.

प्रत्येक उमेदवाराला कोणत्या शहरात आणि कोणत्या दिवशी परीक्षा द्यावी लागणार आहे, याची माहिती परीक्षेच्या १५ दिवस आधी सीटीईटीच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांना ही माहिती पोर्टलवर जाऊन तपासता येईल. दरम्यान, परीक्षेचे नेमके केंद्र कोणते असेल, याची माहिती असलेले प्रवेशपत्र परीक्षेच्या दोन दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासून त्यानुसार परीक्षेचे नियोजन करावे, असे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले आहे.

CTET Exam 2026


सीटीईटी परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईकडून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे (सीटीईटी) वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा ही परीक्षा दि. ६ सप्टेंबरला (रविवारी) आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेत दोन पेपर (पेपर १ आणि पेपर २) असतात. परीक्षेसाठी ११ मेपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना १० जूनपर्यंत अंतिम मुदत दिल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज वाढले, तर ५ सप्टेंबरला (शनिवारी) ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा
२७ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. तसेच, देशभरातल्या १३२ शहरांत ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवारांना अर्ज पोर्टलमध्ये परीक्षेचे शहर निवडण्याची कोणतीही तरतूद नाही. अर्जदारांना परीक्षेचे शहर सीबीएसईद्वारे यादृच्छिक पद्धतीने वाटप केले जाईल. परीक्षेचे शहर बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही, अशी माहिती ‘सीबीएसई’ने दिली आहे. तसेच, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सीटीईटीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. अधिक माहितीसाठी उमेदवारांना https:///ctet.nic.in आणि https:///www.cbse.gov.in या संकेतस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले आहे.

या आहेत महत्त्वाच्या तारखा:
‘सीटीईटी’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : ११ मे २०२६
‘सीटीईटी’ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२६
अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख: १० जून २०२६
अर्जात दुरुस्ती करण्याची मुदत १५ जून ते १८ जून २०२६
प्रवेशपत्र : परीक्षेच्या दोन दिवस अगोदर
परीक्षेची तारीख : ६ सप्टेंबर २०२६
निकालाची तारीख ऑक्टोबर २०२६ (अंदाजित)

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड