अग्निपथच्या भरती नियमांमध्ये मोठा बदल- आता ITI, डिप्लोमा धारकांना संधी! Agneepath Scheme 2023
Agneepath Scheme Yojana 2023
Agneepath Scheme Yojana 2023
केंद्रातील एनडीए सरकारनं गेल्या तीन वर्षात लष्करातील जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. सरकारनं आता अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. याअंतर्गत ITI-पॉलिटेक्निक उत्तीर्ण देखील अर्ज दाखल करू शकणार आहेत.
लष्करानं अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पात्रता निकष वाढवण्यात आले आहेत. प्री स्किल्ड युवा देकील अग्निपथ भरतीत सहभाग घेऊ शकतात. आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण टेक्निकल ब्रांचमध्ये भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात. यातून प्री-स्किल्ड युवांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. इतकंच नाही तर यामुळे ट्रेनिंगसाठीचा कालावधी देखील कमी होणार आहे. या मोठ्या बदलानंतर आता आणखी जास्त युवा उमेदवारांना योजनेत सामील होता येणार आहे.
१६ फेब्रुवारीपासून अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्करात अग्नीवीरांच्या भरतीसाठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. अग्निपथ भरती वर्ष २०२३-२४ साठी अविवाहित पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in येथे भेट देऊ शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीची १५ मार्च २०२३ ही अंतिम मुदत आहे. तर निवड परीक्षा १७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नोटिफिकेशननुसार अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर किपर, ट्रेड्समॅनच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अग्नीवीर निवड प्रक्रियेत नुकतंच बदल करण्यात आले होते. यानुसार उमेदवारांना सर्वात आधी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना फिजिकल टेस्ट साठी निमंत्रित केलं जाईल.
अर्जासाठीची पात्रता काय?
१६ फेब्रुवारीला जारी नोटिफिकेशननुसार अग्नीवीर (जनरल ड्युटी) पदासाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर अग्नीवीर (टेक्निकल) यासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्नीवीर क्लर्क (स्टोअर कीपर) पदासाठी कमीतकमी ६० टक्क्यांनी १२ उत्तीर्ण उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. अग्नीवीर ट्रेड्समनपदासाठी ८ वी आणि १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात. आता नव्या बदलानुसार आयआयटी-पॉलिटेक्निक उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.
Agneepath Scheme Yojana 2023 – The first batch of Agniveers have started training at the Artillery Centre in Hyderabad. A large number of candidates applied to become Agniveer. Out of it 2265 selected candidates are now undergoing training at Golconda Training Center in Hyderabad. The Agniveers will undergo physical and other kinds of training for 31 weeks. All these soldiers who join the army for various tasks as firefighters will be given training by the army. In the initial 10 weeks, they will be identified for their strength areas, post that there will be a focussed 10-week training for them. Read the complete details given below and keep visiting MahaBharti.in
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीने हैदराबाद येथील तोफखाना केंद्रात प्रशिक्षण सुरू केले आहे. अग्निवीर होण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी 2265 निवडक उमेदवार आता हैदराबाद येथील गोलकोंडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. अग्निवीरांना ३१ आठवडे शारीरिक आणि इतर प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल. अग्निशामक म्हणून विविध कामांसाठी सैन्यात भरती होणाऱ्या या सर्व सैनिकांना लष्कराकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुरुवातीच्या 10 आठवड्यांमध्ये, त्यांना त्यांच्या ताकदीच्या क्षेत्रासाठी ओळखले जाईल, त्यानंतर त्यांच्यासाठी 10-आठवड्यांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाईल. खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि MahaBharti.in ला भेट देत रहा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Agniveers First Batch Training Program in Hyderabad
अग्निवीर सैन्य भरती.. २२६५ जणांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण हैदराबादेत सुरु..
- अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर देशभरातील तरुणांनी याला विरोध दर्शवला होता. असे असतानाही मोठ्या संख्येने तरुणांनी अग्निवीर होण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी निवड झालेल्या २२६५ जणांना आता हैदराबादमधील प्रशिक्षण गोलकोंडा केंद्रात प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- हैदराबाद, गोलकोंडा (तेलंगणा): सैनिकांच्या प्रशिक्षणात एक अभिनव अध्याय सुरू झाला आहे. केंद्र सरकारच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेचा भाग म्हणून निवडलेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण हैदराबाद येथील गोलकोंडा येथे असलेल्या तोफखाना केंद्रात सुरू झाले आहे. येथे तरुणांना देशाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात येत आहे. सामान्य तरुणांना ‘पोलादी पुरुष’ बनवण्यात येणार आहे.
