महाज्योती-वनार्टीच्या प्रशिक्षण योजनांसाठी अर्जाची मुदत वाढली; विद्यार्थ्यांना मोठी संधी !! – VANARTI Training Programme 2026

VANARTI Training Programme 2026

VANARTI Training Programme 2026 :   स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती आणि वनार्टी संस्थांकडून महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा तसेच संयुक्त गट-ब व गट-क परीक्षांसाठी पूर्वप्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील आणि भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी (नागरी सेवा), एमपीएससी (राज्यसेवा) तसेच लष्करातील सैनिक भरती परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या विविध प्रशिक्षण योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ ऑगस्ट २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्ज करून या प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


VANARTI Training Programme 2026 :   महाज्योती आणि वनार्थी संस्थांतर्फे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या, केंद्रीय लोकसेवा आयोग (नागरी सेवा) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्य सेवा/अभियांत्रिकी सेवा/संयुक्त गट ब आणि क) परीक्षांचा समावेश असलेल्या, परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त, गोवारी समाज (विशेष मागास प्रवर्ग) आणि धनगर समाज (भटक्या जमाती-क प्रवर्ग) यांच्यातील विद्यार्थ्यांसाठी UPSC (नागरी सेवा), MPSC (राज्य सेवा) आणि लष्कर भरती परीक्षांच्या पूर्व-प्रशिक्षणाचे विशेष प्रकल्प राबवले जात असून, त्यासाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची मुदत १०/०८/२०२६ ते २३/०८/२०२६ अशी आहे.

महाज्योती आणि वनार्थी यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व-प्रशिक्षण योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याची विनंती अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. या विनंत्यांचा विचार करून, वरील सर्व पूर्व-प्रशिक्षण योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६/०८/२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

Vanarti Corrigendum

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

वनार्टी संस्थेमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या IBPS Banking/LIC/AAO, रेल्वे भरती (RRB), मिलिटरी/पोलीस भरती, कर्मचारी निवड आयोग (SSC-CGL), शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT), MBA-CAT/CMAT-CET परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात येणारी चाळणी परीक्षा दि. ११/०८/२०२६ ते दि. १२/०८/२०२६ रोजी नियोजित करण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणाकरिता अर्ज केलेल्या सर्व संबंधित विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षांसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची लिंक सदर परीपत्रकासोबत वनार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. खालील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल :

१. सदर परिपत्रकासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली लिंक ओपन करावी.
२. अर्ज करतेवेळी सादर केलेला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकून “Log In” बटणवर क्लिक करावे.
३. Log In झाल्यानंतर उजव्या बाजूस असलेल्या “Download Admit Card” या बटणवर क्लिक करून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.

VANARTI Admit Card Download 2026

प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास वनार्टी कार्यालयाच्या कॉल सेंटरशी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा :
१. ७८८७८८२०२६
२. ८९७५२१५७०४
३. ८६६९८४२३१२
४. ७७४४९१९०६९

वनार्टी परीक्षा प्रवेशपत्रक डाउनलोड लिंक


 

VANARTI Training Programme 2026 महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन-क्रिमिलेअर गटातील विद्यार्थ्यांना वनार्टी मार्फत IBPS-PO/Banking/LIC/AAO २०२६-२७, पोलीस / लष्कर भरती – २०२६-२७, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२६-२७ प्रशिक्षण, कर्मचारी निवड आयोग संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा ऑनलाइन प्रशिक्षण २०२६-२७, आरआरबी (रेल्वे भरती मंडळ) प्रशिक्षण २०२६-२७, MBA-CAT/CMAT-CET 2026-27 प्रशिक्षण, MPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा प्रशिक्षण २०२६-२७, MPSC गट-ब आणि गट-क परीक्षा प्रशिक्षण २०२६-२७ या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येते. 2026-27 या आर्थिक वर्षात वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खाली आपण वेळापत्रक बघू शकता.

Vanarti Schedule 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः

1. आधार कार्ड
2. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र)
4. पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका
5. दिव्यांगाचे प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास)
6. अनाथ असल्यास दाखला (अनाथ असल्यास)

अर्ज कसा करावा :-

1. वनार्टीच्या www.vanarti.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for IBPS-PO/Banking/LIC/AAO, Police/Army Recruitment, TAIT (Teacher Aptitude and Intelligence Test), SSC-CGL (Staff Selection Commission – Combined Graduate Level), RRB (Railway Recruitment Board), MBA-CAT/CMAT-CET, MPSC Engineering Services, or MPSC Group-B and Group-C ” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

3. विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही.

 

अटी व शर्ती :-

1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 25/06/2026 राहील.
2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, वनार्टी यांचे राहतील.
4. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्याने यापूर्वी वनार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘सारथी’ या संस्थेकडून योजनेचा लाभघेतलेला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत केवळ वनार्टीच्या Call Centre वर संपर्क करावा.

संपर्क क्रमांक :- 7887882026
E-mail Id :- [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा
संस्थेचे संकेतस्थळ (Website) :- www.vanarti.in

Important Links Vanarti

TitleDateLink
Application for IBPS-PO/Banking/LIC/AAO Training 2026-27
08-06-2026
Application for Police / Military Bharti – 2026-27
08-06-2026
Application for Application for Teachers Aptitude and Intelligence Test (TAIT)-2026-27 Training
08-06-2026
Application for Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Online Training 2026-27
08-06-2026
Application for RRB (Railway Recruitment Board) Training 2026-27
08-06-2026
Application for MBA-CAT/CMAT-CET 2026-27 Training
08-06-2026
Application for MPSC Engineering Services Examination Training 2026-27
08-06-2026
Application for MPSC Group-B & Group-C Examination Training 2026-27
08-06-2026

 


इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ‘वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (वनार्टी) तर्फे ‘जेईई’, ‘नीट’ आणि ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना आता १५ जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील.

राज्यातील विमुक्त जाती; तसेच भटक्या जमाती ब, क व ड नॉन-क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी ‘वनार्टी’ कार्यरत आहे. २०२६-२८ या शैक्षणिक सत्रासाठी ‘वनार्टी’ तर्फे जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या www.vanarti.in या संकेतस्थळावर अर्ज करावे. अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत ३० मे २०२६ होती. मात्र, विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या ७८८७८८२०२६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाची दखल घेऊन आता अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, असेही वावगे यांनी नमूद केले.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड