1,10,000 लाखांपर्यंत पगार – सरकारी नोकरीची शेवटची संधी!!

APSC Recruitment 2020

APSC Recruitment 2020 : सरकारी नोकरीची शेवटची संधी; 577 पदांची भरती अन् मिळणार 1,10,000 लाखांपर्यंत पगार

APSC Recruitment 2020 : आसाम लोकसेवा आयोगा(Assam Public Service Commission)ने 500हून अधिक पदे भरण्यासाठी अर्ज मागवलेले असून, भरतीची अंतिम तारीख आज म्हणजेच 8 सप्टेंबर 2020 आहे. या भरतीअंतर्गत अभियंत्यांच्या अनेक पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारास दरमहा 1,10,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. या भरतीसाठी शेवटची तारीख तीन वेळा वाढविण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2020 रोजी निश्चित करण्यात आली होती, ती 17 ऑगस्ट आणि त्यानंतर 24 ऑगस्ट करण्यात आली. यानंतर तिस-यांदा या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर करण्यात आली.

APSC Recruitment 2020

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ठिकाण आणि पगार

  • कनिष्ठ अभियंत्यां(JE, Civil)साठी 344 जागांवर अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याअंतर्गत उमेदवारांना दरमहा 14,000 ते 60,500 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 8700 रुपये असेल.
  • सहाय्यक अभियंत्यां(AE, Civil)साठी 222 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याअंतर्गत उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,10,000 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 12700 रुपये असेल.
  • त्याच वेळी सहाय्यक आर्किटेक्टसाठी 11 जागा रिक्त आहेत, ज्यासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,10,000 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 12700 रुपये असेल.

पदांची माहिती आणि पात्रता

  • कनिष्ठ अभियंत्या (JE)साठी अर्ज करणा-या उमेदवारांनी शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक अभियंत्या(AE)साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक आर्किटेक्टसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

  • सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये अर्ज फी भरावी लागेल.
  • त्याचबरोबर एससी/एसटी/ओबीसी/एमओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्ज फी द्यावी लागेल.

निवड कशी होईल?

एपीएससी कनिष्ठ अभियंता भरती 2020 अंतर्गत निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर त्यांना मुलाखतीतून जावे लागेल.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड