तलाठी भरती सर्व्हर डाऊन बद्दल निवदेन जाहीर, नवीन महत्वाचा अपडेट!- Talathi exam date 2023

Talathi exam date 2023

राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेत आज सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं होतं. या संदर्भातील नवीन निवेदन विभागाद्वारे आतच जाहिरात केलेले आहे. खालील जाहीर निवेदन उमेदवारांनी पहावे.

सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झालेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत व्हायला सुरुवात झालीय. सकाळी 9 ते 11 या वेळेत ही परीक्षा होती. मात्र अजूनही परीक्षा सुरू होऊ शकलेली नाही.

Server Down Talathi Bharti 2023

महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून 10 लाख 41 हजार इच्छुकांनी अर्ज सादर केला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेच्या शुल्कावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे.

 

अकोला जिल्ह्यातील तलाठी भरती पेपरचा खोळंबा

अकोला जिल्ह्यातील दोन्ही परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप. जिल्ह्यात बाभूळगाव आणि कापशी येथे दोन परिक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा होती. सकाळी 9 ते 11 ही परीक्षेचे वेळ होती. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी खोळंबली आहे. त्यामुळे अद्यापही परीक्षा केंद्राबाहेरच आहेत.

 

नागपूरमध्येही तलाठी परीक्षेचं सर्व्हर डाऊन

नागपूरसह जवळपास सर्वच केंद्रांवर ही परीक्षा सुरू झालेली नाही. नागपूरच्या vmv महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेसाठीच्या प्रवेश पत्र हातात घेऊन उभे आहेत. मात्र त्यांना वर्ग खोल्यांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. काही ठिकाणी परीक्षार्थ्यांनी परीक्षेची व्यवस्था आणि सर्वर डाऊन झाल्याबद्दल रोष व्यक्त करत आहे.

 

लातूरमध्ये विद्यार्थी संतप्त

महाराष्ट्रभरातून आलेले विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून लातूरच्या परीक्षा केंद्राबाहेर हजर होते .मात्र त्यांना कोणतेही सूचना अद्यापपर्यंत देण्यात आली नाही. नऊ वाजून गेल्यानंतर सेंटरमधील कर्मचारी सांगत आहेत की काही तांत्रिक चुकांमुळे आम्ही परीक्षा पुढील सत्रात घेऊ? यामुळे यवतमाळ, हिंगोली नांदेडसारख्या भागातून आलेले विद्यार्थी संतप्त झाले आहेत.


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यात तलाठी भरती परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असताना नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत; परंतु संबंधित प्रकार परीक्षा केंद्रांच्या बाहेर घडला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीनेही ऑनलाइन सुरक्षिततेबाबत काटेकोर नियोजन केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा नियोजित वेळेत ठरल्याप्रमाणे टप्प्यांमध्ये पार पडणार असून उमेदवारांनी निश्चिंतपणे परीक्षेला सामोरे जावे. अफवा पसरवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.

तलाठी भरती परीक्षेचे हॉलतिकीत डाउनलोड करा तलाठी पदभरती परीक्षा सुरु!। Talathi Hall Ticket 2023

राज्यातील तलाठी भरती परीक्षेत होणारे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे, पेपरफुटी प्रकरणामुळे जिल्हा प्रशासकीय पातळीवरून संबंधित प्रक्रिया थेट जमाबंदी आयुक्तांच्या समन्वयाने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार चार हजार ४६६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून राज्यभरातून तब्बल ११ लाख अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० लाख ३० हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले असून एकाच वेळी परीक्षा घेण्याचे नियोजन, परीक्षा केंद्र आणि आसन व्यवस्था, सुरक्षितता आणि इतर नियोजनाबाबत पूर्ण तयारी करत १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना भूमी अभिलेख विभागाचे अप्पर आयुक्त आनंद रायते म्हणाले, नाशिक आणि नागपूरमध्ये तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचे समजले; परंतु संबंधित घटना परीक्षा केंद्रांवर न होता बाहेर झाल्या असून परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात जॅमर यंत्रणा बसवण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घड्याळ, मोबाईल, हेडफोन किंवा इतर वस्तू केंद्रावर नेण्यास उमेदवारांना मज्जाव करण्यात आला आहे. विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येत असल्याने प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वेगवेगळे आहे. उमेदवार परीक्षेला बसल्यानंतर १५ मिनिटांनी प्रश्नपत्रिका ऑनलाइन समोर येते. या प्रश्नपत्रिकेवर सांकेतिक चिन्ह, संगणक क्रमांक, काळ, वेळ तसेच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स : 

तलाठी भरतीसाठी दहा लाखांपेक्षा अधिक अर्ज भरले आहेत. लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात लोटण्याचा कोणताही अधिकार नाही. तलाठी भरतीचा पेपर फुटल्याने आता जाहीर असलेले तलाठी परीक्षेचे वेळापत्रक त्वरित स्थगित करण्यात यावे. आम्ही सुचवलेल्या वरील उपाययोजना अमलात आणून परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात यावे आणि नव्याने परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने राज्य परीक्षा समन्वयक तथा भूमी अभिलेख विभागाकडे केली आहे. तसेच मागण्या मान्य करण् आल्या नाही तर लवकरच आपल्या कार्यालयाबाहेर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 


Talathi Bharti Exam Dates 2023 Out, Check Exam Schedule

 

Talathi exam date 2023 – Talathi Recruitment Written Exam 2023 exam will be conducted in three sessions. The timings are fixed from 9 am to 11 am, 12.30 pm to 2.30 pm and 4.30 pm to 6.30 pm. Candidates will know the online exam village in advance and the exam center will appear along with the admit card three days before.

 

भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत. या संदर्भातील पूर्ण परिपत्रक खाली दिलेलं आहे. तसेच या लिंक वरून नवीन TCS/IBPS पॅटर्न तलाठी टेस्ट्स प्रॅक्टिस करू शकतात. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.  तसेच तलाठी भरती टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा व तलाठी साठी कोणती पुस्तके महत्वाची आहे ते जाणून घेण्यासाठी यादी डाउनलोड करा …!

Talathi Bharti Exam Date 2023 Official Notice

Talathi Bharti Exam date 2023 Official Notice: Candidates can check the official notice released by the Revenue Department regarding the Talathi Bharti Exam date. Click on the link to download the Notice PDF.Talathi Bharti Timetable

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. TCS कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.

Talathi exam date 2023

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड