ZP Pune Bharti 2026
ZP Pune Recruitment 2026 – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल ४३६ शिक्षक जिल्हा परिषदेला उपलब्ध झाले असून, त्यांच्या तातडीच्या समुपदेशनानंतर रिक्त शाळांमध्ये नियुक्त्या करण्यात येणार आहेत. हे शिक्षक १० सप्टेंबरपर्यंत शाळांमध्ये रुजू होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील शाळांमध्ये सुमारे ९७ टक्के शिक्षक उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शिक्षक भरतीसाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या रिक्त पदांच्या मागणीनुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उपशिक्षक तसेच पदवीधर शिक्षक (भाषा व विज्ञान) पदांसाठी पहिल्या टप्प्यात तब्बल ४३६ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण ५९३ रिक्त पदांपैकी या शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी माहिती दिली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले उपस्थित होत्या.
शिक्षकांची प्रतीक्षा संपल्याने ग्रामीण भागातील शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपलब्ध झालेल्या शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या लक्षणीयरीत्या घटणार असून, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणामही कमी होणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित, सुरळीत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी उपलब्ध शिक्षकांना नियुक्तीच्या शाळांवर तातडीने रुजू करून घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबाबतची प्रक्रिया राबविल्यानंतर आता लवकरच नवीन एक हजार पदांची निर्मिती केली जाणार आहे. स्थापत्य अभियंता, परिचारिका महिला आणि पुरुष त्याचबरोबर लिपिक संवगीतील काही जागा अशा १००० नव्या जागांची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेकडून समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये अनुकंपा तत्त्वावर ५८ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील रिक्त पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीसाठी राखीव ठेवली आहेत. यासाठी पात्र ठरलेल्या १५५ उमेदवारांपैकी १३० जणांनी समुपदेशन प्रक्रियेत सहभाग नोंदविला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यापैकी गट ‘क’मधील १६ तर गट ‘ड’ मधील ४२ असे एकूण ५८ उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात उपस्थित होते.
ZP Pune Bharti 2026: Zilla Parishad Pune is going to conducted new recruitment for the posts of “Medical Officer”. There are various vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview schedule on 03rd of January 2025.For more details about ZP Pune Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी“ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 जानेवारी 2025 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे.
- वयोमर्यादा – 38 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शिवनेरी सभागृह आरोग्य विभाग जि.प.पुणे
- मुलाखतीची तारीख – 03 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.zppune.org/
Educational Qualification For ZP Pune Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैद्यकीय अधिकारी | BAMS |
Salary For ZP Pune Application 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वैद्यकीय अधिकारी | नियुक्त केलेल्या उमेदवारास दरमहा एन. एच. एम. यांचेडून रक्कम रु १८०००/- व आदिवासी विकास विभागाकडून रक्कम रु २२०००/- असे एकूण रु. ४००००/- (अक्षरी रक्कम रु.चाळीस हजार मात्र) मानधन देण्यात घेईल. |
Selection Process For ZP Pune Arj 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 03 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
This is old Post. New information will be updated soon.
Important Links For zppune.org Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/iOFUJ |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zppune.org/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















