UPSC पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिकेवर हरकतींसाठी विंडो खुली

UPSC Exam Details

UPSC Prelims 2021

UPSC Exam Details  : UPSC has opened an online window to file objections on the question paper, this link has been activated since 6 pm on October 10, 2021. Further details are as follows:-

यूपीएससीने प्रश्नपत्रिकेवरील हरकती दाखल करण्यासाठी ऑनलाइन विंडो उघडली आहे, १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच ही लिंक सक्रीय करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील पूर्व परीक्षा देशभरातीलपरीक्षा केंद्रांवर प्रत्येकी २ तासांच्या दोन शिफ्टमध्ये घेतली. जनरल स्टडीज (जीएस) परीक्षा सकाळी ९,३० पासून पहिल्या शिफ्टमध्ये घेण्यात आली, तर सिव्हिल सर्व्हिसेस अॅप्टिट्यूड टेस्ट (CSAT) पेपर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० पासून घेण्यात आला. दोन्ही शिफ्ट पेपर आयोजित केल्यानंतर, यूपीएससीने प्रश्नपत्रिकेवरील हरकती दाखल करण्यासाठी ऑनलाइन विंडो उघडली आहे.

ज्या उमेदवारांना यूपीएससी प्रीलिम्स २०२१ च्या जीएस किंवा सीसॅट प्रश्नपत्रिकेबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा आहे, ते यूपीएससी अॅप्लिकेशन पोर्टल upsconline.nic.in येथे सक्रिय केलेली लिंक, किंवा या वृत्तात दिलेल्या थेट लिंकवरून हरकत नोंदवू शकतात. आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख ही माहिती द्यावी लागेल. आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार, हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२१(संध्याकाळी ६ पर्यंत) आहे.


UPSC Civil Services Prelims 2021 

UPSC Exam Details  : Candidates for UPSC Civil Services Prelims Exam 2021 will be able to change their examination center. Candidates can change their examination center in the window starting from 12th July. These changes will take place till July 19. 

यूपीएससी नागरी सेवा प्रिलिम्स परीक्षा २०२१ (UPSC Civil Services Prelims 2021) च्या उमेदवारांना आपले परीक्षा केंद्र बदलता येणार आहे. यूपीएससीने यासंदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे.

UPSC CMS परीक्षा 2021 – 838 पदे

UPSC अंतर्गत 376 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

UPSC Civil Services Prelims 2021: परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी

UPSC NDA & NA (II) परीक्षा 2020 अंतिम निकाल जाहीर

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१२ जुलैपासून होणाऱ्या विंडोमध्ये उमेदवार आपल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करु शकतात. १९ जुलैपर्यंत हे बदल होतील. यूपीएससीने यासंदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यासंदर्भात पहीला अर्ज करणाऱ्यास पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय आधी देण्यात आलेल्या नियम आणि अटींमध्ये कोणता बदल होणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्र बदलायचे नाही त्यांना लॉगिनमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही. परीक्षा केंद्र बदलण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.

यानुसार पहिला टप्पा १९ जुलैनंतर २६ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. उमेदवार ३० जुलै २०२१ संध्याकाळी ६ पर्यंत परीक्षा केंद्रात बदल करु शकतात. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल.


UPSC EPFO 2020 Exam Dates

UPSC Exam Details  : Union Public Service Commission has declared the exam date of Enforcement Officer – Accounts Officer, EPFO, 2020. Recruitment Test for 421 posts of Enforcement Officer-Accounts Officer, EPFO, 2020 will now be held on 05.09.2021

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत अंमलबजावणी अधिकारी – लेखा अधिकारी, EPFO, 2020 भरती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षेची तारीख 5 सप्टेंबर 2021 आहे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.

 • परीक्षेचे नावअंमलबजावणी अधिकारी – लेखा अधिकारी, EPFO, 2020
 • पद संख्या – 421 जागा
 • परीक्षेची तारीख5 सप्टेंबर 2021

परीक्षेची तारीख – https://bit.ly/3zRgdxB


UPSC Civil Service Examination 2021

UPSC Exam Details  : Interview rounds for UPSC Civil Service Examination will start from 2nd August 2021. This process will continue till September 22. Further details are as follows:-

UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 मुलाखतीचे सुधारित वेळापत्रक. यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेसाठी मुलाखतीच्या फेऱ्या २ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत. ही प्रक्रिया २२ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. इंटरव्ह्यू शेड्युल कसे करायचे डाऊनलोड… जाणून घ्या.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.ज्या उमेदवारांनी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे, ते UPSC CSE 2020 मुलाखतींना उपस्थित राहण्यास पात्र आहेत.

या आहेत महत्त्वाच्या तारखा -Interview Date

 • मुलाखती सुरू होण्याची तारीख- २ ऑगस्ट २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
 • मुलाखती संपण्याची तारीख – २२ सप्टेंबर २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
सुधारित वेळापत्रक – https://bit.ly/3zeNCC3

UPSC Preliminary Examination

UPSC Exam Details  : Change in date of UPSC Preliminary Examination, Examination will be held on 10th October! Further details are as follows:-

UPSC प्रिलीमनरी परीक्षेच्या तारखेत बदल. UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा 27 मे 2021 ऐवजी या तारखेला होणार- UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 मे 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता UPSC 2021 (Union Public Service Commission) ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय UPSC ने घेतला आहे


UPSC CMS Exam 2021: नोटिफिकेशन कधी !

UPSC Exam Details  : The notification of Combined Medical Services Exam 2021 (UPSC CMS Exam 2021) was to be issued on 5th May 2021. But now this date has been changed.

UPSC CMS Exam 2021: नोटिफिकेशन कधी ! कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ (UPSC CMS Exam 2021) चे नोटिफिकेशन ५ मे २०२१ रोजी जारी केले जाणार होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. नोटिफिकेशन आता कधी जारी होणार… वाचा

कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ (UPSC CMS Exam 2021) चे नोटिफिकेशन ५ मे २०२१ रोजी जारी केले जाणार होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. आयोगाने सांगितले आहे की नोटिफिकेशन पुढील आदेशानंतर जारी केले जाईल. जे उमेदवार यूपीएससी सीएमएस परीक्षा २०२१ साठी अर्ज करू इच्छितात त्यांनी आयोगाची वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी. अर्ज upsconline.nic.in द्वारे केले जाणार आहेत.

UPSC CMS Exam 2021 Notification – https://bit.ly/3vJ00Ia 


UPSC Exam : पूर्व परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी प्रशिक्षण

UPSC Exam Details  : The Tribal Development Department of the state government has now announced a new scheme for training in all stages from pre-examination to interview from reputed private institutes.

UPSC Exam : पूर्व परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी प्रशिक्षण – राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी नामवंत संस्थांमधून पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आता राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने नवीन योजना जाहीर केली आहे. यामध्ये 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना दिल्ली अथवा महाराष्ट्रातील संस्थांमध्ये यूपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेता येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी दिली.या योजनेकरिता वार्षिक एकूण रु. ४ कोटी ०९ लाख ०६ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

अशी असेल प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया :-
 • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या व सदर प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या व नमूद सर्वसाधारण पात्रता पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जातील.
 • याकरिता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण या संस्थेमार्फत सर्वदूर पोहोचणाऱ्या तसेच सर्वाधिक खपाच्या महत्त्वाच्या दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात येईल.
 • जर उमेदवारांची संख्या १०० पेक्षा जास्त असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका तयार केली जाईल व प्रवेश परीक्षा घेऊन गुणानुक्रमे निवड यादी व प्रतीक्षा यादी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था स्तरावरून प्रकाशित केली जाईल.
 • या निवड यादीतील प्रथम १०० प्रशिक्षणार्थींची या योजनेखाली निवड केली जाईल. जास्त अर्ज आल्यास परीक्षा घेऊन 100 जणांची निवड केली जाईल.
 • प्रशिक्षणार्थ्यांना या योजनेचा फायदा केवळ एकदाच घेता येईल.

याशिवाय इतर अटींची पूर्तता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. या योजनेची अंमलबजावणी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्फत करण्यात येणार असून प्रशिक्षणसंस्थांची निवड यादी (empanelment) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.


UPSC Exams Postponed – मुलाखती आणि वैयक्तिक चाचणी स्थगित

UPSC Exam Details  : UPSC Exams postponed: UPSC has postponed several recruitment exam interviews and individual tests. A notice has been issued in this regard. Learn detailed information. 

UPSC Interviews Postponed: करोना व्हायरस संक्रमणामुळे बिघडलेल्या परिस्थितीचा परिणाम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) काही भरतींवर देखील झाला आहे. यूपीएससी ने काही भरतींसाठी होणाऱ्या मुलाखती आणि वैयक्तिक चाचण्या लांबणीवर टाकल्या आहेत. आयोगाने आपली वेबसाइट upsc.gov.in वर यासंबंधीची माहिती दिली आहे.

सोमवार, १९ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार यूपीएससीने कळवले आहे की २० एप्रिल २०२१ पासून नियोजित सर्व थेट भरतीच्या मुलाखती आणि वैयक्तिक चाचण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा आयोग लवकरच जारी करणार आहे.

आयोगामार्फत आयईएस (UPSC IES) आणि आयएसएस (UPSC ISS) परीक्षा २०२० च्या मुलाखती २० एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत होणार होत्या. पण आता पुढील आदेश येईपर्यंत त्या स्थगित करण्यात आल्या आहेत.


UPSC भारतीय नागरी सेवेतील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता मुदतवाढ

Maha Jyoti UPSC Pre Training Registration

UPSC Exam Details  : Maha Jyoti UPSC Pre Training Registration – महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे कार्यरत असून Union Public Service Commission च्या भारतीय नागरी सेवेतील या परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष, मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील मण्यात प्राप्त विद्यापीठाची पदवी व त्यापेक्षा उच्च शिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज Union Public Service Commission च्या 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 31 मार्च 2021 (मुदतवाढ) आहे.

UPSC Exam Details

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

UPSC Exam Details

हे प्रशिक्षण Union Public Service Commission च्या भारतीय नागरी सेवेतील विविध संवर्गातील भरती करिता पूर्ण तयारी म्हणून देण्यात येईल. यासंदर्भातील अधिक माहिती करिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

अधिक मोहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 
जाहिरात/ नोंदणी : https://bit.ly/3a35O7d

UPSC CGS परीक्षा 2020 व्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक

UPSC Exam Details  : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त भौगोलिक वैज्ञानिक परीक्षा 2020 चे व्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक जाहीत करण्यात आलेले आहेत. व्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

व्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक – https://bit.ly/3dZLfea


UPSC Exam Details  : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पूर्व परीक्षा अर्थात यूपीएससीची पूर्व परीक्षा येत्या २७ जूनला होणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पूर्व परीक्षेच्या काही खास टिप्स या ठिकाणी देत आहोत.

यूपीएससीच्या परीक्षेत देशात आठवी आलेल्या वैशाली सिंगने पूर्व परीक्षेसाठी खास टिप्स दिल्या आहेत. पूर्वपरीक्षेसाठी तिने कशी तयारी केली होती, त्यासाठी कोणती खास तयारी केली होती का? याबाबत वैशालीनं माहिती दिली आहे.

NCERT पुस्तकांपासून तयारी करा

UPSC २०१८च्या परीक्षेत देशात ८वी आलेली वैशाली सिंग म्हणाली, यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांपासून सुरवात केली पाहिजे. पूर्वपरीक्षेला एनसीआरटीच्या पुस्तकातील प्रश्न विचारतात असं नाही, पण यामुळे तुमचा पाया पक्का होतो. यूपीएससीची तयारी करणारे बरेचसे उमेदवार एनसीईआरटीची पुस्तके वाचण्याकडे दुर्लक्ष करतात, पण एनसीईआरटीची पुस्तके वाचल्यानंतर एप्लीकेशन बेस अशा प्रकारचे प्रश्न सहज सोडवू शकता.

मॉक टेस्ट ठरतात फायदेशीर

वैशाली पुढे म्हणाली की, ‘पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर मॉक टेस्ट सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. मी परीक्षेच्या आधी २ महिने दररोज १ मॉक टेस्ट देत होती, ज्याचा मला परीक्षेमध्ये फायदा झाला होता.’

नोट्स स्वत: तयार करा

तसेच तिने आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. वैशाली म्हणाली की, यूपीएससी परीक्षेची तयारी करताना नोट्स तयार करायला विसरू नका. कारण मी स्वत: नोट्स तयार करण्याला प्राधान्य दिले होते, यामुळे लिहता लिहता ते लक्षात राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही एखाद्याकडून नोट्सदेखील घेऊ शकता.

सोर्स : सकाळ


UPSC CAPF DAF 2020: परीक्षेसाठी जारी झाला DAF अर्ज 

UPSC Exam Details  : upsc capf daf 2020 released, here is direct link – UPSC CAPF DAF 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी आपल्या अधिकृत वेबसाइटवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) परीक्षा २०२० च्या उमेदवारांसाठी विस्तृत अर्ज (DAF) जारी करण्यात आला आहे.

जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते यूपीएससी CAPF परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज २५ फेब्रुवारी २०२१ किंवा त्यापूर्वी सायंकाळी सहा वाजेपर्यंत UPSC CAPF परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

आयोगाने लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२१ रोजी आयोजित केली होती. परीक्षेचा निकाल ८ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. UPSC CAPF मध्ये सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव सुरक्षा बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये निवड होण्यासाठी परीक्षेचे आयोजन केले जाते.

भरती अभियान २०९ पदांवर भरती करण्यासाठी आयोजित केले जात आहे. यापैकी ७८ रिक्त पदे बीएसएफची, ६९ पदे सीआयएसएफची, २७ आयटीबीपीसाठी, २२ एसएसबीसाठी आणि १३ सीआरपीएफसाठी आहेत.


UPSC CSE Prelims 2021: यूपीएससी पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट  

UPSC Exam Details  : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा येत्या २७ जून रोजी होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी निर्धारीत केल्याप्रमाणे पूर्व परीक्षा २७ जून रोजी घेण्यात येईल. आणि याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नेहमीप्रमाणे पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतील. हे दोन्ही पेपर वैकल्पिक असतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड उमेदवाराला करावी लागेल. एकूण ४०० गुणांची ही परीक्षा असेल. उमेदवाराचे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येतील. जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे.

पेपर-१ मध्ये विविध ७ विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहास आणि संस्कृती, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, पर्यावरण, चालू घडामोडींचा समावेश असेल. पूर्व परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर कटऑफ लिस्ट प्रसिद्ध केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना कटऑफमध्ये स्थान मिळते, ते मुख्य परीक्षेस पात्र ठरू शकतात.

त्यानंतर मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीची फेरी गाठतात. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींच्या आधारे अंतिम पात्र उमेदवारांची निवड केली जाते.

दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमुळे गेल्या वर्षी यूपीएससीच्या वार्षिक वेळापत्रकात बदल झाला होता. काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यंदाही परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याबाबत चर्चा सुरू होती, पण यूपीएससीने पूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Rahul chatur bhoi says

  Job kaise hai

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड