कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील रुग्णालयात डॉक्टरांची भरती

Kalyan Dombivli Mahanagarpalika Doctors Bharti 2020

KDMC Bharti 2020 : Kalyan Dombivli Mahanagarpalika 72 Medical Officer and 30 Staff Nurse Bharti will be expected soon.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १०२ पदांची भरती

मित्रानो, सध्या च्या परिस्थितीत डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ ची कमतरता सगळी कडे भासत आहेत त्या पाश्वभूमीवर कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाकडून वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. पालिकेच्या रुग्णालयात वाढीव मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी तात्पुरत्या अस्थायी स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ७२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुरुवारपासून थेट मुलाखतीद्वारे ही भरती केली जाणार असून डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांची संख्यादेखील अपुरी असल्यामुळे ३० स्टाफ नर्सदेखील अस्थायी स्वरूपात सेवेत घेतल्या जाणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या संदर्भातील अधिक माहिती अशी कि कल्याण-डोंबिवली महापालिकेची डोंबिवलीतील शास्त्रीनगर आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई ही दोन रुग्णालये असून या रुग्णालयांत अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागते. या अनुशंगाने पालिका प्रशासनाकडून रुग्णालयात काम करण्यासाठी डॉक्टर भरती करण्यासाठी वारंवार जाहिराती देण्यात आल्या असल्या तरी या डॉक्टरांना दिले जाणारे मानधन अत्यल्प असल्यामुळे या जाहिरातीला डॉक्टरांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळेच या डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मागील महासभेने या मानधनवाढीला मंजुरी दिल्यानंतर पालिका प्रशासनाकडून डॉक्टर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र २४ मार्च रोजी बोलावण्यात आलेल्या मुलाखती त्याच दिवशीपासून केंद्र सरकारकडून संचारबंदी घोषित करण्यात आल्यामुळे रद्द कराव्या लागल्या होत्या.

पालिका रुग्णालयातील जनरल वॉर्डसाठी २० तर निवासी वैद्यकीय अधिकारी २० अशा ४० एमबीबीएस डॉक्टरांची भरती केली जाणार असून १० एमडी फिजिशियन, पाच चेस्ट फिजिशियन, १० भूलतज्ज्ञ, पाच बालरोगतज्ज्ञ, दोन कान नाक घसा तज्ज्ञ अशा ७२ डॉक्टरांची भरती केली जाणार असून याखेरीज ३० स्टाफ नर्सचीदेखील भरती केली जाणार आहे. तत्काळ गरज असल्यामुळे गुरुवारपासून ६ एप्रिलपर्यंत या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना २४ तासांच्या आत सेवेत हजर राहावे लागणार आहे. या संदर्भातील पूर्ण जाहिराती आणि अधिक माहिती वर दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड