Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सुप्रीम कोर्टाचा निर्णय-उमेदवारांना आणखी एक संधी नाहीच !

UPSC Bharti 2021

UPSC Bharti 2021 : सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. गेल्यावर्षी परीक्षा न देऊ शकल्यामुळे आणखी एक संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली.

ज्या विद्यार्थ्यांना 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी शेवटची संधी होती, मात्र त्यांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा देता आली नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर, इंदू मल्होत्रा आणि अजय रस्तोगी यांच्या खंठपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु होती. 9 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय आजच्या सुनावणीत देण्यात आला. केंद्राने हे देखील स्पष्ट केलं होतं की उमेदवारांना आणखी एक संधी देण्यात येईल मात्र वयामध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही.

लवकरच सिव्हिल सर्व्हिस 2021 चं नोटिफिकेशन निघणार
UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग येत्या 27 जून रोजी प्रिलिम्स परीक्षा (पूर्व परीक्षा) घेणार आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर आयोगाने स्पष्टीकरण देताना म्हटलं, “CSE-2021आणि IFoSE-2021 यासाठी लवकरच पुढील अधिसूचना काढली आहे. तसंच सिव्हिल सेवा परीक्षा 2021 (CSE 2021) आणि भारतीय वन सेवा परीक्षा (IFoSE 2021) या दोन्ही परिक्षांचं एकसाथ आयोजन केलं जाईल. यावर्षी UPSC ने सिव्हिल सेवा परीक्षेसाठी लेहमध्ये एका नव्या परीक्षा केंद्राचं ओपनिंग केलं आहे.


 

UPSC Vacancy 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) तुम्हाला कोणत्याही लेखी परीक्षेविना केंद्र सरकारची नोकरी मिळवून देण्याची संधी देत आहे. यूपीएससीने अनेक रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या रिक्त पदांची अधिसूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in वर देण्यात आली आहे. या सरकारी नोकरी ( Sarkari Naukri ) चा तपशील वाचा आणि लवकर अर्ज करा.

UPSC अंतर्गत 250 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

UPSC Vacancy Details – पदांची माहिती

  • डेटा प्रोसेसिंग असिस्टंट – ११६ पदे (पे स्केल – लेवल ०७)
  • असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर – ८० पदे (पे स्केल – लेवल ०८)
  • ज्युनियर टेक्निकल ऑफिसर – ०६ पदे (पे स्केल – लेवल ०७)
  • स्पेशलिस्ट ग्रेड ३ असिस्टेंट प्रोफेसर – ४५ पदे (पे स्केल – लेवल ११)
  • लेक्चरर (मेडिकल सोशल वर्क) – ०१ पद (पे स्केल – लेवल १०)
  • असिस्टेंट डायरेक्टर (फिशिंग हार्बर) – ०१ पद (पे स्केल – लेवल १०)
  • कुल पदों की संख्या – २९६

UPSC Bharti 2021 Qualification Details – शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. आवश्यक वयोमर्यादाही वेगवेगळी आहे. कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए), आयटी ते अभियांत्रिकी, बीई (बीटी / बीटेक), वैद्यकीय (एमबीबीएस), कायद्याची (एलएलबी / एलएलएम) पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

Age Limit – वयोमर्यादा

डेटा प्रोसेसिंग सहाय्यक, सहाय्यक सरकारी वकील, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. व्याख्याता आणि सहायक संचालकांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. ४० वर्षापर्यंतचे उमेदवार विशेषज्ञ सहाय्यक प्रोफेसरसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय ओबीसी प्रवर्गात सर्व पदांसाठी ३ वर्षे आणि एससी, एसटीला प्रवर्गातील सर्व पदांसाठी ५ वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

How to Apply – अर्ज कसा कराल?

अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२१ आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर जाऊन किंवा पुढील दिलेल्या अप्लिकेशन लिंकवर क्लिक करुन अर्ज करता येईल. जनरल, ओबीसी, आर्थिक दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५ रुपये अर्ज शुल्क आहे. इतर प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रियाया पदांवर पात्र उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्ट करून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मात्र यूपीएससीने म्हटले आहे की अर्जांची संख्या जास्त असल्यास शॉर्टलिस्टिंगसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते. म्हणून, अर्ज करताना संबंधित सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे..

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. Snehal says

    After bsc can fill this form.age between 21 to 40 years

  2. Yuvraj chandrkant shendge says

    My name yuvraj chandrkant shendge and my diploma complete in electrical engg and mala job Kariya he ahe

  3. Suraj vishnu naikwade says

    12 th science pass in government job

  4. Roshan baliram navsare says

    Salary

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड