पुन्हा सावळा गोंधळ; TET व आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या भरती परीक्षेसाठीच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता, आरोग्य विभाग व शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 31 ऑक्‍टोबर या एकाच दिवशी येत आहेत. यामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. दरम्यान TET (Exam Date) परीक्षेची तारीख आधीच ठरली असल्याने त्यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर ! | Arogya Vibhag Bharti Admit Card Download

आरोग्य विभागाची गट “क’ व “ड’ संवर्गासाठी 25 व 26 सप्टेंबरला परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र परीक्षेची तयारी पूर्ण झालेली नसल्याने ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. आता आरोग्य विभागाच्या गट “क’ संवर्गाची परीक्षा 24 ऑक्‍टोबरला तर गट “ड’ची परीक्षा 31 ऑक्‍टोबरला घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आधीच शिक्षण विभागाकडून “टीईटी’ परीक्षेची तारीख निश्‍चित केलेली असताना त्याच दिवशी आरोग्य विभागानेही कशी काय परीक्षा ठेवली, असा प्रश्‍न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. TET परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नाही, अशी माहिती आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड