महाराष्ट्र बोर्डातर्फे 10वी, 12वी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखा जाहीर
Maharashtra Board Exams 2021
SSC, HSC Supplementary Examination
Maharashtra Board Exams 2021 : Important information for students applying for 10th, 12th supplementary exams. The dates have been announced on the official website of the board and online application is required. Further details are as follows:-
दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या वि्द्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. यासाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर तारखा जाहीर करण्यात आल्या असून तिथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दहावी, बारावीचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत पुनर्परीक्षार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of credit घेणारे विद्यार्थी) तसेच तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी नियमित शुल्कासह ११ ते १८ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. तसेच विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्ज करु शकतात.
- माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी २३ ते २४ ऑगस्टदरम्यान बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरायचा आहे.
- माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी २५ ऑगस्टपर्यंत विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत.
- मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन माध्यमातून हे अर्ज भरायचे आहेत.
- तसेच या तारखांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसंदर्भातील नोटिफिकेशन – https://bit.ly/2VHVrAN
CBSE, ICSE board 12th Exam Petition Update
Maharashtra Board Exams 2021 : The CBSE board had on April 14 announced the decision to cancel the Class X examination and postpone the Class XII examination. A petition challenging the decision was filed in the Supreme Court. The hearing will now be held on May 31. Further details are as follows:-
12 वी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवरील सुनावई आता 31 मे रोजी!! CBSE, ICSE board 12th Exam Petition Update: सीबीएसई बोर्डाने १४ एप्रिल रोजी दहावी परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावरील सुनावई आता ३१ मे रोजी होणार आहे.
सीबीएसई बोर्डाने १४ एप्रिल रोजी दहावी परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर शुक्रवारी २८ मे रोजी सुनावणी होणार होती. सकाळी सुनावणीला सुरुवात झाली, मात्र विरोधी पक्षांना याचिकेची अॅडव्हान्स्ड कॉपी दिलेली नाही असं कोर्टाच्या लक्षात आल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टाने यावेळी अशीही टिप्पणी केली की १ जूनला केंद्र सरकार या परीक्षांबाबतच्या ठोस निर्णयाप्रत येणार असल्याचेही कळले आहे.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
Maharashtra Board Exams : परीक्षांसंबंधी निर्णय 1 जूनपर्यंत
Maharashtra Board Exams 2021 : A decision regarding the 12th board exams will be taken by June 1. By May 25, the states will receive detailed instructions regarding the board exams. After examining them, the central government is likely to announce the decision on the exams on or before June 1, 2021.
Maharashtra Board Exams : परीक्षांसंबंधी निर्णय 1 जूनपर्यंत. बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत घेतला जाणार आहे. २५ मे पर्यंत राज्यांकडून बोर्ड परीक्षांसंबंधीच्या विस्तृत सूचना येतील, त्याचे परीक्षण करून केंद्र सरकार १ जून २०२१ किंवा त्यापूर्वी परीक्षेसंबंधीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
सीबीएसईने परीक्षा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेऊन सप्टेंबरमध्ये निकाल जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला. सीबीएसई बोर्डाने दोन पर्याय सुचवले. यापैकी एक म्हणजे केवळ १९ प्रमुख विषयांची नियमित परीक्षा घ्यावी किंवा बोर्डाशी संलग्न शाळांमध्ये कमी कालावधीची परीक्षा घ्यावी. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या दोन्ही पर्यायांबाबत राज्यांची मते २५ मे पर्यंत विस्तृतपणे मागवली आहेत.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि अन्य राष्ट्रीय परीक्षा आयोजित करण्याऱ्या संस्थांनी देखील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा स्थगित केल्या.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
Maharashtra Board Exams : दहावी परीक्षा रद्द!!
Maharashtra Board Exams 2021 Cancelled : Education Minister Varsha Gaikwad had announced the cancellation of the Class X examination on the background of Corona infection. Finally, after the announcement of the Minister of Education, the examination was canceled after 22 days.
Maharashtra Board Exams : दहावी परीक्षा रद्द!! करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. अखेर शिक्षणमंत्र्याच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी परीक्षा रद्द. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी शासन निर्णयाद्वारे अधिकृतपणे जाहीर केला.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कागदोपत्री जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमावस्थेत होते. त्यामुळे काही तांत्रिक अडचणीही निर्माण होत होत्या. याबाबत गेल्या आठवड्यात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर शिक्षणमंत्र्याच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी परीक्षा रद्द करण्याबाबतचा अधिकृत निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे.
दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा मे मध्ये अपेक्षित!
Maharashtra Board SSC Exams 2021 Cancelled – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी या वेळी दिली.
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या सूचना याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात येणार आहे. तसेच काही तज्ज्ञांशी, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला असला, तरी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविले जाईल. दहावीत जास्त गुणांची अपेक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कशी घ्यायची, तसेच बारावीच्या परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,’’ अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि मंत्रीमंडळात झालेल्या निर्णयाबाबत पत्रकारांशी बोलताना ‘दहावीच्या परीक्षा रद्द आणि बारावीच्या परीक्षा होतील’, असा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गायकवाड यांनी ही माहिती दिली.
Maharashtra Board SSC Exams 2021 Exam Updates & HSC Exam Details will be available soon on MahaBharti.
दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावर्षी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल. तर बारावीची परीक्षा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक पत्रकार परिषद घेत 10वी, 12वीच्या परीक्षांच्या संदर्भात महत्वाची माहिती दिली होती. यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असून लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
Table of Contents
माझी 10 वी झाली आहे तर मला job आहे का
12th exam
12th exam