ZP Shikshak School Bharti – जिल्हा परिषदेच्या १५ हायस्कूलमध्ये शिक्षकांची ५९ पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे. वर्ग अध्यापनाचा बोजवारा उडाला असून, शिक्षण विभागाच्या कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पालकांकडून होत आहे. शैक्षणिक असताना विषयांना नसल्याने कसा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंत विविध विषयांच्या शिक्षकांची पदे रिकामी आहेत. उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत असल्याने शाळांचे वेळापत्रक सांभाळताना प्रशासनाची दमछाक होत. वर्ष सुरू महत्त्वाच्या शिक्षकच अभ्यासक्रम होणार आहे.

रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची प्रतिनियुक्ती केली होती. मात्र, प्राथमिक शाळांतील मुलांचे नुकसान होईल या भीतीने पालकांनी त्याला विरोध दर्शवला. पालकांच्या आंदोलनानंतर ही प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली. प्रतिनियुक्ती रद्द झाल्यानंतर नियमानुसार प्राथमिक शिक्षकांकडून विकल्प मागवून कायमस्वरूपी पदस्थापना देणे आवश्यक होते. परंतु, शिक्षण विभागाने ही प्रक्रिया अद्याप प्रभावीपणे राबवलेली नाही. एका शाळेची सोय करताना दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा हा प्रकार चुकीचा असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू असताना महत्त्वाच्या विषयांना शिक्षकच नसल्याने अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार आणि आगामी परीक्षांना विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जायचे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















