महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांना पाठिंबा देत शरद पवारांनी सरकारला जागा वाढवण्याचं ठाम आवाहन केलं आहे. “४८० जागा पुरेशा नाहीत – प्रशासनात हजारो पदं रिक्त आहेत, मग एवढ्याच जागा का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर थेट चर्चा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी काही विद्यार्थी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ येथे गेले होते. त्यांनी थेट त्यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं – PSI, STI आणि ASO पदांसाठी जाहीर झालेल्या ४८० जागा अपुऱ्या आहेत, दोन वर्षांनी परीक्षा होत असताना वयोमर्यादा वाढवली असली तरी जागा वाढवणं तितकंच गरजेचं आहे.
पवारांनी सोशल मीडियावरून माहिती दिली की, ही मागणी योग्य असून, शासन व आयोगाला जागा वाढवण्यात कुठलीही अडचण नाही. “मी स्वतः मुख्यमंत्री व आयोगाशी यावर बोलणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत व त्या मान्य होणं गरजेचं आहे.”
विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या:
गट ब व क २०२४ साठी अधिक जागा उपलब्ध करून द्या
एक्साईज SI पदांमध्येही जागावाढ करा
सर्व परीक्षा वेळेवर घ्या
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक नको
आयोगाचा कारभार पारदर्शक व योग्य पद्धतीने चालावा
क्लर्क परीक्षेचा निकाल लवकर लावा
EWS विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकला
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