- अग्निवीर’ची तुकडी विविध पदांवर प्रशिक्षणासाठी भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक, स्टोअरकीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन म्हणून प्रशिक्षणासाठी भारतीय सैन्यात सामील झाली आहे. अग्निवीर म्हणून सैन्यात विविध कामांसाठी दाखल होणाऱ्या या सर्व सैनिकांना लष्कराकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- ३३०० जणांची दुसरी तुकडी: यावेळी आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर राजीव चौहान म्हणाले, ‘पहिल्या बॅचमध्ये २,२६५ अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. आम्ही पद्धतशीर आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम तयार केले आहेत. पहिल्या 10 आठवड्यांमध्ये शारीरिक व्यायाम, कवायती, मूलभूत शस्त्रे प्रशिक्षण आणि नंतर प्रगत लष्करी प्रशिक्षण यांचा समावेश आहे. मार्चमध्ये याच केंद्रात आणखी 3300 लोकांसाठी प्रशिक्षणाची दुसरी तुकडी सुरू होईल.
- अग्निवीरांसाठी हे देशातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या युनिटमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ काम करावे लागते. लष्करी भरतीतील रिक्त पदांवर अवलंबून, कौशल्य दाखविणाऱ्यांपैकी २५ टक्के जणांची सैन्यात भरती करण्यात येणार आहे. पूर्वी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाप्रमाणे आता आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. आम्ही त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून देत आहोत. आम्ही त्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी करत आहोत. याशिवाय आम्ही खेळ आणि शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत.
- यावर्षी लष्करात ४० हजार अग्निवीर जवानांची भरती होणार असून, त्यापैकी बहुतांश जवानांना हैदराबादमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या बॅचचे प्रशिक्षण 2 जानेवारीपासून सुरू झाले असून ते 8 महिने चालणार आहे. या पार्श्वभूमीवर अग्निवीरांच्या प्रशिक्षण पद्धती आणि केंद्रातील प्रशिक्षण सुविधा सोमवारी प्रसारमाध्यमांना दाखविण्यात आल्या. विशेष म्हणजे देशाच्या विविध भागांतून तसेच तेलुगू राज्यांतून निवडले गेलेले या तुकडीचे बहुतेक अग्निवीर हे शेतकरी कुटुंबातील आहेत.
Agneepath Scheme 2022, Latest Information
Agneepath Scheme Yojana 2022: The latest update for Agneepath Scheme 2022, As per the latest news, The Delhi High Court has refused to stay the Agneepath scheme. For more details visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) आव्हान देणाऱ्या प्रकरणावर आज, गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास नकार दिलाय.
- 14 जून रोजी केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणली, त्याअंतर्गत 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची सैन्य दलात चार वर्षांसाठी भरती करण्याची तरतूद करण्यात आली होती.
- या योजनेअंतर्गत भरती झालेल्या युवकांपैकी 25 टक्के तरुणांना चार वर्षांनंतर लष्करात (Army) कायमस्वरूपी नोकरी देण्यास सांगण्यात आले.
- मात्र, यानंतर तरुणांमध्ये या योजनेबाबत संताप व्यक्त होत होता.
- सरकारने या योजनेसाठी कमाल वयोमर्यादा वाढवून 23 वर्षे केली होती.
- या याचिकेविरोधात देशातील विविध उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या.
- लष्कराच्या भरतीसाठी केंद्राच्या नव्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) संबंधित मंत्रालयांमार्फत केंद्राकडे उत्तर मागितले.
- अग्निपथ योजना केंद्र सरकारने 14 जून रोजी सुरू केली होती.
- याअंतर्गत चार वर्षे लष्करात तरुणांची भरती करण्याची तरतूद करण्यात आली होती.
प्रलंबित असलेल्या याचिका दिल्ली हायकोर्टात ट्रान्सफर
- गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, सशस्त्र दलात भरतीसाठी केंद्राने आणलेल्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
- अग्निपथ विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका दिल्ली हायकोर्टात वर्ग केल्या.
- सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला सांगितलं होतं की, सुप्रीम कोर्टाने आपल्यासमोर प्रलंबित असलेल्या याचिका दिल्ली हायकोर्टात ट्रान्सफर केल्या आहेत.
योजनेविरोधात केरळ, पंजाब आणि हरियाणा, पाटणा, उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका
अग्निपथ योजनेविरोधात केरळ, पंजाब आणि हरियाणा, पाटणा आणि उत्तराखंड या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने या सर्व उच्च न्यायालयांना सांगितले होते की, त्यांच्यासमोर दाखल याचिका एकतर दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग कराव्यात किंवा स्थगित ठेवाव्यात. जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत हे केले पाहिजे. त्यावर गेल्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने हस्तांतरित केलेल्या खटल्यांची फाइल अद्याप पोहोचलेली नाही, असे म्हटले होते.
गृहमंत्र्यांची घोषणा – अग्निवीरांना पोलीस भरतीत संधी देणार!! Agneepath Scheme 2022
Agneepath Scheme Yojana 2022: Good News!! There is a big decision about Agneepath Scheme 2022. Under Agneepath Yojana, the candidates who complete their service will be inducted into the state police force. For more details about Agneepath Scheme 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
देशात केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेला जोरदार विरोध केला जात असताना कर्नाटक सरकार अग्नीपथ भरती योजने बाबत मोठा निर्णय घेतला आहे. अग्नीपथ योजनेअंतर्गत जे उमेदवार त्यांची सेवा पूर्ण करतील त्या अग्नविरांना राज्य पोलिस दलात सामील करण्यात येणार आहे. कर्नाटकचे गृहमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच या योजनेला विरोध करण्यासाठी होत असलेल्या निदर्शनांचा मी निषेध करतो असेही कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले आहे.
Details regarding this scheme are given below –
Conducting Body | Indian Army |
Name of scheme | Agneepath Recruitment 2022 |
Launched by | Department of Military Affairs |
Number of Vacancies | Around 1.25 Lakh |
Date of Final notification | yet to be updated |
Agneepath Recruitment Online Form Date | June/july, 2022 |
Area of Service | Indian Army, Navy, Air Force |
Time span | 4 years |
age limit | 17.5-21 years |
official link | Joinindianarmy.nic.in |
Eligibility Criteria For Agneepath Scheme
Category | Education | Age |
Soldier General Duty | SSLC/Matric with 45% marks in aggregate.No% required if higher qualification. | 17.5 – 21 Years |
Soldier Technical | 10+2/Intermediate exam passed in Science with Physics, Chemistry, Maths and English. Now eight age for higher qualification. | 17.5 – 21 Years |
SoldierClerk / StoreKeeper Technical | 10+2/Intermediate exam passed in any stream(Arts, Commerce, Science)with 50% marks in aggregate and min 40% in each subject. Weight age for higher qualification. | 17.5 – 21 Years |
Soldier Nursing Assistant | 10+2/Intermediate exam passed in Science with Physics, Chemistry, Biology and English with min 50% mark sin aggregate and min40% in each subject. Now eight age for higher qualification. | 17.5 – 21 Years |
Soldier Trades man | 17.5 – 21 Years | |
(i)GeneralDuties | Non Matric | 17.5 – 21 Years |
(ii)SpecifiedDuties | Non Matric | 17.5 – 21 Years |
Pay Scale Under Agneepath Scheme
Agneepath Scheme 2022
Agneepath Scheme Yojana 2022 : There are a total of 1,25,000 Agniveer recruits in the next few years. The first phase of the online exam starts on the 24th of July 2022. The first batch will be registered by December and the training will begin by December 30. Further details are as follows:-
महत्त्वाचे – येत्या काही वर्षांमध्ये सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा (Agnipath scheme) मुद्दा चांगलाच तापतो आहे. त्यात आता देशभरात याच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. त्यात सरकारतर्फे तरुणांच्या समस्या सोडवण्याचं काम सुरू आहे. अग्निपथ योजनेबाबत लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी पत्रकार परिषद (Indian Army Press conference on Agnipath) घेऊन आढावा बैठकीची माहिती दिली.
महत्त्वाचे – अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकांसाठी अग्निवीर उद्योजकता योजना!!
अग्निपथ योजनेंतर्गत ठाणे मध्ये अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन!!
अग्निपथ योजनेंतर्गत औरंगाबाद मध्ये 7 जिल्ह्यांकरिता आर्मी भरती रॅलीचे आयोजन!!
अग्निपथ योजनेंतर्गत अहमदनगर मध्ये अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन!!
आनंदाची बातमी!! भारतीय लष्कर अग्निवीर भरती ऑनलाईन अर्ज सुरु!! त्वरा करा
खुशखबर!! भारतीय नौदल अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
IAF अग्निवीर भरतीचे वेळापत्र जाहीर!! जाणून घ्या नोंदणीची व भरतीची तारीख
खुशखबर!! ‘अग्निपथ योजने’अंतर्गत महिलांनाही संधी, नौदलात होणार भरती!!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Agneepath Scheme
- अग्निपथ योजनेद्वारे आम्हाला देशाच्या तिन्ही सैन्यात तरुणाई आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आणायचा आहे.
- आज मोठ्या संख्येने जवान 30 च्या पुढे आहेत आणि अधिकाऱ्यांना पूर्वीपेक्षा खूप उशीरा कमांड मिळत आहे. लष्कराचे वय कमी करणे हे आमचे प्राधान्य आहे.
- भारताच्या तिन्ही सैन्यात संवेदना आणि उत्साह यांचा चांगला मिलाफ असावा, अशी आमची इच्छा आहे.
- अग्निवीरांना’ सियाचीन आणि इतर भागात तैनाती करताना तोच भत्ता मिळेल जो सध्या सेवा बजावत असलेल्या नियमित सैनिकांना लागू आहे.
- सेवेच्या बाबतीत अग्निवीरांसाठी कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
- पुढील 4-5 वर्षांत आम्ही (सैनिक) 50-60,000 भरती करू आणि नंतर ते 90,000 ते 100000 पर्यंत वाढवू असंही त्यांनी म्हंटल आहे.
Agneepath Scheme – Agniveer Apply Online
24 जूनपासून सुरू होईल ऑनलाइन प्रोसेस
- भारतीय हवाई दलाचे अधिकारी एअर मार्शल एसके झा म्हणाले, अग्निवीर बॅच क्रमांक 1 नोंदणी प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल आणि पहिला टप्पा ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू होईल.
- पहिल्या बॅचची डिसेंबरपर्यंत नोंदणी केली जाईल आणि 30 डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू होईल.
- अग्निपथ योजनेबद्दल, भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, या वर्षी 21 नोव्हेंबरपासून पहिले नौदल ‘अग्नीवीर’ प्रशिक्षण प्रतिष्ठान आयएनएस चिल्का, ओडिशा येथे पोहोचण्यास सुरुवात होईल.
Agneepath Yojana Recruitment 2022
सव्वा लाख भरती होणार
योजनेचे विश्लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही पहिल्या वर्षी 46,000 भरती करून छोटी सुरुवात केली आहे. नजीकच्या भविष्यात आमचा ‘अग्नीवीर’ संख्या 1.25 लाखांपर्यंत पोहोचेल. देशसेवेत बलिदान देणाऱ्या अग्निवीरला एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे.
योजना मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही
भारतीय सशस्त्र दलाच्या या योजनेची नितांत गरज आहे, त्यामुळे ती मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात, तिन्ही सेवांमध्ये अधिका-यांच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या सर्व भरती केवळ ‘अग्निपथ योजने’द्वारेच केल्या जातील.
Agneepath Scheme 2022 Apply Online
Agneepath प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती, गृह विभागाची मोठी घोषणा !
Agneepath Scheme Yojana 2022 – Agneepath प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती, गृह विभागाची मोठी घोषणा – केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशातील विविध भागांमधून तीव्र विरोध होतोय. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून या योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट देण्यात आली आहे. यानुसार सीएपीएफ आणि आसाम रायफल्स सारख्या दलात चार वर्षे पूर्ण केल्यानंतर अग्निपथ योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना सैन्यात १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.
अग्निवीरांना सीएपीएफ (CAPF) आणि आसाम रायफल्स (Assam Rifles) या दोन केंद्रीय दलांमध्ये भरतीसाठी कमाल वयोमर्यादेपेक्षा तीन वर्षांपर्यंतची सवलत मिळू शकले. तसेच अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी ही सवलत पाच वर्षांची असेल असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.
अग्निपथ योजनेला विरोध दर्शविण्यासाठी देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. बिहारमधील जेहानाबादमध्ये आंदोलकांनी बस आणि ट्रक जाळले. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यासोबतच इंटरनेटही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे अग्निपथ योजना ?
भारतीय सैन्यात भरतीसाठी नवीन नियम लागू झाले आहेत. केंद्र सरकारने आजपासून ‘अग्निपथ भरती योजना’ (Agneepath Recruitment Scheme) सुरू केली आहे. यामुळे तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती नव्या योजनेचा शुभारंभ करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
६ महिन्यांचे प्रशिक्षण
करोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांपासून सैन्यात भरती थांबली आहे. पूर्वी जिथे नवीन सैनिकांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागत होते आणि वेतनश्रेणीही कमी होती. आता तिथे फक्त ६ महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
इतका मिळेल पगार
लष्करातील पहिले निवृत्तीचे वय सुमारे ४० वर्षे होते. त्याचबरोबर आता नव्या नियमांनुसार पहिली ४ वर्षे सैनिकांची भरती होणार आहे. आता सैनिकांना कमी पगार मिळतो, पण नवीन नियमानुसार त्यांना सुमारे ३० हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात येत आहे.
More
Girls sathi ky vevtha ahe
job need