ठाणे महापालिकेने १० ऑगस्ट २०२५ मध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र फायरमन पदांच्या आरक्षणामध्ये शासनाच्या निर्णयानुसार आवश्यक तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेने आता नवे पत्रक काढून फायरमन पदांच्या आरक्षणात भुधारणा फैली आहे. शासनाच्या ५ फेब्रुवारी २००८च्या निर्णयानुसार किमान तीन वर्षे सेवा केलेल्या होमगार्ड जवानांसाठी फायरमन संवर्गात पाच टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार फायरमनच्या एकूण ३८१ पदांपैकी १९ पदे होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच या भरतीच्या संदर्भातील पूर्ण सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.
गावदेवी अग्नितांडवानंतर जाग
गावदेवी मंडई येथील आगीच्या दुर्घटनेनंतर पालिकेच्या अग्निशमन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेत अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यासह एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. दरम्यान गावदेवी अग्नितांडवानंतर अग्निशमन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
अत्यावश्यक सेवांमधील अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील पदांचीच भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या इतर संवर्गातील पदांची भरती स्वतंत्रपणे केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ७०८ पदांसाठी सुमारे २४ हजार अर्ज आल्याने प्रत्येक पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेनंतर एमपीएससीच्या धर्तीवर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.
Thane Mahanagarpalika Hall Ticket Download – Thane Mahanagarpalika Bharti 2025 – 2026 Latest Update is released. As per the latest Recruitment news, this process for 1773 Vacancies is under process. Last date to submit Application Forms was 17th Sept 2025. Now the good news is that the Exam Date of Thane Mahanagar Palika is declare by Thane Mahanagarpalika Recruitment Details, The exam Schdule i`f given below in following GR. Also the Admit Cards or Hall tickets are now available on given Link. More updates will be available on this under MahaBharti.in.
मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, ठाणे महानगरपालिका १७७३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज भरण्याचा टप्पा आताच पूर्ण झाला आहे. ठाणे महापालिकेने ऑगस्ट २०२५ मध्ये जाहीर केलेल्या १७७३ पदांच्या मेगाभरती प्रक्रियेसाठी महापालिकेकडे सुमारे ७५ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरतीची परीक्षा तारीख आणि प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. खालील लिंक वरून लॉगिन करून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.


प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
हि भरती गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे) इत्यादी पदांसाठी होत आहे. तसेच, या भरती अंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२५ होती. आता उमेदवार या भरती मोहिमेच्या परीक्षांची वाट पाहत आहेत. नवीनतम अपडेटनुसार, ठाणे महानगरपालिकेच्या परीक्षा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अपेक्षित आहेत. ठाणे महानगरपालिकेने अद्याप अचूक तारीख जाहीर केलेली नाही. परंतु उमेदवारांनी त्यांच्या परीक्षेसाठी तयार राहावे. तसेच प्रवेशपत्रे किंवा हॉल तिकिटे परीक्षेच्या तारखेच्या १ आठवडा आधी उपलब्ध असतील. याबद्दल अधिक अपडेट्स MahaBharti.in वर उपलब्ध असतील.
जाहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करुन अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ५०% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. सरळसेवा भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची /उत्तरपुस्तिकांची गुणपडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही. अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित/बुध्दीमत्ता चाचणी व विषयज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरीता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील.प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. परंतु अग्निशमन सेवेतीलसहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक-यंत्रचालक व फायरमन या संवर्गाचे परीक्षेचे गुण १०० व परीक्षेचा कालावधी एक तास राहील.
तसेच शारिरीक व मैदानी चाचणीकरीता १०० गुण असतील. ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरुप, तांत्रिक ज्ञान यांचेशी संबंधित राहील.जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेच्या ७ (सात) दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र स्वतः संकेतस्थळावरून काढून घ्यावे. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा (छायाप्रतीसह) सोबत ठेवणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही उमेदवारांस परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वतःजवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेशपत्र व ओळखीच्या पुराव्याची छायाप्रत जमा करावी.परीक्षा केंद्राची शहरे उपलब्धतेनुसार निश्चित केली जातील.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















