Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दहावीसाठी गुणपडताळणी, छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा | Maharashtra SSC Result 2024

Maharashtra SSC Result 2024

SSC Marks Verification Process 2024

Maharashtra SSC Result 2024: After the announcement of the 10th result, the process of verification of marks, revaluation of answer sheets and application for photocopies has been started through the state board. For this, students will be able to apply online to the departmental board from today, Tuesday (28th).
Many students have doubts about their result after the declaration of result. Many students feel that their marks are low. Such students are given an opportunity to view, re-evaluate or verify their answer sheet through the board. This online facility has been immediately made available to students through the state board after the announcement of class 10 results on Monday.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन व छायाप्रतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आज, मंगळवारपासून (दि. २८) विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

Maha SSC Revaluation Process 2024

निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या निकालाबाबत शंका असते. आपल्याला मिळालेले गुण कमी आहेत, असे अनेक विद्यार्थ्यांना वाटते. अशा विद्यार्थ्यांना मंडळामार्फत त्यांची उत्तरपत्रिका पाहण्याची, त्याची फेरमूल्यांकन करण्याची किंवा गुणपडताळणी करण्याची संधी दिली जाते. सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत तातडीने विद्यार्थ्यांना ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२८ मे ते विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या ११ जूनदरम्यान गुणपडताळणी, छायाप्रती व फेरमूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे गुण पडताळणीसाठी प्रत्येक विषयाला ५० रुपये शुल्क आहे, तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ४०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत फेरमूल्यांकनासाठी अर्ज करावा लागणार आहे. फेरमूल्यांकनासाठी मंडळामार्फत प्रत्येक विषयास तिनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे सर्व ऑनलाइन अर्ज करण्याबाबची सर्व माहिती मंडळामार्फत https:// verification.mh-ssc.ac.in या वेबसासटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुरवणी परीक्षेसाठी ३१ पासून अर्ज प्रक्रिया
दहावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ मेपासून सुरू होणार आहे. त्यासाठीची सूचना मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.


Maharashtra 10th Result 2024 Out

Maharashtra SSC Result 2024:  Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education SSC Result 2024 Release on 27 May at 1:00 p.m. Class 10th result is available on the official website maharesults.nic.in. SSC Board of Maharashtra students will also be able to search here by roll number, mother name and name wise.

Maharashtra SSC Result 2024: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. 21 मे 2024 ला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान आता बारावीचा निकाल जाहीर झाला असल्याने दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार अशी विचारणा विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून निकाल पाहता येईल तसेच विषयनिहाय मिळालेल्या गुणांची प्रत (प्रिंट) घेता येणार आहे. यावर्षी दहावीच्या तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आले. त्यामुळे बारावीपाठोपाठ दहावीचा निकालदेखील यंदा लवकर जाहीर होत आहे. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो.

SSC Nikal 2024 Out

Maharashtra SSC Board Result 2024 LIVE Updates: संपूर्ण मार्कशीट पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच इयत्ता दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 99.1 टक्के असा लागला आहे, तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे.

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org  
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in

राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांकडून दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ सूत्रानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये गुणपत्रकांचे वाटप केले जाईल तसेच ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने  मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जूनपर्यंत अर्ज करता येईल. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. याकरिता पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, ३१ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे च्या चौथ्या आठवड्यात जाहीर करू असे म्हटले होते. यानुसार 27 मे ला दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदा 10 वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. एकूण 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
दरम्यान आता या लाखो विद्यार्थ्यांच्या निकाल येत्या तीन दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज आपण निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला निकाल कुठे पाहू शकतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

निकाल कुठं पाहणार?

जेव्हा दहावीचा निकाल जाहीर होईल तेव्हा mahahsscboard.in,

mahresult.nic.in,

sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.

वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे दहावीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकायचे आहे.
यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट पाहता येणार आहे. ज्यांना ऑफलाइन निकाल बघायचा असेल ते एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहू शकतात.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जायचे आहे. यात MH10 लिहून पुढे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. मग हा मॅसेज तुम्हाला 57766 वर पाठवायचा आहे. हा एसएमएस पाठवल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला SMS केला जाईल.


Maharashtra SSC Board Result Date 2024

Maharashtra SSC Result 2024 महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारलीये….यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागलाय.. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारलीये. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय.. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. दरम्यान आता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढू लागली आहे. दहावीचा निकाल कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.  तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, असेही सांगितले. दरम्यान त्यांना यावेळी दहावी निकालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

दहावीचा निकाल कधी? या प्रश्नावर बोलताना दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या मदतीनेदेखील तुम्ही निकाल पाहू शकता.


Maharashtra 10th Result 2024

१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे. आजवर विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे अतिरिक्त गुण आता रद्द करण्यात आले आहेत. कारण अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे. आजवर विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे अतिरिक्त गुण आता रद्द करण्यात आले आहेत. कारण अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

कला, क्रीडा, सांस्कृतीत, लोककला अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या आणि नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र आणि बक्षिसे दिली जात होती. त्यासह ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना जास्तीचे मार्क देण्यात येत होते. विद्यार्थ्यांचे हे जास्तीचे मार्क पैसे घेऊन दिले जात असल्याचं समजल्यानंतर गुणांचा बाजार आता बंद झाला आहे. गुणांचा बाजार बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर आणि टक्केवारीवर देखील याचा परिणाम होईल अशी शक्यता आहे. आज बारावीचा निकाला जाहीर होणार आहे. त्यानंतर याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. अशात आता या निर्णयाने विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.


10th Result On 30th May 2024

नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. मेच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागलीये.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजूनही दहावीच्या निकालाबद्दलची तारीख ही जाहीर करण्यात नाही आली. मेच्या चाैथ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आलंय. आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता पुढच्या दोन दिवसात दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागेल याची घोषणा ही बोर्डाकडून केली जाऊ शकते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे लवकरच दहावीच्या निकालाबद्दलचे अपडेट शेअर करतील. 30 मेला दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी एक चर्चा आहे. मात्र, अजूनही बोर्डाकडून दहावीच्या निकालाबद्दलचे कोणतेही अपडेट आले नाहीये.

दहावीच्या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.


Maharashtra SSC Result Date 2024

माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २० मेनंतर कधीही बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होऊ शकते. तर दहावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १ जूनच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. राज्यात २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची, तर १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली.

अफवांवर विश्वास ठेवू नका निकालाचा कालावधी जवळ आला की, सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा प्रसारित केल्या जातात. या तारखांमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. निकालाबाबत अनेक अफवा पसरवल्या जातात. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर निकालाच्या तारखेबाबत विचारणा केली जाते. बोर्डाकडून दरवर्षी एक दिवस अगोदर निकालाची तारीख जाहीर केली जाते. त्यामुळे बोर्डाच्या अधिकृत तारखेशिवाय इतर तारखांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतो. यंदा हा निकाल थोडा लवकर म्हणजेच २५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य मंडळाकडून तयारी सुरू आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. यंदा दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर होणार आहे. बारावी व दहावीच्या परीक्षेतील तोंडी परीक्षेचे गुण ऑनलाइन भरण्यात आल्याने निकालाचे कामकाज लवकर पूर्ण होणार आहे. दहावीच्या निकालानंतर लगेचच अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. दरवर्षी शिक्षक संघटनांचा बारावी व दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार यंदाही कायम होता. मात्र शिक्षणमंत्र्यांनी तोडगा काढल्यानंतर प्रश्नपत्रिका तपासणीचे काम गतीने सुरू झाले. निकालाच्या कामकाजातील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे लवकर निकाल लागणार हे स्पष्ट झाले आहे.

 


 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात दहावीची परीक्षा ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 पर्यंत सुरू होती, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 मध्ये झाली. आता विद्यार्थ्यांपासून ते पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. इतर राज्यांमध्ये निकालाची तारीखही पुढे आलीये. आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहेत. ज्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता ही वाढताना दिसत आहे. निकाल लागला की, पुढील वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची धावपळ सुरू होते.

 

विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल. मात्र, या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.

विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येईल. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना वरील दिलेल्या साईटवर जावे लागेल आणि तिथे आपला परीक्षा क्रमांक टाकावा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केले की, विद्यार्थ्यांचा निकाल दिसेल. यंदा बारावीच्या परीक्षेला तब्बल 14 लाख 28 हजार विद्यार्थी बसले होते. दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. बारावीची परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यंदा भरारी पथकाच्या संख्येत देखील मोठी वाढ करण्यात आली होती.

 

काॅपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंदा बोर्डाकडून कंबर कसण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता सर्वांच्या नजरा या निकालाकडे आहेत. याच महिन्यात दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे. त्याबाबतचे संकेत राज्य मंडळानेच दिले आहेत. बारावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल मेअखेरीस लागण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या दरम्यान घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

गेल्या काही दिवसांपासून दहावी बारावीच्या परीक्षांच्या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातून समाजमाध्यमांमध्ये निकालाच्या तारखा फिरत असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी जाहीर केला जाणार याबाबत उत्सुकता आहे. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर केला होता. मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षाही लवकर निकाल जाहीर करण्याची तयारी असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली. त्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी, त्यांच्या पालकांना पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती तयारी करण्यास वेळ मिळणार आहे.


 

विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे. गुणपत्रिका तयारीचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीस दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी परीक्षेदरम्यान निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत ड्युटीही बजावावी लागली. मात्र, अशा परिस्थितीतही अधिकारी, शिक्षकांनी मेहनत घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले, असे गोसावी म्हणाले. निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग गुंतलेला असल्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करणे आव्हानात्मक होते. मात्र, निकाल वेळेत जाहीर व्हावा, यासाठी आठवड्यातून दोन वेळा व्हीसीद्वारे बैठक घेत विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. विभागीय मंडळातील अधिकारी आणि शिक्षकांनी वेळेत काम पूर्ण केले आहे. 


Maharashtra SSC Result 2024: About a month has passed since the end of the 10th (SSC) and 12th (HSC) examinations conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. So now the attention of the students is towards the results. Many people’s future depends on the results of the board exams (10th 12th Board Exam Results). Questions like what to do next, which college to take admission linger in the mind. It is expected that the result of class 12th will be declared in the last week of May and the result of class 10th in the first week of June.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board) घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या परीक्षा संपून सुमारे महिन्याभरायचा कालावधी संपला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बोर्ड परिक्षांच्या निकालावर (10th 12th Board Exam Results) अनेकांचे भविष्य अवलंबून असते. पुढे काय करायचे, कोणत्या काॅलेजला प्रवेश घ्यायचा यासारखे प्रश्न मनात रेंगाळत असतात. त्यातच बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जुनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत अनेकदा खोट्या बातम्या अफवा सोशल मीडीयात झपाट्याने वायरल होतात. त्यामुळे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाल्याशिवाय निकालाच्या तारखांवर विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख आता पर्यंत प्रत्यक्ष निकालाच्या केवळ एक दिवस आधीच जाहीर केली जाते. त्यामुळे याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहताना तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव ही माहिती असणे आवश्यक आहे. निकाल ऑनलाईन पाहताना विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत.

राज्य मंडळाने किंवा शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याने निकालाबाबत भाकीत केले नाही.तसेच अजूनही बहुतांश सर्व विभागीय मंडळाकडून निकाळाचे काम अंतिम झालेले नाही.त्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणखी एक महिना निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2024: कसे तपासायचे? Maharashtra SSC Board Namewise, School Wise, SMS Result 2024

  • सर्व प्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – mahresult.nic.in.
  • मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र SSC निकाल 2024 साठी लिंकवर क्लिक करा.
  • उघडणाऱ्या नवीन पेजमध्ये तुमची ओळखपत्रे जसे की सीट नंबर आणि आईचे नाव भरा.
  • महाराष्ट्र 10वी चा निकाल 2024 आता तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • तुमचा निकाल तपासा आणि संदर्भासाठी डिजिटल स्कोअरकार्ड डाउनलोड करा.

Maharashtra SSC Result Date 2023

SSC HSC Result Date 2023 : The Maharashtra Board will dealer today on 2nd June 2023 @ 13.00. The Maharashtra SSC result will be available on the board’s official website mahahsscboard.in and mahresult.nic.in. For More updates keep visiting MahaBharti.in

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. खालील सेक्शन मधून आपण आपला निकाल बघू शकता. यंदाच्या वर्षी निकाल ९३.८३ लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.  

 

या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. काही तासतच दहावीचा निकाल लागणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. निकालाची पत्रकार परिषद सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलीय आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार. महाराष्ट्र एसएससीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव यासारखे आवश्यक तपशील प्रदान करून महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 मध्ये प्रवेश करू शकतात. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेश पत्र किंवा अर्जावर आईचे पहिले नाव वापरावे लागेल. महाराष्ट्र एसएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळवले पाहिजेत. मात्र, 20 टक्के गुण मिळवणाऱ्यांनाही उत्तीर्ण मानले जाईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागल आहे.  गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.  राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीसाठी ६७ विषयात आणि आठ माध्यमात परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे. राज्यातील महाराष्ट्र इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यावर्षी सुमारे 14 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. एसएससी निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेशपत्र किंवा अर्जावर दिलेले आईचे नाव वापरणे आवश्यक आहे. खालील परिणाम, थेट लिंक, उत्तीर्णतेची टक्केवारी आणि इतर तपशीलांवरील नवीनतम अद्यतनांसाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत रहा.

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीनुसार शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगतच्या दोनच संधी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ७ जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येतील. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक काढण्यात येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

 


Maharashtra SSC HSC Result Date 2023

SSC HSC Result Date 2023 – When the 10th-12th exams are over, children and parents are curious about the result. But it is not known when the result will come till the last moment. So everyone’s eyes are on the news. Now information is coming that the results of both the exams will be released in the month of June. The SSC, HSC Result 2023 Date will be published by Maharashtra board soon. Due to the strike called for the old pension scheme, it was predicted that the results of the 10th and 12th examinations would be delayed. It consisted of teachers and non-teaching organizations who examined the answer sheets of the 10th and 12th board examinations. There was uncertainty about when the result would be given. But now the work of checking the answer sheets is going on at a fast pace, so the result will be available in time.

आपल्याला माहीतच आहे, दहावी-बारावीच्या परीक्षा आटोपल्यावर मुलांना आणि पालकांना उत्सुकता असते ती निकालाची. पण शेवटच्या क्षणापर्यंत निकाल कधी लागणार, हे माहिती नसतं. त्यामुळे सर्वांची नजर बातम्यांवर आणि शोषण मीडियावरील अपडेट्स वर असते. आता जून महिन्यात दोन्ही परीक्षांचे निकाल लागतील अशी माहिती पुढे येत आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली होती. यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांचा समावेश होता. अश्यात निकाल कधी लागेल, याबाबत अनिश्चितता होती. मात्र आता उत्तरपत्रिका पत्रिका तपासण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याने निकाल वेळेत लागणार आहे. या संर्दभातील पुढील अपडेट आणि माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. 

 

१४ लाख ५७ हजार २९४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली तर १५ लाख, ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे.त्यामुळे लवकरात लवकर दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका जलद गतीने तपासणी होणार असे ही बोर्डाने सांगितले आहे. यंदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यामुळे निकालास उशीर होईल असे सांगण्यात आले होते. पण तसे काहीही न होता. बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल वेळेवरच लागणार आहेत.

 

दहावीच्या बोर्ड परीक्षेची पेपर तपासणीची डेडलाईन १५ एप्रिल असणार आहे. तर त्याआधी बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांचे निकाल जून महिन्यातच लागणार आहे, एवढे मात्र जवळपास निश्चित आहे.

 

हे होते नियम : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये अनेक नियम बदलले होते. या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी कठोर नियम जाहीर केले होते. मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर विकत घेतला तर परीक्षा रद्द केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं निलंबन केलं जाईल, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले होते.

 


SSC Board Result – SSC HSC Result Date 2023 : The SSC Exam was held in March. But the result is not declared. Maharashtra SSC result 2022 date update. Result is now declare today at 1 PM . Further details are as follows:-

विद्यार्थी आणि पालकांना www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या लिंकवर निकाल पाहता येईल. तसेच निकालाची प्रतही घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

How to check Maharashtra SSC results via SMS: इंटरनेट शिवाय SMS द्वारे निकाल कसा चेक करायचा ?

If mahahscsscboard.in website is Not opening for various users. Then Following is the alternate way to check your online result of Maharashtra board SSC Examinations.

Step 1: Go to your message window on the phone

Step 2: Type MH (exam name) (Seat No)

Step 3: Send the message to 57766

Step 4: Result will display on screen

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is expected to announce the Maharashtra SSC Board Result 2022 this week.  The result will be published on the official website of the board. After the declaration of the result, it will be available on the official websites mahresult.nic.in and mahahsscboard.in.

आणि हो मित्रांनो, निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

 

 

 

 

 

 

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mallamma says
Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड