आता आपल्याला ‘कास्ट व्हॅलिडिटी’ बंधनकारक !
Cast Validity is mandatory for vocational courses
Cast Validity is mandatory for vocational courses : व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात सीईटी स्पर्धा परीक्षेतून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे परिपूर्ण ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मागास विद्यार्थ्यांना ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी अर्ज करताना सीईटी स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरल्याचा पुरावा कागदपत्रांसोबत जोडावा लागणार आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना १० ऑगस्ट १९५० पूर्वीचे, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१ आणि इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे जात आणि स्थायी निवासाचे पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी खोटे पुरावे जोडू नये, तसेच कागदपत्रांवर खाडाखोड करू नये, समितीपासून कोणतीही माहिती दडवू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे समितीने कळवले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या अभ्यासक्रमास लागेल ‘कास्ट व्हॅलिडिटी’
, औषधीनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापन शास्त्र, कला शिक्षण, वैद्यकीय, शिक्षणशास्त्र, विधि अभ्यासक्रम, मत्स्यकी, शारीरिक शिक्षण, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, फिजिओथेरेपी.
मागास विद्यार्थी व्यावसायिक अभ्याक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी लागणारी कागदपत्रे वेळेच्या आत सादर करावे लागेल. बरेचदा विलंबाने प्रकरणे सादर होतात आणि प्रमाणपत्र मिळत नाही. असे होऊ नये, यासाठी ऑनलाईन अर्ज सादरीकरणासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.
-सुनील वारे, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती.
सोर्स : लोकमत