UPSC भारतीय वन सेवा (IFS) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

UPSC IFS Main Exam

UPSC IFS Main Exam Schedule

UPSC IFS Main Exam : Indian Forest Service (mains) Examination (Written Examination and Interview) is conducted for the selection of candidates for the Indian Forest Service. The schedule for this exam has been announced. Further details are as follows:-

UPSC IFS Mains Exam 2021

भारतीय वन सेवा (mains) परीक्षा (लेखी परीक्षा आणि मुलाखती) भारतीय वन सेवेसाठी उमेदवारांनी निवड करण्यासाठी आयोजित करण्यात येते. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

आयोगाने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर हे शेड्युल जारी केले आहे. यानुसार, यूपीएससी मेन्स परीक्षा 2021 (UPSC IFS Mains Exam) २७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत आणि दुसरं सत्र दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत.

UPSC IFS Main Exam

या केंद्रांवर होणार परीक्षा 

मुख्य परीक्षा भोपाळ, चेन्नई, दिल्ली, दिसपुर (गुवाहाटी), हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, नागपूर, पोर्ट ब्लेयर आणि शिमला केंद्रांवर आयोजित केली जाईल. कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी उमेदवार आयोगा द्वारे जारी करण्यात आलेल्या हेल्पलाइन नंबर ०११-२३३८५२७१ वर संपर्क साधू शकतात. ई-मेल द्वारे [email protected] येथेही संपर्क साधता येईल.

मेन्स परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांची संख्या उपलब्ध संख्येच्या दुप्पट असेल. मुलाखत ३०० गुणांची असेल. उमेदवारांच्या मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे अंतिम निकाल तयार केला जाईल. परीक्षेसाठी अॅडमिट कार्डही लवकरच जारी केले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाचे संकेतस्थळ पाहावे.

UPSC IFS Mains 2021 वेळापत्रक – https://bit.ly/3s2am5n

Candidates for UPSC IFS Mains 2021 exam are urged to record the dates and prepare for the exam accordingly. Indian Forest Service (mains) Examination (Written Examination and Interview) is conducted for selection of candidates for Indian Forest Service. The second part of the written examination will consist of six papers of the traditional essay type in specific subjects in the sub-section (Section B).


भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी DAF-1 अर्ज जारी

UPSC IFS Main 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म DAF – 1 अधिकृत संकेतस्थळावर जारी केला आहे. upsc.gov.in वर उमेदवारांना DAF-1 भरता येईल. हा अर्ज भरण्याची अखेरची मुदत २७ नोव्हेंबर २०२० आहे.

UPSC IFS मुख्य परीक्षा 2020 – नवीन जाहिरात

शेड्युलनुसार यूपीएससी २८ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ पर्यंत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा (IFS Main Exam 2020) देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करणार आहे. IFS मेन परीक्षेद्वारे भारतीय वन सेवेतील भरतीसाठी विविध रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे अंतिम उमेदवार निवडले जातील.

UPSC IFS main 2020: असा भरा DAF-I अॅप्लिकेशन फॉर्म

  • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जा.
  • – यानंतर होम पेजवर ‘DAF for VARIOUS EXAMINATIONS OF UPSC’ च्या लिंक पर क्लिक करा.
  • – यानंतर ‘Click here’ च्या लिंक वर क्लिक करा.
  • – आता इंडियन फॉरेस्ट सर्विस मुख्य परीक्षा 2020 च्या लिंक वर क्लिक करा.
  • – आता आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
  • – UPSC IFS मुख्य 2020 साठी DAF भरा.
  • – यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अर्ज शुल्क 

भारतीय वन सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसबीआयच्या कोणत्याही शाखेत कॅश पैसे जमा करावे लागतील किंवा एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून व्हिसा / मास्टर कार्ड / Rupay क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डाचा वापर करून २०० रुपये शुल्क जमा करावयाचे आहे.

अॅडमिट कार्ड कधी?

परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आणि वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याआधी किमान सुमारे ३ आठवडे आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड