आता दहावीनंतरच होता येणार आयुर्वेद डॉक्टर – BAMS After SSC Pass

BAMS After SSC Pass

आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याचा मार्ग आता सुकर झाला असून आता १० वी नंतर आपण  BAMS (BAMS After SSC Pass) डॉक्टर बनू शकता येणार आहे.  कर्नाटकात वैद्यकीय शिक्षणाकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) एमबीबीएसचीजागा मिळाली नाही, तर आयुर्वेद किंवा इतर भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीच्या अभ्यासाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आता वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता सरकारने गोड बातमी दिली आहे. दहावीनंतर आयुर्वेद डॉक्टर होण्याची संधी मिळणार आहे. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असणार आहे.

BAMS After SSC Pass

भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने दहावीनंतर थेट पदवी प्रवेशाची संधी दिली आहे. याबाबत गतवर्षी नियम तयार करून त्याबाबत आक्षेप मागवले होते. त्यावर दाखल केलेल्या आक्षेप, सल्ला, सूचनांचा विचार करुन नियमांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘प्री-आयुर्वेद प्रोग्रॅम फॉर आयुर्वेद मेडिसीन अँड सर्जरी रेग्युलेशन्स २०२४’ असे या नियमावलीचे नामकरण करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. साडेसात वर्षे अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांना पदवी मिळेल. पहिली दोन वर्षे प्री आयुर्वेद प्रोग्रॅम (पीएपी) असेल.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

साडेचार वर्षे बीएएमएस पदवी अभ्यासक्रम असणार आहे. त्यानंतर एका वर्षासाठी सक्तीचे इटर्नशीप असेल. ७५ टक्के हजेरीची सक्ती परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात ७५ टक्के हजेरीची सक्यी असणार आहे. प्रायोगिक हजेरीसाठीही हाच नियम असेल. दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुणांची सक्ती असणार आहे. भारतीय वैद्य पद्धत अंतर्गत आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपथी पदवी अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ प्रवेश घ्यावा लागतो. आयुर्वेदपूर्व अभ्यासक्रमासाठी नीट-पीएपी द्यावी लागते. याकरिता ठरावीक गुणांची अट लागू करण्यात आली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड