‘ड्रग्ज ‘विरोधी कृतिदलासाठी ३४६ नवीन पदांची नवीन भरती लवकरच!- ANTF Maharashtra Recruitment
ANTF Maharashtra Recruitment
अँटीनार्कोटिक्स टास्कफोर्स (ANTF Bharti Recruitment) राज्यात स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यात बंद कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण प्रक्रियेला गतीही देण्यात आली आहे. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे 346 पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी 310 पदे नियमित असतील तर 36 पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.
तसेच पुणे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ललित पाटील प्रकरणात ४ पोलिस बडतर्फ करण्यात आले आहे आहेत. ललित पाटीलला प्रथम अटक झाली, तेव्हा त्याची पोलिस कोठडीच घेतली नाही. त्यामुळे कृष्णप्रकाश यांनी एप्रिल २०२१ मध्ये हायकोर्टात जाण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली, पण तत्कालिन राज्य सरकारने ती दिलीच नाही. ललित हा उबाठा गटाचा शिवसेनाप्रमुख होता. पण मी याला कधीच राजकीय रंग दिला नाही, कारण अशा प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- विशेष पोलीस महानिरीक्षक- एक,
- पोलीस उपमहानिरीक्षक एक,
- पोलीस अधीक्षक-तीन,
- अपर पोलीस अधीक्षक-तीन,
- पोलीस अधीक्षक- 10,
- पोलीस निरीक्षक 15,
- सहाय्यक पोलीस निरीक्षक – 15,
- पोलीस उपनिरीक्षक – 20,
- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – 35,
- पोलीस हवालदार – 48,
- पोलीस शिपाई – 83,
- चालक पोलीस हवालदार -18,
- चालक पोलीस शिपाई – 32,
- कार्यालय अधीक्षक – एक,
- प्रमुख लिपीक – दोन,
- वरिष्ठ श्रेणी लिपीक -11,
- कनिष्ठ श्रेणी लिपीक – सात,
- उच्च श्रेणी लघुलेखक – दोन,
- निम्न श्रेणी लघुलेखक – तीन.
बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे ( पदनाम आणि संख्या या क्रमाने)
- वैज्ञानिक सहाय्यक-तीन,
- विधी अधिकारी – तीन,
- कार्यालयीन शिपाई -18,
- सफाईगार – 12
- एकूण – 36.