CTET 2021 परीक्षेची तारीख, अॅडमिट कार्ड कधी?

CTET Exam Update

CBSE CTET 2021 Exam

CTET Exam Update : Updates on CBSE CTET 2021 exam are expected to be released soon. According to media reports, the CBSE board is expected to announce the dates of CTET 2021 by the end of June. Further details are as follows:-

CTET 2021 परीक्षेची तारीख, अॅडमिट कार्ड कधी? गेल्या काही वर्षांप्रमाणे, यावर्षी देखील सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. उमेदवार परीक्षा पोर्टल, ctet.nic.in वर उपलब्ध केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. परीक्षेची तारीख, अॅडमिट कार्ड कधी? जाणून घ्या…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बोर्ड सीटीईटी 2021 च्या तारखांची घोषणा जून महिन्याच्या अखेरीस करण्याची शक्यता आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या तारखा बोर्ड जाहीर करण्याची शक्यता कमी आहे, मात्र अॅडमिट कार्ड आणि अन्य माहिती जारी केली जाण्याची शक्यता आहे.

CTET 2021 Eligibility

सीटीईटी परीक्षेच्या आधी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पदवी आणि बीएड किंवा अन्य मान्यताप्राप्त पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतील. विविध स्तरांवरील अध्यापनानुसार सीटीईटीचे पेपर नियोजित असतात, त्यामुळे पात्रताही वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी उमेदवार सीटीईटी परीक्षा पोर्टल, ctet.nic.in ला भेट देऊ शकतात.

How to Apply For CTET 2021 

  • उमेदवार परीक्षा पोर्टल, ctet.nic.in वर उपलब्ध केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि यानंतर उमेदवार लॉगइन करून CTET 2021 अॅप्लिकेशन सबमिट करू शकणार आहेत.

CTET January 2021 Result

CTET Exam Update : ctet january 2021 result declared at ctet nic in – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. CBSE CTET 2021 निकाल सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते ctet.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपला वैयक्तिक निकाल पाहू शकतील. निकाल डाऊनलोडही करता येईल. या वृत्तात निकाल पाहण्याची आणि डाऊनलोड करण्याची थेट लिंकही देण्यात आली आहे.

ही परीक्षा रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. एकूण ४ लाख १४ हजार ७९८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. यापैकी २ लाख ३९ हजार ५०१ उमेदवार पेपर १ मध्ये यशस्वी झाले आहेत.

CTET January 2021 Result कसा डाऊनलोड कराल?

उमेदवारांना पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप CTET January 2021 Result पाहता आणि डाऊनलोड करता येईल –

  • १) निकालाचे अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वर जा.
  • २) होमपेजवरील ‘CTET January 2021 Result’ या पर्यायावर क्लिक करा.
  • ३) आता नवे वेब पेज उघडेल.
  • ४) येथे तुमचा रोल नंबर भरून सबमीट बटण क्लिक करा.
  • ५) आता निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • ६) भविष्यातील संदर्भासाठी याची एक प्रत घेऊन ठेवा.

CTET January 2021 पात्रता प्रमाणपत्र

ज्या उमेदवारांनी CTET January 2021 परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकरमध्ये उपलब्ध असतील. पात्र उमेदवार डिजीलॉकरमधून आपले प्रमाणपत्र आपल्या लॉगइन डिटेल्सच्या सहाय्याने घेऊ शकतील.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3strpMn


CTET Exam Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) मध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांना परीक्षेचे शहर निवडण्याचा गुरुवार २६ नोव्हेंबर २०२० हा शेवटचा दिवस आहे. अलीकडेच, १६ नोव्हेंबर २०२० रोजी बोर्डाने उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रात बदल करण्यासाठी अर्ज विंडो १७ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत उघडण्याची घोषणा केली होती. ज्या उमेदवारांनी सीटीईटी २०२० मध्ये नोंदणी करतांना निवडलेले परीक्षा शहर बदलण्याची इच्छा आहे, परंतु अद्याप सीटीईटी २०२० परीक्षेचे शहर बदललेले नाही, ते परीक्षेचे पोर्टल ctet.nic.in वर भेट देऊन त्यांचे परीक्षा केंद्र शहर बदलू शकतात.

सीटीईटी 2020 परीक्षेचे शहर पुढीलप्रमाणे बदलता येईल –

उमेदवारांनी अर्ज केलेल्या परीक्षेच्या शहरातील परीक्षेच्या पोर्टलला भेट दिल्यानंतर मुख्य पृष्ठावरील ‘Exam City Correction’ या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर नव्या पानावर उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिलेली सुरक्षा पिन भरून साइन इन करावे लागेल. यानंतर, उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध केलेल्या परीक्षा शहर बदलाशी संबंधित पर्यायाद्वारे परीक्षा शहर बदलता येईल.

उमेदवारांनी मागणी केली

परीक्षार्थींनी केलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर CTET 2020 साठी परीक्षा केंद्रात बदल करू देण्याची संधी सीबीएसई उपलब्ध करून दिली आहे. बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कोविड -१९ साथीच्या आजारामुळे शहरापासून दूर असल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षा केंद्रात बदल करू देण्याची मागणी केली होती.

सीटीईटी २०२० च्या परीक्षेच्या वेळी सामाजिक अंतर व इतर सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी ही परीक्षा देशभरातील एकूण १३५ शहरांमध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सीटीईटी २०२० परीक्षा ५ जुलै २०२० रोजी घेण्यात येणार होती, परंतु मंडळाच्या परिपत्रकानुसार, प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन आता ३१ जानेवारी २०२१ रोजी ही परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले.


CTET Exam Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी 2020) साठी परीक्षा शहर बदलण्यासाठी शेवटची तारीख वाढविली आहे. या संदर्भात, अधिकृत वेबसाइट, ctet.nic.in वर एक अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार आता 17 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत परीक्षेचे शहर बदलू शकतात, असे अधिसूचनेत म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेतील उमेदवारांच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीटीईटीसाठी परीक्षा केंद्र बदलण्यासाठीची विंडो पुन्हा उघडण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना परीक्षा केंद्र खूप दूर सापडले असेल किंवा दुसऱ्या शहरात सोयीनुसार ते केंद्र निवडायचे असतील तर ते 26 नोव्हेंबरपर्यंत आपला पर्याय बदलू शकतात. पूर्वी परीक्षा शहर बदलण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर होती.

या स्टेप्सद्वारे परीक्षेचे केंद्र बदलू शकतात

उमेदवार, प्रथम अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा, ctet.nic.in. मुख्यपृष्ठावरील परीक्षा शहर दुरुस्ती दुव्यावर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक, संकेतशब्द आणि सुरक्षितता पिन प्रविष्ट करुन लॉगिन करा. आपला सीटीईटी 2020 अर्ज आता स्क्रीनवर दिसून येईल. उमेदवार आता त्यांचे परीक्षा शहर निवडू शकतात.

सीटीईटी ५ जुलै, २०२० रोजी घेण्यात येणार होती . पण, आता ही परीक्षा ३१ जानेवारी, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. सीटीईटी परीक्षेसाठी यापूर्वी देशभरात ११२ केंद्रे स्थापन केली गेली होती. तथापि, आता ही संख्या 135 करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत परीक्षेच्या वेळी उमेदवार आणि इतर सुरक्षा मानदंडांमधील सामाजिक अंतर सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे. सीबीएसईने तयार केलेल्या परीक्षा शहरांची यादी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

नोटिफिकेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा  – https://bit.ly/3kM8JTI


CTET Exam Update : CTET Exam 2020 Date Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) परीक्षा पुढील वर्षी ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ५ जुलै २०२० रोजी होणार होती. यासाठी देशभरातील ११२ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार होणार होते. पण करोना आणि अन्य काही कारणांमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता सीबीएसई बोर्डाने

सीटीईटी परीक्षेच्या तारखांसंदर्भात नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. ही परीक्षा आता रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. यावेळ १३५ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले होते. नव्या परीक्षा केंद्रांची संपूर्ण यादी सीटीईटीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

बदलता येणार परीक्षा केंद्राचं शहर

सीबीएसईने उमेदवारांनी परीक्षा केंद्रात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या परीक्षा केंद्राच्या शहरात बदल करायचा असेल त्यांना ७ नोव्हेंबर पासून हा बदल करता येईल. ७ ते १६ नोव्हेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात बदल करता येणार आहे.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड